आपलं जग

तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो तुमचा आवडता ‘रंग’

Trupti Paradkar  |  Jun 6, 2019
तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो तुमचा आवडता ‘रंग’

 

प्रत्येक रंगाला एक विशिष्ठ महत्त्व आहे. प्रत्येकाच्या आवडीचा एक रंग असतो. आवडीचा रंग पाहिल्यावर मूड छान होतो. कारण त्या रंग आणि तुमच्या स्वभावामध्ये काहीतरी संबध असतो. ज्या रंगासोबत तुमचं सूत जुळतं ते रंग पाहून तुमच्या मनात आनंदाच्या भावना निर्माण होतात. यासाठीच जाणून घ्या कोणता रंग तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो…

लाल रंग –

लाल रंगात सर्वांना आकर्षित करण्याचं सामर्थ्य असतं. म्हणूनच या रंगाला ऊर्जा आणि उत्साहाचं प्रतिक मानलं जातं. लाल रंग आवडणारी माणसं मनमिळावू आणि तेजस्वी असतात. म्हणूनच जेव्हा तुम्हाला नव्या उमेद आणि ऊर्जेची गरज असेल तेव्हा लाल रंगाचे कपडे वापरा. लाल रंगाचे कपडे वापरल्यामुळे तुम्हाला तुमच्यात झालेले आल्हाददायक बदल आपोआप जाणवू लागतील.

हिरवा रंग –

हिरवा रंग नवनिर्मितीचं प्रतिक मानलं जातं. निसर्गात हिरव्या रंगाची उधळण सतत सुरू असते. गवताच्या कोवळ्या पानांच्या हिरव्या रंगापासून जंगलातील गर्द हिरव्या रंगाच्या अनेक छटा या रंगात दडल्या आहेत. हिरवा रंग आवडणारी व्यक्ती आनंदी स्वभावीची असते. हिरवा रंग मन आणि डोळ्यांना थंडावा देतो. म्हणूनच जेव्हा तुम्हाला थकल्यासारखं आणि निराश वाटू लागेल तेव्हा हिरव्या रंगाचे कपडे वापरा. ज्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक समाधान मिळेल.

निळा रंग –

निळा रंग हे भव्यतेचं प्रतिक आहे. म्हणूनच आकाश आणि समुद्राचा रंग निळा असतो. ज्यांना निळा रंग आवडतो अशी माणसं नेहमी सर्वांचा विचार करणारी असतात. निळा रंग आवडणाऱ्या लोकांकडे नेतृत्व कुशलता असते. लोकसंग्रह आणि सामाजिक सन्मान या लोकांना आपोआप मिळतो. जर तुम्हाला तुमच्या टीमचे नेतृत्व करायचे असेल तर निळ्या रंगाला नेहमी प्राधान्य द्या.

काळा रंग –

काळ्या रंगाकडे शोषून घेण्याची ताकद असते. म्हणूनच काळा रंग आजूबाजूच्या वातावरणाला आपल्या रंगात सामावून घेतो. दुसऱ्यावर प्रभुत्व गाजवण्याची आवड असलेल्या लोकांना काळा रंग फार आवडतो. सतत काळे कपडे घातल्यामुळे तुमच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात.

पांढरा रंग –

पांढऱ्या रंगातून अनेक रंगाची निर्मिती होत असते. तरिही पांढऱ्या रंगाला रंगहीन म्हटले जाते हे एक आश्चर्यच आहे. पांढरा रंग शांती आणि समाधानाचे प्रतिक आहे. पांढरा रंग निवृत्त वृत्तीचे दर्शन घडवत असतो. ज्या लोकांना पांढरा रंग आवडतो अशी माणसं कोणाच्या जीवनात कधीच ढवळाढवळ करीत नाहीत. सर्वांमध्ये असूनही सर्वांपेक्षा अलिप्त राहण्याची त्यांना आवड असते. पांढरा रंग आवडणाऱ्या व्यक्ती शांत आणि समजूतदार स्वभावाच्या असतात. जेव्हा तुमच्या मनात विचारांचं काहूर माजलेले असेल अशा वेळी पांढरा रंगाचे कपडे वापरा ज्यामुळे तुमचे मन शांत आणि निवांत होईल. बुद्धपौर्णिमेसाठी शुभेच्छा आणि पांढऱ्या कपड्यांचं महत्त्व असतं.  

केशरी रंग –

उगवत्या सुर्याच्या किरणांचा रंग केशरी असतो. केशरी रंग नवीन सुरूवात करण्याचे प्रतिक मानला जातो. यासाठीच एखादी नवी सुरूवात करताना केशरी रंग वापरणे शुभ मानले जाते.जुनं विसरून नव्याने सुरूवात करणार असाल तर केशरी रंग वापरा ज्यामुळे भुतकाळाच्या काळ्या छटा तुम्हाला त्रास देणार नाहीत.

गुलाबी रंग –

मुलींचा आवडता रंग म्हणून गुलाबी रंग ओळखला जातो. गुलाबी रंग आवडणारी माणसं प्रेमळ आणि समजूतदार असतात. प्रियकराला आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबी रंगाचे कपडे घाला. गुलाबी रंगाचा त्याच्यावर चांगला प्रभाव पडेल.

पिवळा रंग –

पिवळा रंग उबदार असतो. हा रंग आवडणारी माणसं प्रेमळ वृत्तीची असतात. म्हणूनच हिवाळ्यात या रंगाचे कपडे वापरले जातात. जर तुम्हाला एखाद्याला समजवण्याची गरज असेल अथवा एखाद्या सोबत असलेले भांडण मिटविण्याची गरज असेल तर पिवळा रंग वापरा.

जांभळा रंग –

जांभळा रंग मजबूत मनाचे प्रतिक आहे. जांभळा रंगाला अध्यात्मिक छटा आहेत. त्यामुळे मेडीटेशनसाठी तुम्ही या रंगाचा वापर करू शकता. या रंगामुळे तुम्हाला सतत फ्रेश वाटू शकतं. म्हणूनच जेव्हा तुम्हाला मन खंबीर करण्याची गरज असेल तेव्हा जांभळ्या रंगाचे  कपडे वापरा.

तुमचा स्वभाव तुमच्या आवडत्या रंगाप्रमाणे आहे का हे आम्हाला कंमेट देऊन जरूर कळवा.

अधिक वाचा – 

डोळ्यांचा रंग सांगतो व्यक्तीचा स्वभाव

#ZodiacFriends: राशीवरून ठरवा तुमचे मित्रही आहेत का अशाच स्वभावाचे

तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींनी कळतो तुमचा स्वभाव

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From आपलं जग