DIY फॅशन

नागपूरमधील या Designer Boutiquesमध्ये करा मस्त शॉपिंग (Designer Boutiques In Nagpur)

Leenal Gawade  |  Jul 25, 2019
नागपूरमधील या Designer Boutiquesमध्ये करा मस्त शॉपिंग (Designer Boutiques In Nagpur)

महाराष्ट्रातील प्रत्येक प्रमुख शहारांची काही ना काही खासियत आहे. म्हणजे ही शहर काही खास कारणांसाठी प्रसिद्ध आहे. उदाहरण द्यायचे झाले तर नाशिकची द्राक्षं, जळगावची केळी, नागपूरची संत्री, गोव्याची काजू फेणी, विदर्भाचा तांबडा पांढरा रस्सा, नागपूरची संत्री आणि ही यादी वाढतच जाणारी आहे. आज आपण नागपूर शहराची एक वेगळी ओळख करुन घेणार आहोत. तुम्ही नागपूरला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या ठिकाणी शॉपिंग करु शकता.आज आम्ही तुमच्यासाठी नागपूरमधील काही designer boutiquesची यादी खास तुमच्यासाठी काढली आहे. नागपूरमध्ये शॉपिंग करण्यासाठी ही तुम्हाला मदत करेल.

अरे आमचे नागपूर आहेच खास (Nagpur Speciality)

Instagram

नागपूर म्हटलं तर डोळ्यासमोर पहिल्यांदा येतात ती म्हणजे गोड, रसाळ, ताजी अशी नागपूरची संत्री. पण नागपूर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. नागपूर महाराष्ट्राचे एक मुख्य शहर आहे. महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूर ओळखले जाते. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नागपूरचे आहेत.हिरवेगार आणि सुंदर शहरांमध्ये नागपूरचे नाव आवर्जून घेतले जाते. आता नागपूर संदर्भातील या काही प्रमुख गोष्टी झाल्या. पण या शिवाय नागपूर तेथील पर्यटनस्थळांमुळेही ओळखले जाते. नागपूरमध्ये अंबाझरी झील, बालाजी मंदिर, पोद्दारेश्वर मंदिर,रामटेक, दीक्षाभूमि,अधासा, रामटेक,सीताबर्डी किल्ला, खेकरानाला अशी पर्यटन स्थळ आहेत. नागपूरमध्ये 100 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालय असून नागपूर विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे विद्यापीठसुद्धा आहे

नागपुरात लग्नाचे शॉपिंगही वाचा

नागपूरचे कपडेही आहेत खास (Cloth Material Famous In Nagpur)

Instagram

नागपूरची खासियत तर आपण पाहिलीच पण तुम्हाला माहीत आहे का? नागपूर कापडासाठीही प्रसिद्ध आहे. नागपूरची आणखी एक खासियत म्हणजे नागपूरमध्ये सगळ्यात आधी कापड गिरणी सुरु झाली. आता हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. कारण मुंबईमध्ये कापड गिरण्या सगळ्यात आधी सुरु झाल्या हे आपल्याला माहीत आहे. पण  नागपूर हे असे शहर आहे ज्या ठिकाणी मुंबई आधी कापड गिरणी सुरु करण्यात आली. सर जमशेदजी टाटा यांनी पहिली कापड गिरणी (textile mill) नागपूर येथे सुरु केली. त्यानंतर मुंबईमध्ये कापड गिरण्या सुरु झाल्या. त्यामुळे कपड्याबाबतीत नागपूरचा पहिला क्रमांक लागतो. नागपूरमध्ये मिळणाऱ्या कपड्यांबाबत सांगायचे झाले तर नागपूरमधील खादी हा कपडा फारच प्रसिद्ध आहे. आजही या ठिकाणी खादी खरेदीसाठी लोकं येतात. नागपूरातील राजकारणीही म्हणूनच खादीचा अधिक वापर करतात.

त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरता येतात चारकोल ब्युटी उत्पादनं, काय आहेत फायदे

नागपूरमधील 18 प्रसिद्ध डिझायनर बुटीक (Top 18 Designer Boutique In Nagpur)

नागपूरची खासियत वाचून तुम्हालाही नागपूरमध्ये शॉपिंग करायची इच्छा नक्कीच झाली असेल. आता नागपूरमधील प्रसिद्ध अशी बुटीक पाहूयात जिथे तुम्ही अगदी बिनधास्त आणि मस्त शॉपिंग करु शकता.

वाचा – टॉप 10 ट्रेंडी स्टायलिश ब्लाउज बॅक डिझाईन

1.वस्त्रम बुटीक डिझायनर स्टुडिओ (Vastram Boutique Designer Studio)

justdial

*पत्ता (Address): ओमकार टॉवर, पहिला मजला, विदर्भ मोटर्सच्यावर,अमरावती रोड, रवी नगर,नागपूर: 440001

*कसे जाल (How to reach): रवी नगरला जाण्यासाठी अनेक बस किंवा खासगी गाड्या आहेत. नागपूरचा प्रसिद्ध भाग असल्यामुळे या ठिकाणी पोहोचणे सोपे आहे.

*बुटीकची खासियत(Boutique speciality): जर तुम्ही साडी खरेदीचा विचार करत असाल तर वस्त्रम हे बुटीक तुमच्यासाठी उत्तम आहे. या ठिकाणी तुम्हाला साड्यांसोबत चांगले डिझायनर कुडते ही मिळतील. दिसायला हे बुटीक फार साधे वाटत असले तरी अनेकांनी हे बुटीक चांगले असल्याचे म्हटले आहे. 

* कपड्यांची रेंज (Cloth range approx): साधारण 500 रुपयांपासून पुढे 

Also Read What Is Palazzo In Marathi

2.रेनम्स डिझायनर बुटीक(Renams Designer Boutique)

justdial

*पत्ता (Address): शॉप क्रमांक 16, गणेश अपार्टमेंट,नॉर्थ अंबाझरी रोड,धर्मपेठ, वानखेडे हॉल, नागपूर- 40010

*कसे जाल (How to reach): धर्मपेठ हे नागपूरमधील प्रसिद्ध ठिकाण आहे.या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध आहे. शहराच्या मधोमध हा भाग आहे.

*बुटीकची खासियत(Boutique speciality): साड्या, ड्रेस मटेरिअल्स कुडती असे अनेक प्रकार या ठिकाणी मिळतात.खादी आणि अन्य मटेरिअलचे कपडे या ठिकाणी मिळतात.

* कपड्यांची रेंज (Cloth range approx) : 1000 रुपयांपासून तुम्हाला  कपडे मिळतील.

3.सुती (Suti Boutique)

Justdial

*पत्ता (Address): 181, गोतमारे कॉम्पेक्स, डॉ. देशपांडे हार्ट क्लिनिकच्या समोर,लक्ष्मी नगर स्क्वेअर,धर्मपेठ, नागपूर – 40010

*कसे जाल (How to reach): धर्मपेठकडे जाणाऱ्या कोणत्याही गाड्या तुम्हाला चालू शकतात.

*बुटीकची खासियत(Boutique speciality) :  धर्मपेठमधील हे प्रसिद्ध दुकान आहे. तुम्हाला या ठिकाणी कॉटन मटेरिअलच्या वेगवेगळ्या रेंजचे कपडे मिळतील. वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल.

*कपड्यांची रेंज (Cloth range approx) : तुलनेने हे दुकान थोडे महान आहे. साधारण 2000 रुपयांहून किंमतीच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळतील.

लग्नाच्या साड्यांसाठी ठाण्यामधील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

4,पॅशन लेडीज डिझायनरवेअर (Passion Designerwear)

Justdial

*पत्ता (Address): बिल्डींग क्रमांक 25, मधुलोक, रामनगर, बाजी प्रभू नगर, नागपूर- 440010

*कसे जाल (How to reach): रामनगर हा येथील प्रसिद्ध परीसर आहे.त्यामुळे या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही खासगी गाडी किंवा लोकल ट्रान्सपोर्टचा उपयोग करु शकता.

*बुटीकची खासियत(Boutique speciality):  2001 सालापासून हे बुटीक अस्तित्वात आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तुम्हाला या बुटीकमध्ये मिळतील. लग्नाची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगले डिझायर लेहंगे या ठिकाणी मिळतील.

*कपड्यांची रेंज (Cloth range approx) : 2000 पासून पुढे

5. अंबा क्रिएशन (Amba Creation)

Justdial

*पत्ता (Address): शॉप क्रमांक 5, मधू माधव टॉवर, धर्मपेठ, लक्ष्मीभवन, नागपूर-440010

*कसे जाल (How to reach): धर्मपेठ या ठिकाणी जाण्यासाठी अनेक बसेस या ठिकाणी आहेत तुम्ही बसने या ठिकाणी जाऊ शकता.

*बुटीकची खासियत(Boutique speciality): अंबा क्रिएशन हे येथील प्रसिद्ध डिझायनर बुटीक आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे मिळतील. ब्लाऊज, लेहंगा, पंजाबी ड्रेस पासून ते अगदी गाऊनपर्यंत तुम्हाला वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतील.

*कपड्यांची रेंज (Cloth range approx): 2500 हजारांच्या पुढे 

6.एस.जे. फॅशन व्हिला (SJ Fashion Villa)

Justdial

*पत्ता (Address): 5/3 विदर्भ हाऊसिंग कॉलनी, रामदास पेठ, दीक्षाभूमि स्क्वेअर, नागपूर-440010

*कसे जाल (How to reach) : रामदास पेठ हा येथील प्रसिद्ध परीसर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला अनेक पर्याय आहेत.

*बुटीकची खासियत(Boutique speciality) : बुटीक 2014साली या ठिकाणी सुरु करण्यात आले असले तरी देखील हे बुटीक या ठिकाणी जास्त प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला लेटेस्ट डिझाईनचे डिझायनर कपडे मिळतील.लग्नासाठी काही हटके घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम आहे. तुम्हाला या ठिकाणी तुमच्या फिटींगनुसार कपडे शिवून मिळतील.

*कपड्यांची रेंज (Cloth range approx) : 2500च्या पुढे

7.एथनिक हाऊस (Ethnic House)

Justdial

*पत्ता (Address): 173, धर्मपेठ एक्सटेंशन,शिवाजी नगर, मझालदार ड्रायव्हिंग स्कुल, नागपूर- 440010

*कसे जाल (How to reach): शिवाजी नगरला जाण्यासाठी तुम्हाला बस किंवा खासगी वाहनांचा उपयोग करता येईल.

*बुटीकची खासियत(Boutique speciality) : नागपूर परीसरातील हे अगदी लॅविश दुकान आहे. वेगवेगळ्या डिझाईन्सचे ब्लाऊज, लेहंगा-चोळी, साड्या असे विविध प्रकार तुम्हाला या डिझायनर दुकानांमध्ये मिळतील. खादीला दिलेला डिझायनर टचसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल.

*कपड्यांची रेंज (Cloth range approx): 3000 रुपयांपासून पुढे

8.पेहनावा बुटीक (Pehnawa Boutique)

Justdial

*पत्ता (Address): शॉप क्रमांक 1 आणि 2, निफाणे भवन, बटुक भाई ज्वेलर्सच्यासमोर, धर्मपेठ, नागपूर -440010

*कसे जाल (How to reach): धर्मपेठ हा येथील प्रसिद्ध परीसर आहे. या ठिकाणी तुम्हाला अगदी सहज जाता येईल. 

*बुटीकची खासियत(Boutique speciality) : अगदी रोजच्या कपड्यांपासून ते लग्नापर्यंतच्या वेगवेगळ्या प्रसंगासाठी तुम्हाला या ठिकाणी कपडे मिळू शकतात. विशेष म्हणजे या ठिकाणी खूप व्हरायटी असल्यामुळे तुम्हाला अनेक नव्या फॅशनचे कपडे पाहायला मिळतात. 

*कपड्यांची रेंज (Cloth range approx): अत्यंत माफक दरात तुम्हाला या ठिकाणी कपडे मिळू शकतील.

मुंबईत आलात आणि इथे नाही गेलात तर तुमच्या मुंबई दौऱ्याला नाही अर्थ

9.अमरशी गोरधनदास ( Amarashi Gordhandas)

justdial

*पत्ता (Address): शॉप क्रमांक 5,6 निमा कॉम्पलेक्स,टेंपल बाजार रोड, सीताबुल्दी, नागपूर- 440012

*कसे जाल (How to reach): सीताबुल्दी हा नागपूरातील प्रसिद्ध भाग आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी येतात. त्यामुळे तुम्हाला अगदी सहजच कोणतेही वाहन या ठिकाणी जाण्यासाठी मिळेल.

*बुटीकची खासियत(Boutique speciality): 1944 पासून हे दुकान असून याच्या अनेक शाखा विदर्भात आहे. उत्तम प्रतीचे कपडे म्हणून या दुकानाची ओळख आहे. 

*कपड्यांची रेंज (Cloth range approx): साधारण 2000 रुपयांपासून पुढे

10.चारु बुटीक्स (Charu Boutique)

Justdial

*पत्ता (Address): शॉप क्रमांक 5, सीताबुल्दी, मीना बझार, महाजन मार्केट जवळ, नागपूर- 440012

*कसे जाल (How to reach): मीना बझारला जाण्यासाठी अनेक बसेस आणि खासगी वाहन या ठिकाणी उपलब्ध आहे.

*बुटीकची खासियत(Boutique speciality) : वेगवेगळ्या डिझायनर ब्लाऊजसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. शिवाय तुम्हाला अगदी S साईज पासून ते Plus size चे सगळे पर्याय या ठिकाणी तुम्हाला मिळतील.

*कपड्यांची रेंज (Cloth range approx) : 2000च्या पुढे

11. अपर्णा बुटीक (Aparna Boutique)

Instagram

*पत्ता (Address): पहिला मजला, विशाल फर्निचर,सीताबुल्दी, नागपूर- 44012

*कसे जाल (How to reach): सीताबुल्दी हा परीसर प्रसिद्ध असून तुम्ही या ठिकाणी सहज जाऊ शकता.

*बुटीकची खासियत(Boutique speciality):  प्रत्येक नवी आाणि लेटेस्ट डिझाईन तुम्हाला या बुटीकमध्ये हमखास पाहायला मिळेल. तुम्हाला आवडतील असे अनेक पॅटर्न आणि रंग तुम्हाला या डिझायनर बुटीकमध्ये पाहायला मिळतील. 

*कपड्यांची रेंज (Cloth range approx):साधारण 3000च्या पुढे

12.स्टाईल लाईन (Styleline)

Justdial

*पत्ता (Address): शॉप क्रमांक 4, अपूर्वा अपार्टमेंट,साखरदरा, संगम बीग सिनेमा, नागपूर- 440024

*कसे जाल (How to reach): संगम सिनेमा येथील प्रसिद्ध ठिकाण असून तुम्ही येथे तुम्ही अगदी सहज पोहचू शकता.

*बुटीकची खासियत(Boutique speciality): कुडता,लेहंगा, ब्लाऊज अशा वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील येथील नव्या डिझाईन्समुळे तुम्हाला नवी डिझाईन किंवा आयडिया सुचू शकेल.

 *कपड्यांची रेंज (Cloth range approx) : 2000 च्या पुढे

13.स्मृती बुटीक (Smruti Boutique)

Justdial

*पत्ता (Address): प्लॉट क्रमांक 38, डॉ. आंबेडकर मार्ग काश्मीर लेन, बेन्झोनबाग,  नागपूर -40014

*कसे जाल (How to reach): येथे जाण्यासाठू तुम्हाला आरामात कोणतेही वाहन मिळू शकेल.

*बुटीकची खासियत(Boutique speciality): तुमच्या वेस्टर्न ड्रेसच्या आवडीसाठी हे दुकान अगदी परफेक्ट आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न पाहायला मिळतील. 

*कपड्यांची रेंज (Cloth range approx):3000 हजार रुपयांच्या पुढे

14,दर्जी द बुटीक (Darzee The Boutique)

Justdial

*पत्ता (Address): प्लॉट 265, शॉप क्रमांक 8, मिलेनियम शॉपिंग मॉल,लक्ष्मी नगर, नागपूर-44022

*कसे जाल (How to reach): लक्ष्मी नगरला जाण्यासाठी तुम्हाला कोणतीही बस मिळू शकेल.

*बुटीकची खासियत(Boutique speciality):  जर तुम्हाला कुडती आवडत असतील आणि वेगवेगळ्या मटेरिअलच्या कुडती शिवून घ्यायच्या असतीलतर तुम्ही नक्कीच या बुटीकला भेट द्यायला हवी.

*कपड्यांची रेंज (Cloth range approx) :100 रुपयांच्या पुढे

15.अ ला मोड (A La Mode)

Justdial

*पत्ता (Address): हिमालया हार्मोनी बिल्डींग, WHC रोड, लक्ष्मी नगर,नागपूर-44022

*कसे जाल (How to reach) : 8 रास्ता स्क्वेअर  परीसराजवळ हे बुटीक असून तुम्हाला या ठिकाणी जाण्यासाठी खासगी वाहन मिळू शकेल.

*बुटीकची खासियत(Boutique speciality): हे डिझायनर बुटीक असून तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, बॅग्ज असे सगळे कलेक्शन याठिकाणी मिळेल.

*कपड्यांची रेंज (Cloth range approx): 1000 रुपयांच्या पुढे

16.घुमर बुटीक (Ghoomar Boutique)

Justdial

*पत्ता (Address):प्लॉट क्रमांक 265, ब्लॉक क्रमांक 8,  मिलेनिअम मॉल, WHC रोड, लक्ष्मी नगर, नागपूर, 440022

*कसे जाल (How to reach): मिलेनिअम मॉल हा प्रसिद्ध आहे. तुम्हाला सहज या ठिकाणी जाता येईल.

*बुटीकची खासियत(Boutique speciality): कुडत्याचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील.अगदी माफक दरात तुम्हाला या ठिकाणी कुडते मिळतील.

*कपड्यांची रेंज (Cloth range approx) : 500 रुपयांपासून पुढे

17.इत्लाती बुटीक (Ithlati Boutique)

Justdial

*पत्ता (Address): प्लॉट क्रमांक 1, सुभाष नगर स्क्वेअर, सुभाष नगर, शितला माता मंदिर, नागपूर  440022

*कसे जाल (How to reach): शुभाष नगरच्या शितला मंदिर

*बुटीकची खासियत(Boutique speciality):तुम्ही जर तुमच्यासाठी काही ट्रेडिशनल वेअर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या बुटीकला नक्की भेट देऊ शकता.

*कपड्यांची रेंज (Cloth range approx): 1000रुपयांच्या पुढे

18. शारदा बुटीक (Sharda Boutique)

Justdial

*पत्ता (Address): शॉप क्रमांक, ज्योती अपार्टमेंट, जैताला रोड, सुभाष नगर, प्राईड लेक जवळ, नागपूर- 440022

*कसे जाल (How to reach): प्राईड लेकला जाणारी कोणतीही गाडी तुम्हाला चालू शकेल. 

*बुटीकची खासियत(Boutique speciality):  वाजवी दरात साड्या कुडते हवे असतील तर हे दुकान तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहे. कॉटन आणि वेगवेगळया मटेरिअलचे कुडते तुम्हाला येथे मिळतील.

 *कपड्यांची रेंज (Cloth range approx) : 500 रुपयांच्या पुढे 

FAQ

नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे. (Nagpur is famous for what ?)

Instagram

नागपूर वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. नागपूरची संत्री ही फार प्रसिद्ध आहे. या शिवाय नागपूरची खाद्यसंस्कृतीसुद्धा फारच प्रसिद्ध आहे. नागपूरमध्ये गेलात आणि तुम्ही संत्री किंवा त्यापासून बनणारी संत्रा बर्फी किंवा नागपुरी वडा भात खाल्ला नाहीत तर तुम्ही नागपूर काहीच पाहिले नाही असे होईल. या शिवाय नागपूर तेथील पर्यटनस्थळांसाठी आणि तेथील विशिष्ठ भाषेसाठी प्रसिद्ध आहे.

नागपूर हे नाव त्या शहराला कसे पडले (How nagpur got its name?)

प्रत्येक शहराच्या नावामागे काही तरी गोष्ट असल्याचे सांगितले जाते. नागपूरला जे नाव मिळाले आहे त्यामागेही एक गोष्ट सांगितली जाते. नागपूरचा शोध राजा भक्त बुलंद यांने 1705 मध्ये लावला. त्यावेळी हा भाग मध्यप्रदेशमध्ये होता. त्यावेळी त्याचे नाव फांद्रापुरा असे होते. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी बौद्ध धर्माची शप्पथ घेतली आणि त्यांनी त्याचे नाव नागपूर ठेवले. नागपूर आणि फांद्रापुरा याचा अर्थ हा सारखाच आहे. फांद्रा म्हणजे साप… नागपूरमध्ये नाग सापडतात आणि पूर म्हणजे संस्कृत अर्थानुसार पुराण. पुराणातील ‘पूर’ हा शब्द यातून घेण्यात आला आहे.

नागपूरमध्ये संत्र्यांपासून काय काय बनवले जाते?(What products made out of oranges in nagpur?)

नागपूरमध्ये संत्र्यांची जास्त लागवड होत असल्यामुळे त्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. संत्र्यापासून संत्रा बर्फी, संत्रा पावडर, संत्र्याचे वेगवेगळे पदार्थ नागपूरमध्ये तयार केले जातात.

नागपूरला भेट देण्यासाठीचा योग्य काळ कोणता? (What is the good time to visit nagpur?)

Instagram

जर तुम्ही नागपूरला जाण्याचा विचार करत असाल तर नागपूरला उन्हाळ्यात जाणे टाळा. नागपूरमध्ये उन्हाळ्यात फारच गरम होते. जर तुम्हाला नागपूरमध्ये जायचे असेल तर तुम्ही ऑक्टोबर ते मार्च आणि डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत जाऊ शकता. तुम्हाला नागपूरचे वातावरण अगदी मजेत घालवता येईल.

नागपूरमधील प्रसिद्ध ठिकाणे कोणती ?(Famous places in nagpur for shopping)

सिताबुल्दी रोड, सराफा मार्केट, कॉटन मार्केट,सदर बाजार अशी काही ठिकाण आहेत.या ठिकाणी तुम्हाला शॉपिंग करु शकता. याशिवाय नागपूरमध्ये आता नवीन मॉलसुद्धा आहेत.

Read More From DIY फॅशन