DIY फॅशन

जोडीदारासोबत मॅच करता येतील असे कपल आऊटफिट

Leenal Gawade  |  Jun 17, 2021
जोडीदारासोबत मॅच करता येतील असे कपल आऊटफिट

काही खास कार्यक्रमांसाठी म्हणजे नाईटआऊट, पिकनिक, स्लीपओव्हर अशा काही खास यारी दोस्तीतल्या अशा कार्यक्रमांसाठी कपल म्हणून जाताना आपण खूप वेळा थोडे एकसारखे दिसतील असे कपडे घालतो. हल्ली तर कपल फोटोशूटसाठी खूप जण काही खास कपडे देखील निवडतात. हल्ली कपल सेट सगळीकडेच मिळतात. अगदी नाईटवेअरपासून ते वेगवेगळ्या थीमनुसार असे कपडे तुम्ही नक्की ट्राय करु शकता. तुम्हालाही खास कार्यक्रमासाठी किंवा काही खास निमित्त साधत जर असे मॅच कपडे घालायचे असतील तर आम्ही तुमच्यासाठी असेच काही खास कपडे शोधून काढले आहेत. जे तुम्ही ऑनलाईन खरेदी करु शकता.

हे नवे ट्रेंड बिनधास्त करा फॉलो, मांड्या अजिबात दिसणार नाहीत जाड

हॉट शॉट नाईट सूट

एखाद्या स्लीपओव्हर पार्टीला तेव्हाच मजा येते तेव्हा तुम्ही थीमनुसार कपडे घालता. हल्ली तर पजामा पार्टी हा प्रकार हमखास असतोच. अशावेळी जोडीदारासारखे दिसायचे असेल तर तुम्ही मस्त  असे नाईट सूट निवडू शकता. हल्ली शॉर्ट आणि लाँग पँटमध्ये असे नाईट सूट सहज उपलब्ध होतात. त्यामुळे तुम्ही असे नाईट सूट निवडू शकता. अनेक ब्रँडमध्ये तुम्हाला असे पर्याय दिसू शकतील. 

पावसाळी चपला लागत असतील तर पायांची अशी घ्या काळजी

कपल टीशर्ट

 हल्ली अनेक ठिकाणी कपल टीशर्ट असा प्रकार मिळतो.  ज्यामध्ये तुम्हाला मिस- मिसेस असे काही पर्याय मिळतात. या शिवाय तुम्ही कपल आहात हे दाखवणारे अनेक पर्याय यामध्ये उपलब्ध असतात. तुम्हाला अगदी 1हजार रुपयांपासून तुम्हाला यामध्ये वेगवेगळे पर्याय मिळतील. जे तुम्ही नक्कीच ट्राय करु शकता. यामध्ये मिळणारे वेगवेगळे रंग आणि पॅटर्न ही ट्राय करायला तुम्हाला काहीच हरकत नाही. 

कॉटनची साडी नेसण्याची सोपी पद्धत, देईल एलिगंट लुक

कपल डेनिम जॅकेट

जर तुम्ही बाहेर खूप फिरणारे असाल आणि स्टाईल करायला तुम्हाला आवडत असेल तरी देखील तुम्ही काही खास जॅकेट निवडू शकता.डेनिमची स्टाईल ही कधीही जुनी होत नाही. ही स्टाईल कायमच सगळ्यांना आवडेल अशी असते. अशावेळी तुम्हाला जर काही खास घ्यायचे असेल तर तुम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट देतील असे डेनिम जॅकेट निवडा. असे जॅकेट तुम्हाला अगदी कधीही घालता येतात. जॅकेटचा असा पर्याय हा तुम्हा दोघांवरही खुलून दिसेल. मुलींना मुलांचे जॅकेटही ओव्हरसाईज जॅकेट म्हणून कधीतरी नक्कीच घालता येईल. 

कपल ट्रेडिशनलवेअर

 एखाद्या खास समारंभासाठी जर तुम्हाला एकत्र जायचं आहे अशावेळीही तुम्ही काही खास कपडे घालायला हवे. साखरपुडा, लग्न, मुंज असा कार्यक्रमांना ट्रेडिशनलवेअर घातले जातात. जर तुम्ही साडी नेसणार असाल तर त्याचा ब्लाऊज आणि तुमच्या जोडीदाराचे नेहरु जॅकेट एकसारखे दिसत असेल तर ते अधिक चांगले दिसते. त्यामुळे तुम्ही कपल ट्रेडिशनलवेअरची निवड अगदी नक्की करा. 

 

आता हे काही पर्याय तुम्ही नक्की ट्राय करा 

 

 

Read More From DIY फॅशन