DIY सौंदर्य

नारळपाण्याने करा फेशिअल, त्वचेवर येईल नैसर्गिक चमक

Trupti Paradkar  |  Jun 17, 2022
coconut water facial in Marathi

नारळपाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नारळ पाण्यातील अनेक पोषक घटक शरीराला मिळतात ज्यामुळे तुम्ही निरोगी राहता. यासाठी जाणून घ्या नारळपाण्याचे फायदे… मात्र एवढंच नाही नारळपाण्याकील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स तुमच्या त्वचेसाठीही खूप उपयोगी ठरतात. दररोज नारळपाणी पिण्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार होते. आजकाल यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये नारळपाण्याचा वापर केला जातो. घरच्या घरी त्वचेची निगा राखण्यासाठी तुम्ही नारळपाण्याने फेशिअल देखील करू शकता. जाणून घ्या घरगुती फेशियल कसे करावे मराठी माहिती (Facial Steps In Marathi) आणि नारळपाण्याचे फायदे (Coconut Water Benefits In Marathi)

नारळपाण्याने असं करा फेशिअल

नारळ पाण्याचा फेशिअलसाठी वापर करताना तुम्ही या काही सोप्या स्टेप्स फॉलो करू शकता.

नारळपाण्याने करा चेहरा स्वच्छ

फेशिअलची पहिली स्टेप असते चेहरा स्वच्छ करणं. जर तुम्ही नारळ पाण्याचं फेशिअल करत असाल तर नारळ पाण्याने चेहरा धुवून घ्या. असं केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील धुळ, माती, प्रदूषण, मेकअपचे कण निघून जातील. नारळपाण्याने चेहरा धुतल्यावर तो टीश्यू अथवा स्पंजने पुसू नका तर तसाच कोरडा होऊ द्या.

टोनरसाठी वापरा नारळपाणी आणि गुलाबपाणी 

चेहरा स्वच्छ केल्यावर तुम्हाला चेहरा टोन करण्यासाठी देखील नारळपाण्याचाच वापर करायचा आहे. यासाठी नारळपाणी आणि गुलाबपाणी एकत्र करा आणि कॉटन पॅडने ते चेहऱ्यावर लावा. क्लिंझिंग आणि टोनिंगमुळे तुमची त्वचा मऊ आणि फ्रेश होईल.

नारळपाण्यानेच बनवा स्क्रबर

चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाण्यासाठी आणि त्वचा खोलवर स्वच्छ होण्यासाठी तुम्ही स्क्रबरमध्येही नारळपाण्याचा पुन्हा वापर करू शकता. यासाठी कॉफी पावडर, नारळपाणी आणि कोरफडाचा गर एकत्र करा आणि ती पेस्ट चेहऱ्यावर लावा. पाच मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवा. हा स्क्रब असल्यामुळे काढताना बोटांनी सर्क्युलर मोशनमध्ये तो स्क्रब काढा.

नारळपाण्याने भिजवा फेसपॅक

मसाज झाल्यावर फेशिअलमधील सर्वात महत्त्वाची स्टेप असते ती म्हणजे फेस पॅक. या फेशिअलसाठी फेस पॅक तयार करण्यासाठी तुम्ही  दोन चमचे बेसन, एक चमचा मध, चिमुटभर हळद एकत्र मिक्स करू शकता. फेसपॅक भिजवण्यासाठी नारळपाण्याचा वापर करा. चेहऱ्यावर वीस मिनीटं तो ठेवा आणि चेहरा धुवून टाका. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य