xSEO

बालपण स्टेटस, कोट्स मराठी | Childhood Quotes In Marathi

Dipali Naphade  |  Mar 16, 2022
childhood-quotes-in-marathi

‘लहानपण देगा देवा’ हे आपल्याला मोठं झाल्यानंतर नेहमीच वाटतं. पण जोपर्यंत आपण मोठे होत नाही तोपर्यंत बालपणीचे महत्त्व (Balpan Status In Marathi) कळत नाही. बालपणीच्या आठवणी (Childhood Memories Quotes In Marathi) या कायम साठवणीमध्ये राहतात. लहानपणीच्या आठवणींसाठी तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना काही स्टेटस पाठवायचे असतील तर खास तुमच्यासाठी हे स्टेटस आम्ही देत आहोत. बालपण स्टेटस आहेत (Childhood Quotes In Marathi) खास. तुमच्या तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना लहानपणीचे मराठी स्टेटस (Lahanpan Marathi Status) नक्की पाठवा आणि जागवा काही खास आठवणी. 

बालपणावरील कोट्स मराठी – Childhood Quotes In Marathi

बालपणावरील कोट्स मराठी (Childhood Quotes In Marathi)

बालपणावरील काही खास कोट्स तुमच्यासाठी. बालपण म्हटलं की, डोक्याला काहीही त्रास नाही. अभ्यास, मजा मस्ती आणि मित्रमैत्रिणींबरोबरील खेळ हेच लक्षात राहातं. लहानपणीच्या आठवणी कधीच विसरता येत नाहीत. अशाच बालपणावरील काही कोट्स.

1. लहानपणीचे पण काय दिवस होते ते कुठेही डोळे लागले तरीही सकाळी अंथरुणात डोळे उघडायचे.

2. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा.

3. लहानपणी लागलेली थोडीशी जखम आईच्या हलक्या फुंकेने आणि आईच्या म्हणण्याने की होईल बाळा ठीक खरच तशी औषध आजपर्यंत कोणती बनवलीच नाही.  

4. ती लहानपणीची श्रीमंती कुठे गेली कुणास ठाऊक जेव्हा पाण्यात आमचे पण छोटे जहाज चालायचे

5. लहानपणी एकच गैरसमज होता की, मोठे झाल्यावर जीवन आणखी मजेदार आहेत

6. लहानपणी घड्याळ कोणाजवळच नव्हता पण वेळ प्रत्येकाजवळ होता, आता घड्याळ प्रत्येकाजवळ आहे पण वेळच नाही

बालपण स्टेटस, कोट्स मराठी – Balpan Status Marathi

7. लहानपणी दुःख तर तेव्हा व्हायचं जेव्हा रात्रभर पडणारा पाऊस सकाळी शाळेला जायच्या वेळी बंद व्हायचा.

8. लहानपणी आई शाळेत पाठवायची म्हणून रडायला यायचं आणि आता शाळेच्या आठवणीने रडायला येतं.

9. शाळेच्या मैत्रीसारखी मैत्री नाही, बालपण जगायचं असेल तर शाळेतच आहे खरी मजा.

10.  एवढी ओढ लाखो रुपयांना पाहून होत नाही जेवढी लहानपणीचा फोटो पाहून लहानपणात जाण्याची होते.

11. बालपण म्हणजे लहानशा तक्रारी आणि पटकन सुटणारी समस्या.

12. ओठांवर हसू होतं, खांद्यावर ओझं होतं, पण बालपणी समाधान अधिक होतं 

13. मोठं झाल्यावर कळते बालपणीची किंमत, जेव्हा काहीच सोपं नसतं 

14. बालपणी अभ्यासाचं ओझं वाटायचं, पण आयुष्याचं ओझं झेलताना आता अभ्यास जास्त सोपा वाटतोय 

15. खेळत होतो, मजा – मस्ती करत होतो, ते बालपण असं होतो, जिथे कधीही मैत्री करत होतो

बालपण स्टेटस मराठी – Balpan Status In Marathi

बालपण स्टेटस मराठी Balpan Status In Marathi

बालपण म्हटलं की मित्रमैत्रिणींसह घालवलेले क्षण, सुट्टीच्या दिवसात गावात केलेली सैर, सुट्टीत फिरायला जाणं आणि इतर अनेक मजा आपल्याला आठवतात. बालपणीचे दिवस हे सर्वात मस्त दिवस होते. या दिवसांची मजा कधीच विसरता येत नाही. असेच काहीच बालपण स्टेटस (balpan status in marathi) तुमच्यासाठी. 

1. किती खोटं बोलायचो, तरीही होता खरेपणा, ही त्या दिवसांची गोष्ट आहे, जेव्हा आम्ही लहान मुलं होतो  

2. लहानपण म्हणजे डोक्याला त्रास नाही. लहानपण म्हणजे साठवणींचा ठेवा 

3. माणसं मोठी का होतात? लहानपणात जी मजा आहे ती कुठेच नाही 

4. सर्वात जास्त जर काही आठवणीत राहात असेल तर ते म्हणजे बालपण 

5. बालपण हा असा ठेवा आहे, जो कधीही विसरता येत नाही 

6. होत्या लहानशा इच्छा आकांक्षा, पटकन व्हायच्या पूर्ण आणि त्यात आनंदही मिळायाचा, मोठं झाल्यावर हे सर्व सुख मिळतच नाही आणि मग येते आठवण ती बालपणीची 

7. किती मस्त होते ते बालपणीचे दिवस, दोन बोटांच्या जुळण्यानेही मैत्री पुन्हा सुरू व्हायची 

बालपणावर स्टेटस मराठी मध्ये – Balpan Status, Quotes, SMS Marathi

8. काही मिळविण्याची इच्छा नाही आणि काही गमावण्याची भीती नाही

आपल्याच दुनियेत जगण्याची ती मस्ती, असे होते ते बालपण 

9. समाधान आता कशात मिळतच नाही, जे बालपणातील गोष्टींमध्ये मिळत होते

10. बालपण पण मस्त होते, खेळता खेळता कुठेही झोप लागली तरी जाग यायची तेव्हा आपण आपल्या घरातील बेडवरच असायचो 

11. बालपणातील निरागस मन हेच सुंदर जीवनाचं बाळकडू आहे

12. बालपणी चांदण्यात गोष्टी ऐकायची मज्जा काही वेगळीच होती, आता तर चांदणं पाहायलाही वेळ नाही

13. बालपणातील सर्व दिवस लक्षात राहात नाहीत, पण बालपणीच्या आठवणी मात्र साठवणीत नक्कीच राहतात

14. ना अटी ना शर्ती बालपणीच्या खेळाच्या आहे काही वेगळ्याच आठवणी

15. आता नेहमी विचार येतो की, बालपणीचे ते आनंद देणारे खेळणे मी नक्की कुठे विसरले आहे?

बालपणीच्या आठवणींचे कोट्स – Childhood Memories Quotes In Marathi

बालपणीच्या आठवणींचे कोट्स (childhood memories quotes in marathi) तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी. काय खास दिवस होते ते…आजही त्या आठवणींने डोळे पाणवतात आणि ओठांवर आपोआप हसू येते. कितीही कठीण काळ का असेना, पण बालपणीची आठवण आली की, चेहऱ्यावर एक हसू पटकन न सांगता येते. याच आठवणी आपल्या आयुष्यभराची जपणूक आहे. 

1. चला आज लहानपणीचे काही खेळ खेळून पाहूया, अने्क वर्ष झाली मनापासून चेहऱ्यावर हसूच आले नाहीये, किमान यानिमित्ताने तरी ओठांवर हसू येईल 

2. कोणीतरी हे बालपणीचे दिवस पुन्हा एकदा आणून देईल का? बालपण गेलं की कधीच परत येत नाही

3. बालपण ही अशी गोष्ट आहे जी कधीच तुमच्या मनापासून दूर होत नाही

4. आठवणीतल्या काही गोष्टी पुसट होतात, पण बालपण कधीच पुसट होत नाही

5. आयुष्य पुन्ही कधी तसे दिसलेच नाही जसे ते बालपणी होते

6. लहानपणी संध्याकाळसुद्धा असायची, आता तर सकाळ आणि रात्र इतकंच आयुष्यात येतं

7. हसण्यासाठी कारण आता शोधावं लागतं, बालपणी तर विनाकारण हसण्याची मजाच वेगळी होती

8. आई, खरंच पुन्हा एकदा ती शाळेची बॅग दे गं खांद्यावर, आता आयुष्याचं ओझं सहन नाही होत, त्यापेक्षा बॅगेचं ओझं नक्कीच झेपण्यासारखं होतं 

9. सर्वात जास्त श्रीमंत तर आपण लहानपणी असतो, कारण सर्वात अमूल्य गोष्ट असते बालपणी ती म्हणजे चेहऱ्यावरील हास्य

10. हसणे आणि हसवणे यापेक्षा वेगळं काय कामं होतं लहानपणी, आता मोठं झाल्यावर त्याची किंमत कळली आहे 

11. काही मागितल्यावर ती गोष्ट उशीरा मिळायची, पण ती मिळविण्याचा आनंद बालपणी वेगळाच होता 

12. शाळेतल्या सुट्टीतील तो डब्यांचा सुगंध, एकमेकांच्या डब्यातील जेवणाची देवाणघेवाण, पुन्हा हा अनुभव कधीच येणार नाही, रम्य ते बालपण

13. दुपारच्या उन्हात खेळण्याची आणि शेजारच्यांचा ओरडा खाण्याची मजा बालपणात काही औरच होती!

14. कितीही चिडले तरीही बालपणात माया करायची आई – बाबांनी कधीच सोडली नाही, मोठं झाल्यावर मात्र आता पुन्हा ते दिवस हवेसे वाटतात

15. खूप दिवसाने शाळेच्या समोर आल्यावर वाटलं, शाळा विचारत आहे की, माझ्यामुळे बालपणी तर तू त्रस्त होतीस, आता आयुष्यातील परीक्षा कशा चालू आहेत?

बेस्ट बालपण कोट्स मराठी – Best Balpan Quotes In Marathi

बेस्ट बालपण कोट्स मराठी Best Balpan Quotes in Marathi

बालपण आहे उत्तम. प्रत्येकाला लहानपणी लवकर मोठं व्हायचं असतं. पण बेस्ट आहे ते म्हणजे बालपण. बेस्ट बालपण कोट्स मराठीमध्ये (Best Balpan Quotes in Marathi) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. बालपण म्हटलं की आठवणींचा खजिना (quotes on childhood in marathi). 

1. शाळेत तर फळा पुसायचं काम पण किती मोठं आणि अभिमानाचं वाटायचं, आता तर सगळ्यातच मानपान आडवे येतात

2. कालपण, आजपण, उद्यापण, जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं ते म्हणजे बालपण

3. खिशाचे वजन पाहून बालपणी मैत्री कोणीच करत नव्हतं आणि हेच खास आहे  

4. ती लहानपणीची श्रीमंती कुठे गेली कुणास ठाऊक, तेव्हा साचलेल्या पाण्यात पण आमचे जहाज चालायचे 

5. आयुष्य जर ऋतूंचा संगम असेल तर बालपण हा सर्वात सुंदर ऋतू आहे 

6. बालपणी खेळ हेच सर्वस्व होतं, मैदान हेच घर होतं आणि घर हे आपल्यासाठी तुरूंग होतं 

7. बालपण कसलं मस्त असतं ना? स्वप्नं तर खूप बघता येतात, ती पूर्ण करण्याची स्पर्धा नसते तेव्हा

8. बालपणीचा तो काळ सर्वात जास्त चांगला होता, कारण ना कोणी शत्रू होतं ना कोणती स्पर्धा होती 

9. बालपणी जरासं रडलो तरी पूर्ण चाळीला माहीत असायचं आणि आता एका डोळ्यातील अश्रूंचा त्रास दुसऱ्या डोळ्यालाही माहीत नसतो 

10. बालपणीचा प्रत्येक दिवस तर लक्षात नाही माझ्या, पण बालपणीच्या आठवणी मात्र लक्षात आहेत माझ्या

11. बालपण असंच असतं रे ना भीती भविष्याची ना भीती कोणत्याही दुःखाची, भरभरून जगण्यासाठी असते ते बालपण

12. जोपर्यंत माझे जीवन असावे मला लहान बनून जगू दे अशीच प्रार्थना कायम ईश्वरचरणी करावी वाटते 

13. ते सायकलवरून शाळेत जाणं, एकत्र अभ्यास करणं, एकमेकांची कळ काढणं आणि तरीही कायम एकत्र राहणं – अप्रतिम होते ते बालपणीच दिवस, कायमस्वरूपी समाधान देणारे

14. समाधानाबाबत बोलायचं झालं ना मित्रांनो, तर आता समाधानाचा तो रविवार कधीच येत नाही

15. भरू दे माझी शाळा पुन्हा एकदा, जगावेसे वाटत आहेत ते बालपणीचे दिवस पुन्हा एकदा

प्रत्येकासाठी बालपणीच्या आठवणी खास असतात. अशाच काही आठवणी जपण्यासाठी बालपण कोट्स मराठीमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत. तुम्हीही तुमच्या मित्रमैत्रिणींना हे कोट्स पाठवा आणि आपल्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा एकदा जागवा!

हे हि वाचा,

50+ लाडक्या भावासाठी खास कोट्स

Read More From xSEO