भविष्य

आपल्या राशीनुसार कोणत्या रंगाने होळी खेळायला हवी जाणून घ्या

Dipali Naphade  |  Mar 20, 2019
आपल्या राशीनुसार कोणत्या रंगाने होळी खेळायला हवी जाणून घ्या

होळी हा रंगांचा सण आहे. प्रत्येक जणांना होळीच्या शुभेच्छा देणं आणि होळी खेळणं आवडतं. असं म्हणतात की, प्रत्येक रंग हा खास असतो आणि प्रत्येक राशीनुसार या रंगाचं वैशिष्ट्य बदलत असतं. एखादा रंग तुमच्यासाठी शुभ असेल तर दुसऱ्यासाठी शुभ असेलच असं नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, होळीच्या शुभदिनी तुम्हाला जर शुभ गोष्टी घडायला हव्या असतील तर तुम्ही तुमच्या राशीनुसार रंगांचा वापर करा. या रंगाने तुम्ही होळी खेळायला सुरु करू शकता. कारण हे रंग आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणतात असं म्हटलं जातं. हे रंग तुमच्या आयुष्यात आनंद आणि सुख घेऊन येतात. त्यामुळे राशीनुसार तुम्हाला कोणता रंग शुभ आहे हे जाणून घेऊया.

मेष (21 मार्च – 19 एप्रिल)
या राशीचा ग्रह मंगळ आहे, त्यामुळे लाल रंग नेहमी तुमच्यासाठी शुभ ठरतो. त्याशिवाय तुमच्यासाठी पांढरा, लेमन ग्रीन अथवा हिरवा हे रंगदेखील शुभ आहेत. तुम्ही या रंगाचे कपडे अथवा रंग वापरलेत तर नक्कीच तुमची होळी खास ठरेल.

वृषभ ( 20 एप्रिल – 20 मे)
पृथ्वी तत्वाची रास म्हणून वृषभ राशीसाठी हिरवा रंग शुभ असतो. या राशीच्या लोकांना पिवळा आणि हिरवा रंग दोन्ही मिश्रण करूनदेखील शुभ ठरतो. या राशीच्या लोकांनी लाल रंगापासून दूर राहायला हवं. त्यांच्यासाठी लाल रंग शुभ नसतो.

वाचा- रंगपंचमीची संपूर्ण माहिती

मिथुन (21 मे – 21 जून)
या राशीच्या लोकांसाठी पिवळा रंग शुभ मानला जातो. हवं तर तुम्ही हिरव्या रंगानेही होळी खेळायला सुरुवात करू शकता. या रंगामुळे तुमचा समाजामध्ये मान – सन्मान वाढतो आणि तुम्हाला यशप्राप्ती मिळते. हे दोन्ही रंग तुमच्यासाठी खास आणि शुभ आहेत.

कर्क (22 जून – 22 जुलै)
या राशीच्या लोकांसाठी लाल आणि पिवळा रंग शुभ आहे. हे रंग होळी खेळण्यासाठी तुम्हाला शुभ ठरतात. तुमचं स्वास्थ निरोगी राहतं आणि  तुमच्या मनातील इच्छाही पूर्ण होतील.

सिंह (23 जुलै- 22 ऑगस्ट)
या राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्यापासून प्रभावित असल्यामुळे तुमच्यासाठी पिवळा, लाल आणि नारिंगी रंग जास्त शुभ आहे. या रंगानी तुम्ही होळी खेळायला सुरुवात करा. नारिंगी रंग तुमच्यासाठी भाग्यशाली असतो हे नेहमी लक्षात ठेवा.

वाचा- होळी स्पेशल रेसिपीज

कन्या (23 ऑगस्ट – 22 सप्टेंबर)
या राशीच्या लोकांना रंगाच्या बाबतीत मोकळीक आहे. या राशीच्या व्यक्ती कोणत्याही रंगांनी होळी खेळू शकतात. तसं तर तुमच्यासाठी सर्व रंगांमध्ये हिरवा रंग जास्त भाग्यशाली आहे.

तूळ (23 सप्टेंबर – 22 ऑक्टोबर)
या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या राशीसाठी गुलाबी रंग शुभ मानला जातो. केवळ गुलाबी रंग सौभाग्याचं प्रतीक नाही तर याची शोभा प्रत्येक रंगापेक्षा वेगळी आहे. तर हलका पिवळा रंगदेखील या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ मानला जातो.

वृश्चिक (23 ऑक्टोबर – 21 नोव्हेंबर)
या राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी सिंदूरी लाल रंग शुभ मानला जातो. हा रंग अतिशय गडद असतो. ही होळी तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर खेळल्यास, तुमच्या गृहस्थी जीवनामध्ये सुधारणा होईल असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे.

धनु (22 नोव्हेंबर – 21 डिसेंबर)
या राशीच्या लोकांसाठी वांगी अर्थात जांभळा रंग शुभ मानला जातो. या राशीचे लोक तसं तर समंजस गोष्टी जास्त पसंत करतात त्यामुळे त्यांनी वांगी रंग जास्त वापरायला हवा. हा रंग विलास आणि भोगाचा रंग समजला जातो. याचा प्रयोग केल्यामुळे ‘काम’ भाव जास्त जागृत होतात. शिवाय या राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास आणण्याचं आणि त्यांना कधीही निराश न करण्याचं काम हा रंग करतो.

वाचा – रंगपंचमीसाठी खास कोट्स

मकर (22 डिसेंबर – 19 जानेवारी)
या राशीच्या व्यक्तींना निळा रंग विशेष स्वरूपात आवडतो आणि हा रंगच त्यांच्यासाठी शुभ आहे. हा रंग तुम्हाला वाईट नजर लागण्यापासून वाचवतो. तसंच तुमच्या नशीबात यश मिळवून देण्यासाठीही हा रंग उपयोगी आहे. तुम्ही या रंगाने होळी खेळाल तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल.

कुंभ (20 जानेवारी – 18 फेब्रुवारी)
या राशीचा स्वामी गुरू आहे. या दिवशी कुंभ राशीच्या व्यक्तींनी निळा अथवा हिरवा रंग घेऊन होळी खेळायला हवी. हे दोन्ही रंग कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात सुख आणि शांती घेऊन येतात.

मीन (19 फेब्रुवारी – 20 मार्च)
मीन राशीचा स्वामी गुरू आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी नारिंगी, पिवळा आणि केशरी रंगाच्या शेड्सचा होळी खेळताना वापर करावा. हे रंग तुम्हाला आकर्षक दिसायला मदत करतात आणि त्यांच्या आकर्षणामुळे समोरचा माणूस कोणत्या गोष्टीला नकारही देत नाही.

आम्ही तुम्हाला कोणत्या राशीसाठी कोणते रंग महत्त्वाचे आहेत ते सांगितलं. त्याप्रमाणे रंग वापरून तुम्ही तुमची होळी साजरी करा. होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

हेदेखील वाचा – 

Happy Holi Quotes and Wishes in Hindi

होळीची संध्याकाळ घालवायची कशी – नवे फंडे

Holi Special : यंदा करून पाहा ‘या’ फ्युजन रेसिपीज

DIY: रंगपंचमीसाठी बनवा नैसर्गिक रंग जे तुम्हाला देतील नैसर्गिक ग्लो

Read More From भविष्य