संत्र्यांचा रस हा आरोग्यासाठी जितका चांगला आणि फायदेशीर ठरतो तितकाच तो आपल्या त्वचेसाठीही उपयुक्त ठरतो. संत्र्यांमधून (oranges) विटामिन सी जास्त प्रमाणात मिळते, जे त्वचेला अधिक चमकदार आणि डागविरहित ठेवण्यासाठी मदत करते. तसंच संत्र्यामध्ये सायट्रिक अॅसिड असते ज्यामुळे टॅनिंग आणि अॅक्नेपासून सुटका मिळते आणि त्वचेची अगदी आतून स्वच्छता होते. तुम्हाला अॅक्ने, टॅनिंग अशा समस्या असतील आणि चेहऱ्यावर डाग असतील तर तुम्ही नक्कीच नियमित संत्र्याच्या रसाचा अथवा ऑरेंज फेस मास्क (orange face mask) चा वापर करायला हवा. याचा नक्की तुम्ही कसा वापर करून घेऊ शकता ते पाहा. त्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जायची अथवा जास्त काही कष्ट घ्यायची गरज भासणार नाही. त्यामुळे घरच्या घरी तुम्ही कशाप्रकारे याचे फेस मास्क तयार करून वापरू शकता ते पाहूया.
ऑरेंज फेस मास्क बनविण्याची पद्धत (how to make orange face mask)
Freepik
साहित्य
- 3-4 थेंब बदामाचे तेल
- 1 अंड्याचा सफेद भाग
- 2 चमचे संत्र्याचा रस
कृती
- सर्वात पहिले एका बाऊलमध्ये वरील तिन्ही गोष्टी नीट मिक्स करून घ्या
- त्यानंतर त्याची पेस्ट तयार करा
- आता ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा
- जेव्हा ही पेस्ट चेहऱ्यावर सुकेल तेव्हा थंड पाण्याने चेहरा धुवा. या फेसपॅकचा वापर केल्यानंतर चेहऱ्यावर चमक येते आणि चेहरा अधिक ताजातवाना दिसतो
चारकोल पील ऑफ मास्क नक्की कोणी वापरावा, जाणून घ्या
कडुलिंब आणि संत्र्यांचा फेस पॅक बनविण्याची पद्धत (Neem and Orange Face pack)
Shutterstock
साहित्य
- 2 चमचे कडुलिंबाच्या पानाची पेस्ट
- 2 चमचे ऑरेंज पल्प (संत्र्यांची पेस्ट)
- 1 चमचा सोया मिल्क
कृती
- कडुलिंबाची पेस्ट, ऑरेंज पेस्ट आणि सोया मिल्क एकत्र करून घेणे
- हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा
- 15-20 मिनिट्स ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा
- आठवड्यातून एकदा तुम्ही ही पेस्ट चेहऱ्याला लाऊ शकता. कडुलिंब आणि संत्र्यांचा हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावरील पोर्स स्वच्छ करण्यासह चेहऱ्यावरील डाग आणि मुरूमंदेखील कमी करण्यास फायदेशीर ठरतो. तुम्हाला सतत मुरूमांचा त्रास होत असेल तर तुम्ही हा फेसपॅक नक्की वापरा कारण हा त्यावर अत्यंत फायदेशीर ठरतो
फेस शीट मास्क वापरण्यासाठी स्टेप बाय स्टेप टिप्स
ग्रीन टी आणि संत्र्यांच्या फेसपॅक (Green Tea and Orange Face Pack)
Shutterstock
साहित्य
- अर्धा चमचा ग्रीन टी
- 1 चमचा संत्र्याचा पल्प
कृती
- एका बाऊलमध्ये ग्रीन टी आणि ऑरेंज पल्प एकत्र करून घ्या
- हे मिश्रण चेहऱ्यावर लावा
- 20 मिनिट्सनंतर तुम्ही चेहरा धुवा. साधारण दोन ते तीन वेळा तुम्ही हा फेसपॅक लाऊ शकता. ग्रीन टी आणि संत्र्यांचा हा फेसपॅक त्वचेवर एक्सफोलिएटरप्रमाणे काम करते. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यासाठीही याचा उपयोग होतो
हायट्रेडिंग मास्कबद्दल तुम्हाला माहीत हव्यात या गोष्टी
नारळाचे तेल आणि संत्र्याचा फेसपॅक
Shutterstock
साहित्य
- 1 चमचा नारळाचे तेल
- 1 चमचा संत्र्याचा पल्प (जाड रस)
कृती
- एका बाऊलमध्ये नारळाचे तेल आणि संत्र्याचा पल्प मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या
- ही पेस्ट चेहऱ्यावर लावा
- अर्धा तास तसंच ठेवा आणि मग कापसाच्या सहाय्याने तुम्ही हा फेसपॅक काढा
- आठवड्यातून 2-3 वेळा तुम्ही हा फेसपॅक लाऊ शकता. हे फेसपॅक तुमच्या त्वचेला अधिक मुलायम करते आणि त्याशिवाय मॉईस्चराईज करण्यास मदत करते. कोरड्या त्वचेच्या व्यक्तींसाठी हे फेसपॅक अत्यंत उपयुक्ती आहे. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी याचा उपयोग करून नये. नारळाच्या तेलामुळे त्वचा अधिक तेलकट होते. त्यामुळे कोरडी त्वचा असलेल्यांनी याचा नक्की वापर करावा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक