Festival

DIY: दिवाळीला स्वतःच्या हाताने घर सजवण्यासाठी सोप्या टीप्स

Trupti Paradkar  |  Oct 23, 2019
DIY: दिवाळीला स्वतःच्या हाताने घर सजवण्यासाठी सोप्या टीप्स

दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि उत्साहाचा सण. दिवाळीला सुरूवात होण्याआधीच खरेदी आणि घर सजावट केली जाते. दिवाळीला नातेवाईक, मित्रमंडळी घरी येतात. आपण एकमेकांना आवर्जून दिवाळीच्या शुभेच्छा (diwali wishes in marathi) देतो. यासाठी दिवाळीसाठी घरात सजावट करून थोडे वेगळेपण देण्याकडे अनेकांचा कल असतो. यंदाची दिवाळी खास करायची असेल तर आम्ही दिलेल्या या टीप्स वापरून स्वतःच ही सजावट करा. कारण स्वतःच्या हाताने घर सजवण्याच एक वेगळीच मौज आहे. घरी  तयार केलेला कंदील, दिवे आणि पूजेचे ताट तयार करण्यासाठी या टीप्स नक्कीच तुमच्या फायद्याचे ठरेल. या टीप्स आपल्यासोबत फेविक्रिल तज्ज्ञ भावना मिश्रा यांनी शेअर केल्या आहेत. 

दिवाळी कंदील –

साहित्य – फेविक्रिल वॉटर बेस्ड ग्लास कलर्स किट, फेविक्रिल फॅब्रिक ग्लु ,ओएचपी शीट्स, पट्टी, पेन्सिल, गोल्डन कार्ड पेपरची हाफ इम्पिरिअल शीट, पेपर कटर, गोल्डन रंगाचा थ्रेड, रंगीत लाकडी मणी, ऑर्नामेंटल स्टोन्स (फिकट गुलाबी व पांढरे, लहान आकाराचे), कात्री, कलर पॅलेट, वॉटर कंटेनर 

कंदील तयार करण्याची पद्धत 

स्टेप 1 – 

गोल्डन रंगाचा कार्ड पेपर घ्या.

त्यावर 11” x 8” आकाराचे दोन आयत आखून घ्या व कापून घ्या. दोन्ही आयतांवर चिकटवण्यासाठी मध्ये 1” अंतर ठेवा.

स्टेप 2 – 

आयतांचे कटआउट घ्या आणि सर्व बाजूंनी ½” सीमा ठेवून झिग-झॅग पॅटर्न काढा. इमेज पाहा. 

स्टेप 3 – 

झिग-झॅग पॅटर्नच्यामध्ये निर्माण झालेले त्रिकोण पेपर कटरने कापा व काढून टाका. 

पायरी 4 – 

दोन कटआउट डिझाइन आयत फोल्डिंग लाइवर दुमडा.

इमेज पाहा.

स्टेप 4 –

ओएचपी शीट घ्या, त्यावर तुमच्या आवडीच्या रंगाच्या वॉटर बेस्ड ग्लास कलर्सनी तसाच झिग-झॅग पॅटर्न पेंट करा. आम्ही टोमॅटो रेड 851, पिंक 856 व ऑरेंज 860 हे रंग घेतले आहेत. सुकू द्या.

स्टेप 5 – 

सुकल्यानंतर, पेंटेड ओएचपी फॅब्रिक ग्लुने कार्ड पेपर कटआउटच्या एका बाजूला चिकटवा.

सुकू द्या.

स्टेप 6 –

आयताकृती खोक्याचा आकार देण्यासाठी, दोन आयत फॅब्रिक ग्लुने जोडा व चिकटवा. सुकू द्या.

स्टेप 8 –

गोल्डन धागा व लाकडी मणी घ्या. कंदील टांगण्यासाठी सुंदर दोरी तयार करण्यासठी धाग्यामध्ये मणी ओवा. तुम्हाला मणी ओवलेल्या अशा 4 दोऱ्या लागतील.आयताकृती कंदिलाच्या चारही कोपऱ्यांना आतल्या बाजूने धागा फॅब्रिक ग्लुने चिकटवा किंवा धागा बांधण्यासाठी चारही बाजूंना भोक पाडा. धागे टिकून राहण्यासाठी, कंदिलाच्या टोकाशी गोल्डन गोंडे लावा.

स्टेप 9 –

फॅब्रिक ग्लुने पांढरे व गुलाबी ऑर्नामेंटल स्टोन चिकटवून कंदील सजवा. पूर्णतः सुकू द्या.

निऑन रंग असणारा गोपुर दिवा

साहित्य – अॅक्रिलिक रंग पांढरा 27, निऑन पिंक 018, QsfofØy 3 D आउटलाइनर पांढरा 707, फेव्हिक्रिल फॅब्रिक ग्लु, फाइन आर्ट ब्रश, टेराकोटा गोपुर आकाराचा दिवा, बॉल चेन (निळा, सिल्व्हर रेड), काचेचे मणी (निळा, पांढरा), फॉइल मिरर (लहान, गोल आकाराचे), ग्लिस मिरर (डायमंड), कलर पॅलेट, पाण्यासाठी भांडे 

स्टेप 1

टेराकोटा दिवा धुवून घ्या. अॅक्रिलिक रंग पांढरा 27च्या बेस कोटने गोपुर आकाराचा दिवा रंगवा. सुकू द्या.

स्टेप 2 –

अॅक्रिलिक रंग निऑन पिंक 018 वापरून दिवा रंगवा. पूर्णपणे सुकू द्या.

स्टेप 3 –

फॅब्रिक ग्लुचा वापर करून निळी, चंदेरी रंगाची ब्लॉक चेन, निळे, पांढरे ग्लास बीड्स, लहान आकाराचे गोल फॉइल मिरर, डायमंड आकाराचे ग्लास मिरर यांनी दिवा सजवा. सुकू द्या.

टेराकोटा दिवा –

साहित्य – अॅक्रिलिक रंग क्रिम्झन 04 (स्प्रे पेंट – रेड), QsfofØy 3 D आउटलाइनर पांढरा 707, फेव्हिक्रिल फॅब्रिक ग्लु,अॅल्युमिनिअमची ताटली (10” व्यास), A3 OHP शीट, A3 पांढरा कागद, पेन्सिल, पांढरा सीडी मार्कर, पेपर कटर, बॉल चेन (चंदेरी, लाल), ऑर्नामेंटल स्टोन (लहान आकाराचे, पांढरे), ग्लास बीड्स (केशरी रंग), हाफ कट पर्ल्स, गोल्डन रंगाचा थ्रेड, फॉइल मिरर, जुनी सीडी, कम्पास, कलर पॅलेट, पाण्यासाठी भांडे, अॅक्रिलिक रंग पांढरा 27, निऑन ऑरेंज 017, QsfofØy अॅक्रिलिक रंग पर्ल मेटॅलिक गोल्ड 352, QsfofØy 3 D आउटलाइनर पांढरा 707, QsfofØy 3 D आउटलाइनर निऑन ऑरेंज 711, QsfofØy 3 D आउटलाइनर ग्लिटर गोल्ड 401, QsfofØy फॅब्रिक ग्लु, फाइन आर्ट ब्रश, टेराकोटा दिवा, हाफ कट पर्ल्स (टिअर ड्रॉप, गोल), ऑर्नामेंटल स्टोन (सोनेरी रंगाचे), कलर पॅलेट, पाण्यासाठी भांडे

दिवा करण्याची पद्धत 

स्टेप 1 –

टेराकोटा दिवा धुवून घ्या.

स्टेप 2 –

अॅक्रिलिक रंग पांढरा 27 या बेस कोटने दिवा रंगवा. सुकू द्या. अॅक्रिलिक रंग निऑन ऑरेंज 017 व पर्ल मेटॅलिक गोल्ड 352 ने दिव्याला दुसरा कोट द्या. सुकू द्या.

स्टेप 3 –

टिअर ड्रॉप, गोल आकाराचे हाफ कट मोती व सोनेरी रंगाचे ऑर्नामेंटल स्टोन फॅब्रिक ग्लुने चिकटवून दिवा सजवा. सुकू द्या.

पूजेचे ताट करण्याची पद्धत –

साहित्य – अॅक्रिलिक रंग क्रिम्झन 04 (स्प्रे पेंट – रेड), 3 D आउटलाइनर पांढरा 707,
फेव्हिक्रिल फॅब्रिक ग्लु, अॅल्युमिनिअमची ताटली (10” व्यास), A3 OHP शीट, A3 पांढरा कागद, पेन्सिल, पांढरा सीडी मार्कर, पेपर कटर, बॉल, चेन (चंदेरी, लाल), ऑर्नामेंटल स्टोन (लहान आकाराचे, पांढरे), ग्लास बीड्स (केशरी रंग), हाफ कट पर्ल्स, गोल्डन रंगाचा थ्रेड,फॉइल मिरर, जुनी सीडी, कम्पास, कलर पॅलेट, पाण्यासाठी भांडे

स्टेप 1- 

एक अॅल्युमिनिअमची ताटली घ्या व ती स्वच्छ करा. 

स्टेप 2 –

एक A3 पांढरा कागद घ्या, त्यावर 8” व 6” व्यासाची दोन रेडिएटिंग वर्तुळे काढा. दोन वर्तुळांच्या दरम्यान भूमितीय पॅटर्न काढा. चित्रावर OHP शीट ठेवा आणि सीडी मार्करने हे डिझाइन मार्क करा. स्टेन्सिल तयार करण्यासाठी डिझाइन कापून घ्या.

स्टेप 3 –

10” व्यासाची एक अॅल्युमिनिअमची ताटली घ्या. अॅक्रिलिक रंग क्रिम्झन 04ने ताटली रंगवा किंवा लाल रंगाने स्प्रे पेंट करा. पूर्णपणे सुकू द्या.

स्टेप 4 –

रंगवलेल्या ताटलीवर स्टेन्सिल ठेवा. स्टेन्सिलच्या कोपऱ्यावर 3 D आउटलाइनर पांढरा 707 ओता. जुनी सीडी किंवा कार्ड घ्या आणि ताटलीवरील डिझाइन दिसण्यासाठी स्टेन्सिल डिझाइनवर ओतलेला 3 D ओढा. स्टेन्सिल काढून टाका; ताटलीवर तुम्हाला एम्बॉस केल्यासारखे डिझाइन मिळेल. पूर्णपणे सुकू द्या.

स्टेप 5 –

3 D आउटलाइनर पांढरा 707 लगत चंदेरी, लाल रंगाचे बॉल चेन, केशरी रंगाचे ग्लास बीड्स, हाफ कट पर्ल्स, सोनेरी रंगाचे थ्रेड, फॉइल मिरर, लहान पांढऱ्या रंगाचे ऑर्नामेंटल स्टोन फॅब्रिक ग्लुने चिकटवा व बॉर्डर व आतील भाग सजवा. पूर्णपणे सुकू द्या.

अधिक वाचा –

घराच्या सौदर्यांत भर टाकणाऱ्या ‘कॉटन आणि हँडलूम’ पडद्यांच्या टेंडविषयी बरंच काही…

Home Decor Tips : घराला सजवताना लक्षात घ्या या गोष्टी

घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी करा हे ‘5’ सोपे उपाय

Read More From Festival