घर आणि बगीचा

क्लासिक किचन आवडत असेल तर या भांड्याचा करा समावेश

Leenal Gawade  |  Nov 8, 2021
क्लासिक किचन

मॉर्डन किचन आले तरी देखील खूप जणांना अजूनही क्लासिक किचन खूप जास्त आवडतात. क्लासिक किचन म्हणजे काय? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर असे किचन ज्यामध्ये अनेक पारंपरिक गोष्टींचा समावेश असतो. हल्ली किचन छान दिसावे यासाठी मॉड्युलर किचन केले जाते. त्यामधील भांडी म्हणजे किचन वेअर (kitchenware) हे देखील आता खूप मॉर्डन झाले आहेत. पण हल्ली पुन्हा लोकं काही क्लासिक गोष्टींकडे वळू लागली आहेत. हल्ली बाजारात क्लासिक आणि पारंपरिक भांडी दिसून लागली आहेत. तुम्हालाही अशी पारंपरिक भांडी आवडत असतील तर तुम्ही नेमकी कोणती भांडी घ्यावीत जे तुमच्या किचनला इतरांपेक्षा वेगळे करतील

पितळेचे डबे

पूर्वी अनेकांच्या घरी पितळेचे डबे असायचे. पण हल्ली प्लास्टिक आणि एअर टाईड डब्याने घेतली आहे. त्यामुळे या डब्यांना खूप जणांनी रामराम केला होता. पण आता पुन्हा एकदा या डब्यांकडे लोकं वळू लागली आहेत.किचनमध्ये हे डबे खूप चांगले दिसतात. हे डबे तुमच्या प्लास्टिकच्या डब्यांच्या तुलनेत फार महाग असतात. पण किचनमध्ये त्यांचा लुक हा खूप वेगळा दिसतो. त्यामुळे शक्य असेल आणि तुम्हाला क्लासिक किचनची आवड असेल तर तुम्ही नक्कीच पितळेचे डबे किचनमध्य ठेवायला हवेत.

पितळेचा मसाला डबा

पितळेचा मसाला डबा

किचनमध्ये सगळ्यात जास्त वापरल्या जाणारा मसाला डबा हा खूप जणांना चांगला आणि वेगळा हवा असतो. पूर्वीच्या काळी पितळेचा मसाल्याचा डबा असायचा. हा डबा आजी आणि तिच्या स्वयंपाकाची आठवण करुन देतो. त्यामुळे तुम्हाला जर मसाल्याचा डबा हवा असेल तर तुम्ही पितळेचा डबा अगदी नक्की विकत घ्या. पितळेच्या डब्याममध्ये तुम्हाला वेगवेगळे आकार मिळतात. ही भांडी किचन ट्रॉलीमध्येही चांगली दिसतात. त्यामुळे तुमच्या क्लासिक घरात हे क्लासिक भांडे अगदी असायलाच हवे.

मातीची भांडी

मातीची भांडी ही देखील क्लासिक किचनमध्ये चांगली दिसतात.मातीच्या भांडीमध्ये कढई, पातेले, ग्लास आणि अशी बरीच भांडी मिळतात. मातीची भांडी ही जास्त करुन गावी चुलीवर जेवणासाठी वापरली जातात. तुम्हाला मातीच्या भांडी आवडत असतील आणि तुमच्या किचनमध्ये हव्या असतील तर तुम्ही मातीची भांडी नक्की किचनमध्ये ठेवा. मातीची भांडी ही खूप नाजूक असतात. त्यामुळे ही भांडी किचनमध्ये वापरताना तुम्हाला त्याची अधिक जास्त काळजी घ्यावी लागतात.

चांदीची भांडी

चांदीची भांडी

चांदीची भांडी ही खूप जण काही खास प्रसंगासाठी काढली जातात. प्रत्येकाकडे चांदीचे ताट, दिवा, चमचा, वाटी, पेला असे साहित्य असते. चांदीची भांडी म्हणजे ग्लास, सर्व्हिंगची भांडी अशा अनेक गोष्टी असतत. तुम्ही जसे हवे तसे किचनमध्ये याचा समावेश करु शकता. खास पाहुणे आल्यावर किंवा सणासुदीच्या दिवशी तुम्हाला ही भांडी वापरण्यास काहीच हरकत नाही. 

आता तुमच्या क्लासिक किचनमध्ये तुम्ही अगदी हमखास या भांड्याचा समावेश करा

Read More From घर आणि बगीचा