मनोरंजन

दिग्दर्शक विजू माने यांची सोनालीबद्दल केलेली ती पोस्ट चर्चेत

Leenal Gawade  |  Jan 13, 2022
विजू माने यांनी केली सोनालीची स्तुती

  वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत काम करायला दिग्दर्शकांना फार आवडते. आपला प्रोजेक्ट वेगळा व्हावा. त्याला लोकांचे प्रेम मिळावे यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मराठी चित्रपट ‘पांडू’ याने चांगलाच धुमाकूळ घातला. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला. पण या चित्रपटाच्या निमित्ताने विजू माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका आहे. पण सोनालीला या भूमिकेसाठी घेण्यासाठी विजू माने अजिबात तयार नव्हते. स्टार पदावर पोहोचलेल्या नटी आवडत नसल्याचे त्यांनी सांगितले. काय म्हणाले विजू माने ते घेऊया जाणून

इंद्रा आणि दिपूच्या नात्यात ट्विस्ट, सानूसोबत लागणार इंद्राचं लग्न

स्टार पदावर पोहोचलेल्या नटी आवडत नाहीत- विजू माने

विजू माने यांनी सोनालीसोबतचा एक फोटो शेअर करताना त्यांनी एक भल्ली मोठी पोस्ट लिहिली आहे. त्यांनी त्यात लिहिले आहे की, ठाण्यात एक इव्हेंट करत होतो. इव्हेंट मध्ये ‘ती’ परफॉर्म करणार होती. तिच्या सोबत तिची आई सगळीकडे असायची. टिपिकल हीरोइन की मम्मी वाटायचं मला. मी इव्हेंट लिहीला आणि direct केला पण त्यावेळेला काही आमचं संभाषण होऊ शकलं नाही.

पांडूच्या कास्टिंग बद्दल चर्चा सुरू असताना अचानक अश्विन पाटील ने तिचे नाव काढलं. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर तिचं नाव येताक्षणी मी हंड्रेड पर्सेंट कन्व्हिन्स्ड नव्हतो. पण झी स्टुडीओज् चे सर्वेसर्वा मंगेश कुलकर्णी आणि अश्विन यांनी मला पटवून दिलं.

मी कन्व्हीन्स नसण्याचं कारण मला स्टार पदाला पोहोचलेल्या नट्यांचे नखरे आवडत नाहीत.

मौनी रॉयचे लग्न, गोव्यामध्ये रंगणार लग्नसोहळा

सिनेमातल्या कॅरेक्टर पेक्षा यांच्या कॅरेक्टरवर अधिक बोललं जातं.

सगळ्या पर्यायांमधून शेवटी एकदाचं तिचं कास्टिंग झालं, सिनेमा झाला,

आणि ही पोरगी आपली एकदम झक्कास मैत्रीण झाली.

सोनालीबद्दल ऐकल्या होत्या अनेक गोष्टी

इतर सगळ्यांप्रमाणे विजू माने यांनी देखील सोनालीबद्दल बरेच ऐकले होते. त्यात वाईट गोष्टी अधिक होत्या. त्या विषयी ते म्हणतात की, खरंच स्टारपद असलेल्या हीरोइन बद्दल बऱ्या-वाईट चर्चा कायमच होत असतात. तो त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे. पण मी सोनालीबद्दल का कोण जाणे थोडं वाईटच असं ऐकून होतो. सेटवर खूप त्रास देते, दिग्दर्शकाला स्वतःच्या सूचना देते. पहिला दिवस शूटिंगचा येईपर्यंत मला सतत असं वाटायचं, की माझ्या आणि तिच्यात सेटवर खटके उडणार. पण to my surprise सेट वरच्या पहिल्या शॉट पासून ते प्रमोशन च्या शेवटच्या दिवसापर्यंत आमच्यात वादाचा असा मुद्दाच आला नाही. मुळात ती माझ्या अपेक्षेपेक्षा अत्यंत वेगळी होती. सेटवर कधीही एक सेकं देखील उशिरा पोहोचली नाही. उलट दिलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटे तरी आधी ती कुठेही हजर असते. मग ती मीटिंग असो, शिबिर असो, फोटोसेशन असो, डान्स असो, किंवा शूटिंग असो. आपण सेटवर असताना इतर कुठल्याही गप्पा न मारता, केवळ आपल्या सिनेमातील कॅरेक्टरबद्दल गप्पा मारायची. 

त्यामुळे एकूणच सोनलीची मेहनत या चित्रपटासाठी चांगलीच कामाला आली आहे. आता तु्म्ही अजूनही पांडू पाहायला हवा. म्हणजे विजू माने यांचे म्हणणे तुम्हालाही पटेल.

मौनी रॉयचे लग्न, गोव्यामध्ये रंगणार लग्नसोहळा

Read More From मनोरंजन