मनोरंजन

जनता कर्फ्यूला मुंबईकरांचा आणि सेलेब्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Aaditi Datar  |  Mar 22, 2020
जनता कर्फ्यूला मुंबईकरांचा आणि सेलेब्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई म्हणजे धावतं शहर…पण कधीही न थांबणारी मुंबई आज थांबली आणि पुढचे काही दिवसही थांबणार आहे. पण सर्व मुंबईकरांच्या भल्यासाठीच. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी 22 मार्चला सकाळी 7 ते रात्री 9 जनता कर्फ्यूची घोषणा केल्यानंतर मुंबईकरांनी त्याचं तंतोतंत पालन केलं. सोशल मीडियावर थांबलेल्या मुंबईचे अनेक व्हिडिओज आणि फोटोज व्हायरल झाले.

एवढंच नाहीतर संध्याकाळी पाच वाजता मुंबईकरांनी आपापल्या घरातील खिडक्या आणि गॅलरीमध्ये येत नादब्रम्ह करून कोरोनाच्या काळातही अविरत सेवा देणाऱ्या वीरांना सलामही केलं.

पंतप्रधान मोदींनी मानले जनतेचे आभार

पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यू  आणि नादब्रम्ह केल्याबद्दल जनतेचे आभार मानले आणि ट्वीट केलं की, हा धन्यवादाचा नाद आहे. पण सोबतच एका मोठ्या लढाईतील विजयाची सुरूवात आहे. चला या संकल्पासोबतच याच संयमाने एका मोठ्या लढाईसाठी स्वतःला (Social Distancing) च्या बंधनात बांधूया. #JantaCurfew

मराठी सेलेब्सनीही केलं सलाम

कोरोना वीरांना सलाम करण्यासाठी मराठीतील सेलिब्रिटीजही सहभागी झाले होते. यातील काही सेलेब्सचे व्हिडिओज खाली शेअर करत आहोत. पाहूया कोणकोणते मराठी सेलिब्रिटीज उत्स्फूर्तपणे नादब्रम्हात सहभागी झाले.

ज्येष्ठ अभिनेते निर्माते महेश कोठारे आणि सर्व कुटुंबियांनी उत्स्फूर्तपणे नादब्रम्हात सहभाग घेतला. छोटी जिजाही यात सहभागी झाली होती. 

सध्या होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या अभिनेता अमेय वाघने, नाटकाचे shows बंद असले तरी आम्ही balcony भरवतो! A big thank you to everyone fighting against Corona! Max Prem ❤️अशी कमेंट करत नादब्रम्ह केला. 

अभिनेता भूषण प्रधानने उत्स्फूर्तपणे शंखनाद केला. 

अभिनेता आणि सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने, माझ्या माणसांसाठी..माझ्या देशासाठी ….घंटानाद.. तामण.. टाळ्या ….. जय हिंद असा संदेश लिहीत नादब्रम्ह केला.  

अभिनेता अकुंश चौधरी, अजित परब, विशाल इनामदार आणि निखील नेरूरकर टाळ्यांचा नाद करताना. 

मराठी सेलेब्रिटी कपल अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर. 

अभिनेता कुशल बद्रिके आपल्या कुटुंबासोबत. 

अभिनेते शिवाजी साटम त्यांच्या नातवांसोबत उत्साहाने टाळ्यांचा नाद करताना. 

अभिनेता संदीप पाठक मुलांसोबत. 

मग आपणही लढाई अशीच सुरू ठेवूया आणि सरकारला सहकार्य करूया. कोरोनाला न घाबरता त्याचा सामना करूया. POPxo Team ला विश्वास आहे की, ही लढाई आपणच जिंकू. घरी राहा आणि सुरक्षित राहा.

गरोदरपणात कोरोना व्हायरसपासून कसे सुरक्षित राहाल

हे अन्न खाऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवा, कोरोनापासून दूर राहा

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

Read More From मनोरंजन