घर आणि बगीचा

मुंबईत सध्या चर्चा आहे ती पारकर बिर्याणीची. काय आहे या मागची कहाणी

Leenal Gawade  |  Dec 14, 2020
मुंबईत सध्या चर्चा आहे ती पारकर बिर्याणीची. काय आहे या मागची कहाणी

लॉकडाऊनने अनेकांच्या आयुष्यात चढ- उतार आणले. काहींंना कोरोनाने ग्रासले तर काहींच्या नोकऱ्या सुटल्या. आर्थिक चणचणीमुळे अनेकांना ग्रासले. गरीब, मध्यमवर्ग आणि अगदी श्रीमंतानांही याची झळ पोहोचली. काहींनी हार मानली तर काहींनी आहे त्या परिस्थितीला लढा देण्याची तयारी दाखवली. मुंबईचा मराठमोळा मुलगा अक्षय पारकर बड्या पगाराची नोकरी सुटली म्हणून हताश न होता उत्तम जेवणाच्या कौशल्याने बिर्याणीचा बिझनेस दादरसारख्या ठिकाणी सुरु केला. आज दादरमध्ये बिर्याणी म्हटली की, पारकर बिर्याणीचे नाव घेतले जाते. अशा या दादर पारकरचा यशस्वी प्रवास तुम्हाला थक्क करेल. पण नवी उमेद जागवत काहीतरी नवी करण्याची प्रेरणाही नक्कीच देईल.

यश कधी मिळेल सांगता येत नाही, KFC मागील यशोगाथा

शेफची नोकरी आणि मोठा पगार

Facebook

शिकून चांगली नोकरी मिळावी. चांगला पगार मिळावा असे प्रत्येकांचे स्वप्न असते. लॉक्डाऊन सुरु झाल्यानंतर क्रुझवर शेफ म्हणून काम करणाऱ्या अक्षयला मुंबईत परत पाठवण्यात आले. परदेशातून आल्यानंतर काही काळात हे सगळं संपेल असे वाटले होते. पण असे काहीच झाले नाही. कोरोना अधिक वाढत गेला आणि नोकरी जाण्याचे स्वप्न अधिक घोंगावत राहिले. अचानक कंपनीकडून 150 डॉलरची शेवटमी मदत आली आणि नोकरी गेल्यातच जमा झाले. हे एवढे रुपये किती दिवसांसाठी पुरणार ? काहीतरी करं असे त्याच्या आईला वाटत होते. बेताची परिस्थिती असल्यामुळे काम करणे हे फार गरजेचे होते. त्यामुळेच सुरुवातीला बिर्याणी स्टॉल सुरु करायचे त्याने ठरवले. पण लॉकडाऊनचा काळ, कोरोनाची भीती या सगळ्यामध्ये लोकांनी आधी म्हणावी तितकी बिर्याणी घेतली नाही. रोज 1 ते 1 ½ किलोची बिर्याणी बनवून देखील ती अर्ध्यापेक्षा जास्त शिल्लक राहायची. सुरुवातीला ही बिर्याणी फुकट जाऊ नये म्हणून आजुबाजूच्यांना फुकटही देऊ केली. पण अक्षय हा उत्तम शेफ असल्याचे त्याच्या बिर्याणीच्या चवीवरुन लक्षात आले.

International Women’s Day: जिद्द असेल तर यश मिळतेच,जाणून घेऊया यशस्वी महिलांच्या यशोगाथा

सोशल मीडियाची ताकद

सोशल मीडियावर त्याच्या या मेहनतीची एक पोस्ट पडल्यानंतर या क्रुझ शेफची बिर्याणी खाण्यासाठी लोकांनी अक्षरश: रांगा लावल्या. एकट्याने हे काम शक्य नसल्यामुळे त्याचे आई-वडील आणि मैत्रीण त्याला या कामात मदत करते. बिर्याणीची पूर्वतयारी करणे, बिर्याणी डिलीव्हर करणे अशी काम सध्या तरी त्याच्या घरातीलच लोकं करत आहेत. पण आता अल्पावधीतच त्याचा बिझनेस इतका वाढला की, आता त्याच्या स्टॉलवर बरीच माणसं काम करताना दिसतात. त्याच्या बिर्याणीच्या चवीची चर्चा ही दूरवर होत आहे. त्याने आता आपला उद्योग वाढवला आहे. अगदी स्टॉलवर सुरु केलेला उद्योग हॉटेलपर्यंत जावा अशी अनेकांची इच्छा आहे. 

बिर्याणी व्यवसायात पाय रोवताना

आपल्याकडे आजही बिर्याणी म्हटली की, ती मुस्लिम बांधव फार उत्तम बनवतात असा समज आहे. ही वस्तूस्थिती असली तरी देखील अक्षय त्यांच्या मुस्लिम मित्रांकडूनच उत्तम बिर्याणी बनवायला शिकला आहे. सुरुवातीला पारकर म्हणजे मराठी माणसाची बिर्याणी नेमकी कशी असेल असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण मी बनवलेल्या बिर्याणीची चव चाखल्यानंतर अनेकांना बिर्याणी ही कोणीही बनवू शकतं. पण ती बनवताना प्रेम आणि आनंद ओतणे फारच गरजेचे असते. जे अक्षयने त्याच्या बिर्याणीसाठी केले. 

अक्षयप्रमाणेच अनेकांनी आपल्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. पण हार मानू नका. आयुष्य संपवण्याचा विचार मनात येत असेल तर अक्षयच्या यशोगाथेतून काहीतरी शिका. तुम्हीही कशात तरी नक्कीच चांगले असाल हे विसरु नका.

फ्रिजमध्ये ठेवत असाल या गोष्टी तर वेळीच व्हा सावध!

Read More From घर आणि बगीचा