घर आणि बगीचा

DIY: ट्रेंडी राहण्यासाठी आणि घर सजावटीसाठी स्वतः तयार करा ‘या’ वस्तू

Trupti Paradkar  |  Oct 5, 2019
DIY:  ट्रेंडी राहण्यासाठी आणि घर सजावटीसाठी स्वतः तयार करा ‘या’ वस्तू

दसरा, दिवाळी असे सणसमारंभ जवळ आले की शॉपिंग आणि घराची सजावटाची धांदल उडते. कमी वेळात, हवी तशी आणि बजेटमध्ये असेल  अशी खरेदी म्हणजे एक मोठी समस्याच असते. त्यात सणासुदीच्या काळात फॅशनेबल कपडे, ट्रेंडी ज्वेलरी, घराच्या सजावटीच्या साहित्याने बाजार अगदी फुलून जातो. सणासुदीला घरातील सजावटीमध्ये अगदी थोडेसे  जरी बदल केले तरी घराला पुन्हा एक नवा लुक मिळतो. शिवाय घरासोबत आपली शॉपिंगदेखील तितकीच महत्त्वाची असते. पण विचार करा जर यंदाच्या सणासुदीच्या काळात तुम्ही स्वतःच तयार केलेला एखादा कुर्ता, बांगडी अथवा सोफ्याचे कुशन असतील तर काय धमाल येईल. म्हणूनच आम्ही तुम्हाला अगदी घरच्या घरी आणि बजेटमध्ये करता येतील अशा काही गोष्टीच्या कृती देत आहोत. ज्यामुळे यंदाची दसरा-दिवाळी तुमच्यासाठी नक्कीच खास असेल. या गोष्टी तुम्ही स्वतः तयार करून तुमच्या प्रिय मैत्रिणींना गिफ्टदेखील करू शकता. या कलाकृती भावना मिश्रा, फेव्हिक्रिल तज्ज्ञ यांनी सूचवलेल्या आहेत. 

Read More: How To Use Petroleum Jelly In Marathi

कुशन कव्हर्स

घरातील सोफ्याचे कुशन कव्हर तुम्ही स्वतः तयार करून या दिवाळील घराला एक वेगळा लुक नक्कीच देऊ शकता.

रंगवण्याचे साहित्य – फेव्हिक्रिल फॅब्रिक कलर व्हाइट 227, फेव्हिक्रिल अक्रेलिक कलर पर्ल मेटॅलिक गोल्ड 352, फेव्हिक्रिल थ्री डी आउटलायनर पर्ल मेटॅलिक गोल्ड 352, फाइन आर्ट ब्रशेस

कलाकृतीसाठी साहित्य – ए थ्री आकाराचा पांढरा कागद, एथ्री ओएचपी शीट, सीडी मार्कर, पेपर कटर, स्पंज, रंगांची पॅलेट, पाण्याचे भांडे, पेन्सिल, प्लेन (लाल) कॉटनचे 

कसे तयार कराल –

स्टेप 1 – आधी डिझाईन काढून घ्या. ए फोर आकाराचा पांढरा कागद घ्या आणि त्यावर डुडल डिझाइनने हत्तीचे चित्र काढा

स्टेप 2 – स्टेन्सिल बनवा.  डिझाइनवर ओएचपी शीट ठेवा आणि सीडी मार्करने आउटलाइन करा. आणि पेपर कटरने डिझाइन कापून त्यातून स्टेन्सिल बनवा. 

स्टेप 3 – कुशन कव्हर रंगवा. लाल रंगाचे प्लेन कुशन कव्हर घ्या. त्यावर मध्यभागी स्टेन्सिल डिझाइन ठेवा आणि फॅब्रिक कलर व्हाइट 227 ने त्यावर स्पंज डॅब करा. सुकण्यासाठी ठेवा. अक्रेलिक कलर पर्ल मेटॅलिक गोल्ड 352 ने दुसरा कोट द्या. सुकण्यासाठी ठेवा. कुशन कव्हरची चौकट पर्ल मेटॅलिक गोल्ड 352 ने रंगवा. सुकण्यासाठी ठेवा. याच पद्धतीने व तेच रंग वापरून दुसरे कुशन कव्हर रंगवा. सुकण्यासाठी ठेवा. डुडल डिझाइन थ्रीडी आउटलायनर पर्ल मेटॅलिक गोल्ड 352 ने रंगवा आणि सुकण्यासाठी ठेवा. 

ट्रेंडी बांगड्या

जुन्या, प्लेन बांगड्या पेव्हिक्रिल फॅब्रिक ग्लू आणि फेव्हिक्रिल थ्रीडी आउटलायनर्सच्या मदतीने सुशोभित करा आणि सणांसाठी वापरा. 

रंगविण्याचे साहित्य –  फेव्हिक्रिल थ्रीडी आउटलायनर रेड 701, फेव्हिक्रिल थ्रीडी आउटलायनर पर्ल ब्लू 305, फेव्हिक्रिल थ्री डी आउटलायनर पर्ल मेटॅलिक गोल्ड 352, फेव्हिक्रिल फॅब्रिक ग्लू 

कलाकृतीचे साहित्य – रेशमी धाग्यापासून बनवलेल्या बांगड्या, सुशोभित खडे, जरदोसी धागा, रंगीत मणी, काचेचे मणी, गोटा पट्टी (गोल आकारातील), कट दाना (निळा रंग), टुथपिक, कात्री 

कसे तयार कराल – 

स्टेप 1 – बेस तयार करा. रेडीमेड रेशमी बांगड्या आपण सुशोभित करणार आहोत.

स्टेप 2 – बांगडी उठावदार करण्यासाठी फॅब्रिक ग्लूने बांगडीवर काही निळे कट दाना चिकटवा. हे डिझाइन पर्ल मेटॅलिक गोल्ड 352 ने उठावदार करा. आणि सुकण्यासाठी ठेवा 

स्टेप 3 – अशाच पद्धतीने वेगवेगळ्या बांगड्या सजवा त्याचप्रमाणे इतर बांगड्या घेऊन त्यावर फेव्हिक्रिल फॅब्रिक ग्लू आणि फेव्हिक्रिल थ्रीडी आउटलायनर रेड 701, फेव्हिक्रिल थ्रीडी आउटलायनर पर्ल ब्लू 305, फेव्हिक्रिल थ्री डी आउटलायनर पर्ल मेटॅलिक गोल्ड 352 रेशमी धाग्यापासून बनवलेल्या बांगड्या, सुशोभित खडे, जरदोसी धागा, रंगीत मणी, काचेचे मणी, गोलाकार गोटा पट्टी, निळ्या रंगाचे कट दाना आवडीप्रमाणे सजवा आणि सुकण्यासाठी ठेवा. 

फेस्टिव्ह कुर्ती

फेव्हिक्रि थ्रीडी आउटलायनर्स आणि फेव्हिक्रिल फॅब्रिक ग्लू वापरून तुमच्या एखाद्या साध्या कुर्तीचे रुंपातर फेस्टिव्ह कुर्तीमध्ये करा. 

रंगविण्याचे साहित्य – फेव्हिक्रिल थ्रीडी आउटलायनर यलो 703, ग्रीन 704, फेव्हिक्रिल थ्री डी आउटलायनर पर्ल ब्लू 305, पेव्हिक्रिल थ्री डी आउटलायनर पर्ल मेटॅलिक गोल्ड 352, फेव्हिक्रिल फॅब्रिक ग्लू 

कलाकृतीचे साहित्य – ए थ्री आकाराचा पांढरा कागद, पांढरा कार्बन कागद, कॉटनची प्लेन कुर्ती, काचेचे मणी (लाहन आकाराचे पिवळे, गिरवे), सोनेरी धागा, काचेचे आरसे (पानाच्या काराचे), फॉइल आरसे (गोल आणि त्रिकोणी आकाराचे), कट दाना (ब्लू), सुशोभित खडे (लहान आकाराचे निळे, हिरव्या रंगाचे), कात्री, टुथपिक

कसे तयार कराल – 

स्टेप 1 – आधी बेस तयार करा. त्यासाठी  तुमच्या आवडीची कुर्ती घ्या.

स्टेप 2 –  त्यावर डिझाइन काढा ए थ्री आकाराचा पांढरा कागद घ्या. त्यावर कुर्तीच्या आकाराप्रमाणे नेकलाइन काढून घ्या. फुलांचे आणि भौमितिक आकार वापरून साधे डिझाइन बनवा.  कुर्त्यावर नेकलाइनच्या दिशेने हे डिझाइन ट्रेस करा आणि पांढऱ्या कार्बन कागदाच्या मदतीने कुर्ती हेम करा. 

स्टेप 3 – डिझाइन रंगवा .ट्रेस केलेले फुलांचे तसेच भौमितिक आकार छोट्या आकाराचे पिवळे, हिरवे काचेचे मणी, सोनेरी धागा, पानाच्या आकाराचे काचेचे रसे, गोल आणि त्रिकोणी आकाराचे फॉइल आरसे, ब्लू कट दाना, छोट्या आकाराचे निळे आणि हिरवे सुशोभित खडे फॅब्रिक ग्लू आणि थ्री डी आउटलायनर यलो 703, ग्रीन 704, पर्ल ब्लू 305 आणि पर्ल मेटॅलिक गोल्ड 352 वापरून परत काढा आणि सुकण्यासाठी ठेवा. 

फॅब्रिक पेंडंट

फेव्हिक्रिल थ्रीडी आउटलायनर्स आणि फेव्हिक्रिल फॅब्रिक ग्लू वापरून घरात असलेल्या एखाद्या उरलेल्या कापडातून सणासुदीच्या काळासाठी हे सुंदर पेंडट बनवा.

रंगविण्यासाठी साहित्य – फेव्हिक्रिल थ्रीडी आउटलायनर्स रेड 701, ब्लू 702, यलो 703, ग्रीन 704, ऑरेंज 704, ऑरेंज 705, बर्न्ट सिएन्ना 706, व्हाइट 707, फेव्हिक्रिल थ्री डी आउटलायनर लिलिअक 307, फेव्हिक्रिल फॅब्रिक ग्लू 

कलाकृतीसाठी साहित्य – जुन्या कापडाचा तुकडा, पेन्सिल, कात्री, कँडी स्टिक्स, लाकडाचे रंगीत मणी, काचेचेच रंगीत मणी, रंगीबेरंगी दोरे आणि लोकरीचे धागे, फॉइल आरसे (गोल आणि चौकोनी), पेपर कॅनव्हास, पट्टी, कँडी स्टिक्स, रंगीत एम्ब्रॉयडरी धागे सुई व दोरा

कसे तयार कराल

स्टेप 1 – साहित्य एकत्र करा. पेंडंट बनवण्यासाठी पेपर कॅनव्हास, जुन्या कापडाचा तुकडा, टाय अँड डाय प्रकारच्या कापडाचा तुकडा, कँडी स्टिक इत्यादी साहित्य घ्या. 

स्टेप 2 – बेस तयार करा. 3 ½” x 5” आकाराचा पेपर कॅनव्हास घ्या. जुन्या कापडाचा परत वापरता येण्यासारखा तुकडा घ्या. आम्ही हे पेंडंट बनवण्यासाठी टाय अँड डाय प्रकारच्या कापडाचा तुकडा घेतला आहे. पेपर कॅनव्हास टाय अँड डाय प्रकारच्या कापडाने आच्छादित करा व फॅब्रिक ग्लूने चिकटवा. सुकण्यासाठी ठेवा. कँडी स्टिकसाठी आयताच्या वरच्या बाजूस मोठा लूप बनवा. कँडी स्टिक लूपमधून घाला आणि थोडंसं फॅब्रिक ग्लू वापरून चिकटवा. आणि सुकण्यासाठी ठेवा. 

स्टेप 3 – पेंडंटवरील डिझाइन बनवा.पेंडंटवर पाने, फांद्या, ठिपक्यांची रेषा, भौमितिक आकार, जुन्या कापडाचे तुकडे तसेच चौकोन, गोलाकार फॉइल मिरर्स, लोकरीचे धागे, काचेचे रंगीत मणी फॅब्रिक ग्लू आणि फेव्हिक्रिल थ्रीडी आउटलायनर्स रेड 701, ब्लू 702, यलो 703, ग्रीन 704, ऑरेंज 704, ऑरेंज 705, बर्न्ट सिएन्ना 706, व्हाइट 707, फेव्हिक्रिल थ्री डी आउटलायनर लिलिअक 307 वापरून सुशोभित करा आणि सुकण्यासाठी ठेवा.

स्टेप 4 – माळा बनवा. रंगीत काचेचे मणी, लाकडी मणी आणि जुन्या कापडाचे तुकडे वापरून माळा बनवा. 

स्टेप 5 – पेंडंट पूर्ण करा. रंगीत लाकडी मण्यांना रंगीबेरंगी एम्ब्रॉयडरी धागे जोडा. 

पेंडंटच्या खालच्या बाजूस सुई- दोऱ्याच्या मदतीने मण्यांच्या माळा जोडा. 

मण्यांच्या दोन माळा कँडी स्टिकच्या खालच्या बाजूस लावा आणि पेंडंट तयार करा. पेंडंट परिधान करण्यासाठी तयार आहे. 

स्वतःच्या हाताने तयार केलेले या वस्तू वापरण्यात आणि इतरांना भेट देण्यात एक वेगळाच आनंद आहे. तेव्हा यंदा या वस्तू जरूर तयार करा शिवाय तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा.

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

DIY: घरीच कशी तयार कराल पेट्रोलियम जेली (Vaseline)

#DIY: अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी झटपट घरगुती उपाय

Read More From घर आणि बगीचा