DIY लाईफ हॅक्स

बाहेर तर जायचं नाही मग घरच्याघरी करा हे गेम्स खेळून टाईमपास

Aaditi Datar  |  Mar 30, 2020
बाहेर तर जायचं नाही मग घरच्याघरी करा हे गेम्स खेळून टाईमपास

कोरोना व्हायरसला टाळण्यासाठी भारताने लॉकडाऊन केल्याने प्रत्येकजण घरात राहून सहकार्य करत आहे. या जीवघेण्या व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी घरात राहणं आणि एकाचवेळी जास्त लोकं जमा न होणं आवश्यक आहे. त्यामुळे लोकं घराबाहेर पडत नाहीयेत. पण सतत घरात राहून करायचं तरी काय, एकवेळ वर्क फ्रॉम होम असणाऱ्यांचं ठिक आहे. बिचाऱ्या बच्चेकंपनीचं काय? मग अशावेळी वेळ घालवण्यासाठी आणि कंटाळा दूर करण्यासाठी खास घेऊन आलो आहे काही गेम्सची लिस्ट.

लक्षात आहे का, उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच पहिली खरेदी व्हायची ती सापशिडीची किंवा कॅरमबोर्डची. मग पुन्हा एकदा मजा घेऊया ल्युडो-सापशिडी आणि कॅरमची. कारण हे खेळ खेळताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. इतके मजेशीर हे खेळ आहेत. यासोबतच तुम्ही ऊनो, पिकनिक किंवा अगदी नवा व्यापार असेही खेळ मुलांसोबत खेळू शकता. जर तुमच्याकडे जास्त जण नसतील तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा हे गेम्स खेळू शकता. 

सात तीन दोन, बदाम सात, चॅलेंज, झब्बू किंवा मेंढी कोट असे पत्त्यांमधले अनेक डाव तुम्ही खेळू शकता. अगदी दोघंच असतील तर रम्मीसुद्धा खेळता येईल. पत्त्यांचा डाव रंगू लागला की, वेळ अगदी पटापट जातो. आजकाल तर पत्ते ऑनलाईनही खेळता येतात.  

बैठे-बैठे क्या करे, करना है कुछ काम, शुरू करे अंताक्षरी ले के प्रभू का नाम..म…मग सध्या इन्स्टावरही सेलिब्रिटींची व्हर्च्युअल अंताक्षरी सुरू आहे. हा असा खेळ आहे जो एक वेगळाच माहौल बनवतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या खेळात सगळेच सहभागी होऊ शकतात. 

अंताक्षरीसोबतच हा खेळही सर्वांना ठाऊक आहेच. जर तुम्हाला हा खेळ माहीत नसेल तर आम्ही सांगतो. आधी दोन टीम्स पाडा, मग समोरच्या टीममधील एका मेंबरला चित्रपटाचं नाव सांगून ते न बोलता इशाऱ्यांनी त्यांच्या टीमला सांगण्यास सांगा. जर त्यांनी ते ओळखलं तर त्यांना पॉईंट मिळणार. जे जास्त नाव ओळखतील ते विजेता ठरतील. 

जपानमध्ये विकसित झालेला हा खेळ आज जगभरात मनोरंजनासाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक घरातील एका तरी व्यक्तीला गाण्याची आवडही असतेच. जुनी गाणी स्वतः माईक घेऊन गाण्यात आणि दुसऱ्यांनी ती एन्जॉय करण्यात वेगळीच मजा आहे. बरेच जणांकडे आजकाल कराओके सेट असतो. यात पॉईंट्सचं व्हर्जनही मिळतं.

#StayHomeStaySafe : कोरोनामुळे घरी राहून कंटाळला असलात तर करा या गोष्टी

मग तुमच्याकडे वरील कोणकोणते गेम्स आहेत. घरी हे गेम्स असतील तर उत्तम किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा ग्रुपमध्ये अनेक गेम्स खेळू शकता. तसंच तुमच्याकडे प्ले स्टेशन किंवा व्हिडिओ गेम्स असल्यास तेही खेळा. पण ऑनलाईन किंवा व्हिडिओ गेम्स खेळण्यापेक्षा असं छान कुटुंबासोबत बसून खेळण्यात खरी मजा आहे. मुलांना क्वालिटी टाईम देण्याचं समाधानही तुम्हाला मिळेल आणि तुमचं नातं अजून दृढ होईल.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

Read More From DIY लाईफ हॅक्स