DIY सौंदर्य

डी टॅनसाठी वापरा गव्हाचे पीठ, असा करा घरच्या घरी फेसपॅक तयार

Trupti Paradkar  |  Aug 17, 2021
de tan your face with this homemade wheat face mask

आजकाल ऋतू कोणताही असो प्रखर सूर्यकिरणांमुळे त्वचा टॅन होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळे चेहरा, मान, हात, पाय टॅन होतात. बीच अथवा डोंगराळ भागात पिकनिकला गेल्यावर त्वचा टॅन होतेच. शिवाय याचा सर्वात जास्त परिणाम तुम्हाला चेहऱ्यावर जाणवतो. हे टॅनिंग काढण्यासाठी पार्लरमध्ये विविध ट्रिटमेंट केल्या जातात. विशेष म्हणजे कितीही महागडा आणि प्रभावी डी टॅन फेसपॅक लावूनही हवा तसा परिणाम मिळेलच असं नाही. शिवाय एकदा त्वचा टॅन झाली की ती पूर्वीसारखी होण्यास बराच काळ जातो. यासाठीच आम्ही यावर तुम्हाला एक घरगुती उपाय सांगत आहोत. जो करणं महाग तर नाहीच शिवाय खूप प्रभावी देखील आहे.

डी टॅनसाठी वापरा गव्हाचे पीठ

आपल्या प्रत्येकाच्या घरी गव्हाचे पीठ असतेच.  पोळी, पुरी, पराठा, भटुरे करण्यासाठी सतत गव्हाचे पीठ घरात तयार ठेवावे लागते. तुम्ही हे गव्हाचे पीठ तुमच्या त्वचेचं  टॅनिंग काढण्यासाठी वापरू शकता. कारण गव्हामध्ये असलेले गुणधर्म तुमच्या त्वचेला मुळापासून स्वच्छ आणि उजळ करतात. गव्हाचे पीठ वापरून तुम्ही तुमची त्वचा पुन्हा नेहमीसारखी उजळ आणि चमकदार करू शकता. शिवाय यासाठी तुम्हाला कोणताही खर्च करण्याची गरज नाही.

कसा कराल डी टॅन फेसमास्क

गव्हाचे पीठ वापरून डी टॅन फेसमास्क तयार करणं खूपच सोपे आहे.

साहित्य – 

कसा तयार कराल-

सर्व साहित्य एकत्र करा आणि हा  तयार फेसपॅक चेहरा, मान आणि टॅन झालेल्या त्वचेवर लावा. पॅक सुकल्यावर हाताच्या बोटांनी सर्क्युलर मोशनमध्ये हळुवारपणे तो काढा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. चांगल्या परिणामासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा हा फेसमास्क नक्कीच वापरू शकता. यातील गव्हाचे पीठ आणि दलिया तुमच्या त्वचेवर नैसर्गिक स्क्रबप्रमाणे प्रभावी ठरतात. मध अॅंटि बॅक्टेरिअल असल्यामुळे त्वचेचे जीवजंतूपासून संरक्षण होते. दह्यामध्ये ब्लीचिंग घटक असल्यामुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होते. गुलाबपाणी त्वचेला थंडावा देते त्यामुळे त्वचेचा दाह होत नाही. नारळाच्या तेलामुळे त्वचेच्या इतर समस्या कमी होतात आणि त्वचा लवकर बरी होण्यास मदत होते. हा पॅक तुम्ही कधीही आणि केव्हाही करून त्वचेवर वापरू शकता. शिवाय जर त्वचा टॅन झालेली नसेल तरी त्वचेवरील काळे डाग कमी करण्यासाठी अथवा त्वचा उजळ करण्यासाठी तुम्ही हा फेसमास्क वापरू शकता.

तुम्ही हा उपाय केला का आणि केल्यास तुम्हाला त्याचा काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

कोरफडाने करा क्लिन अप, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

चेहऱ्याची चमक वाढवतील या क्रिम्स, नक्की करा ट्राय

झटपट दूर होईल सनटॅन, करा हे घरगुती उपचार

 

Read More From DIY सौंदर्य