Festival

DIY: रंगपंचमीसाठी बनवा नैसर्गिक रंग जे तुम्हाला देतील नैसर्गिक ग्लो

Leenal Gawade  |  Mar 19, 2019
DIY: रंगपंचमीसाठी बनवा नैसर्गिक रंग जे तुम्हाला देतील नैसर्गिक ग्लो

‘बुराना मानो होली है’ असे म्हणत होळीच्या शुभेच्छा देऊन या दिवशी वेगवेगळे रंग लावले जातात. सध्या बाजारात नैसर्गिक होळीचे रंग मिळतात. पण  हे रंगही अनेकांच्या चेहऱ्याला सूट होत नाही. मग काय असे रंग लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर लगेच पुरळ येऊ लागतात. माझी स्वत:ची त्वचा इतकी सेंसिटीव्ह आहे की, मी रंगाला घाबरुन घराबाहेर पडत नाही. पण घराच्या खिडकीतून खाली सगळ्यांना रंगपंचमी खेळताना पाहूनही खूप त्रास व्हायचा. मग आता यावर काहीतरी पर्याय तर काढायलाच हवा नाही का? म्हणून मग मी आणि माझ्या आईने असे रंग तयार केले. त्याने रंगपंचमीची मजा तर आलीच. पण माझ्या चेहऱ्याला चांगला ग्लो आला. आज होळीच्या स्पेशल रेसिपी ऐवजी मी काही कलर रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

पहिल्यांदा ही गोष्ट मला सांगायची आहे ते म्हणजे मी या ठिकाणी ओले आणि सुके रंग बनवणार आहोत  जे तुमच्यासाठी फेस मास्क सारखे काम करतील.तुम्हाला तुमचा चेहरा धुतल्यानंतर लक्षात येईल की, तुमच्या चेहऱ्यावर छान ग्लो आलेला आहे.

 १.  ये ‘लाल’ रंग मलाल रंग

होळीमध्ये लाल रंग नसेल तर खेळायची काय मजा नाही का? आता किचनमध्ये लाल रंग तयार करायचा आहे. तर डोळ्यासमोर बीट येते. तुमचे बरोबर आहे आपल्याला बीटापासूनच हा रंग तयार करायचा आहे.

 एक किंवा दोन मोठे बीट घ्या. ते स्वच्छ धुवून घ्या.

जर तुम्हाला बीटाची सालं काढायची असतील तर तुम्ही बीट सोलून घ्या.

बीट किसून घ्या. आता  बीट किसल्यानंतर तुमच्या हाताला जो रंग लागला असेल तर तो रंगच तुम्हाला हवा आहे. पण आता आणखी थोडे चांगले बनवण्यासाठी तुम्हाला त्यात बेसन घालायचे आहे.

वाचा – रंगपंचमीची संपूर्ण माहिती

सुका रंग तयार करण्यासाठी

तुम्हाला बीटाच्या पातळ चकत्या करुन त्या दोन ते तीन दिवस उन्हात कडक वाळवायच्या आहेत. (आता होळीला अगदीच कमी दिवस आहेत. त्यामुळे बीटाच्या चकत्या कडकडीत उन्हात ठेवा. म्हणजे त्या लवकर वाळतील)

ओल्या रंगाप्रमाणे तुम्हाला बीटची मिक्सरमधून पावडर करताना त्यात बेसन मिसळा.

बीटामधील पोषकतत्वे कोणत्याही त्वचेसाठी अनुकूल आहेत. हा रंग तुमच्या अंगाला लागला तरी चालू शकतो.

 २. सोने से भी सोना लगे

लाल रंगानंतर जर कोणता रंग लावला जात असेल तर तो पिवळा. आता पिवळा रंग अनेक गोष्टींपासून तयार केला जातो. म्हणजे पिवळी फुले, हळद असे बरेच काही वापरले जाते. पण मी थोडी आणखी वेगळी रेसिपी सांगीन

तुम्हाला एका भांड्यात घ्यायचे आहेत ओट्स. ओट्स तुम्हाला दही किंवा पाण्यात भिजवायचे आहेत. साधारण १० मिनिटांनी ओट्स चांगले भिजतील. ओट्स भिजले तरी त्याचा लगदा हाताने करताना त्रास होता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले ओट्स घ्यायचे आहेत. त्यात तुम्हाला भरपूर हळद घालायची आहे.

होळी एन्जॉय करण्यासाठी लावा ही धमाकेदार १६ गाणी

हे मिश्रण वाटल्यानंतर तुम्हाला छान फिक्कट पिवळा रंग मिळेल.

गडद पिवळ्या रंगाची तुम्हाला अपेक्षा असेल पण हा रंग थोडा फिक्कट होईल. पण हा रंग जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर लावला जाईल आणि जेव्हा तुम्ही चेहरा स्वच्छ धुवाल तेव्हा तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो आलेला दिसेल.

 ३. हम पे ये किसने ‘हरा’ रंग डाला

आता हिरवा रंग फारच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुम्ही कदाचित या आधीही कोणी बनवताना ऐकला असेलही. तर हा हिरवा रंग तुम्हाला कोथिंबीर पासून तयार करायचा आहे आणि त्यात तुम्हाला थोडे ओट्स सुद्धा घालायचे आहे.

कोथिंबीरचा वास जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला हा रंग आवडेल. आता तुम्हाला कोथिंबीर आणि ओट्सची अगदी बारीक पेस्ट करा आणि हा रंग तुम्ही लावा.

रंगपंचमी खेळण्याआधी आणि खेळानंतर घ्या केसाची अशी काळजी

कोथिंबीरमध्ये  व्हिटॅमिन C, बीटाकॅरेटीन आणि अँटीऑक्सिडंट असते. जे चेहऱ्यासाठी आवश्यक असते.

 ४. शाम गुलाबी,शहर गुलाबी

होळी, रंगपंचमी म्हटली की गुलाल आला. तुम्हाला गुलाबी गाल हवे असतील तर हा रंगही नक्की बनवा

गुलाबी गुलाबाच्या पाकळ्या घ्या. त्यात गुलाब पाणी टाकून त्याची घट्टसर पेस्ट करा. तुमचा गुलाबी रंग तयार

जर तुम्हाला सुका रंग हवा असेल तर गुलाबाच्या पाकळ्या सुकवा आणि वाटून त्याची पावडर करा.

आता यंदा रंगपंचमीच्या शुभेच्छा तर द्याच आणि त्यासोबत असे नैसर्गिक रंग वापराल तर तुमचा चेहरा खराब होणार नाही.तर दिसेल अधिक तजेलदार.. मग ट्राय करुन पाहणार है नैसर्गिक रंग

जाणून घ्या प्रियांका चोप्राचा फिटनेस फंडा

(फोटो सौजन्य-Instagram)

Read More From Festival