अनेकांना कोंड्याचा त्रास असतो. पण ते त्याकडे दुर्लक्ष करतात. ‘आमच्या घरी सगळ्यांनाच कोंड्याचा त्रास आहे. तो जातच नाही’. असे म्हणत त्याकडे दुर्लक्ष करणारे तुम्ही असाल तर तुम्हाला भविष्यात काही त्रास हमखास होण्याची शक्यता आहे. तुम्हालाही असेल कोंडा तर तुम्हाला हे त्रास नक्कीच होतील.
बांगड्या आहेत आरोग्यासाठी फायदेशीर, कसं ते जाणून घ्या
पिंपल्स
shutterstock
कोंडा केसात असला तरी त्यांना तो कायम चेहऱ्यावर उतरत असतो. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर मग या कोंड्यामुळे तुम्हाला पिंपल्स येण्याची शक्यता जास्त असते. हा कोंडा चेहऱ्यावर उतरुन तसाच राहतो. तो तुमच्या डोळ्यांना दिसत नाही. अतिरिक्त तेल चेहऱ्यावर साचल्यामुळे अनेकांना कपाळावर पिंपल्स येतात. जर या कोंड्याचे प्रमाण जास्त असेल तर मग तुमच्या गालांवरही पिंपल्स येऊ लागतात. हे पिंपल्स इतके हट्टी असतात की, ते जाता जात नाही. जो पर्यंत तुमच्या डोक्यातील कोंडा जात नाही तोवर तुमच्या चेहऱ्यावरील हे पिंपल्स जाणार नाहीत.
कोरडी त्वचा
shutterstock
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर मग तुम्हाला आणखी एक त्रास यामुळे होऊ शकतो तो म्हणजे तुमची त्वचा अधिक कोरडी होऊ शकते. तुमच्या त्वचेतील तजेला कोंड्यामुळे कमी होऊ शकतो. त्वचेवर सुरकुत्या पडणं किंवा तुमची त्वचा रुक्ष दिसणं असा त्रास या कोंड्यामुळे होतो. कोंडा जेव्हा चेहऱ्यावर पडतो. त्यावेळी तो तुमच्या त्वचेवर एक पातळ थर बनवत असतो. तुम्हाला तो तुमच्या डोळ्यांनी दिसणार नाही. पण काहीही कारण नसताना जर तुमची त्वचा फुटत असेल तर मात्र तुम्हाला थोडी काळजी घेण्याची गरज आहे. कारण हा त्रास तुम्हाला कोंड्यामुळे होतोय.
तुमच्याही पिरेड्सच्या तारखा नेहमी चुकतात..जाणून घ्या कारणं आणि घरगुती इलाज
चाई पडणे
shutterstock
कोंड्यामुळे केसगळती होणे अगदी स्वाभाविक आहे. पण कोंड्यावर योग्यवेळी इलाज केला नाही तर मात्र चाई पडण्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. चाई पडणे म्हणजे एका अर्थाने टक्कल पडणे. चाईमध्ये तुमच्या डोक्यावरील कोणत्याही भागाचे केस हे गळू शकतात. केसांचे झुपकेच हातात गळून येतात. चाई पडल्यानंतर केसांसाठी काहीही करणे त्रासदायक होते. तुम्ही कोणाला चाई पडलेले पाहिले असेल तर त्याचे एक कारण कोंडादेखील असू शकते. तुम्हाला असा त्रास होत असेल तर तुम्ही आधीच तुमची तपासणी करुन घ्या.
डोळ्यांचा त्रास
shutterstock
आता तुम्ही म्हणाल कोंडा आणि डोळ्याचा काय संबंध आहेत. तर कोंड्याचा आणि डोळ्याचा संबंध आहे. तुम्ही जितके वेळा केसांमधून हात फिरवता तितक्या वेळा कोंडा तुमच्या चेहऱ्यावर उतरतो. हा कोंडा तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांवरदेखील साचायला सुरुवात होते. त्यामुळे डोळे लाल होणे, सतत डोळ्यांना खाज येणे असे त्रास तुम्हाला साहजिकच होऊ लागतात.
आता जर तुम्हाला कोंडा असेल तर त्यावर योग्य इलाज करुन घ्या.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.