हिवाळ्यात सर्वात मोठी केसांची समस्या उभी राहाते ती म्हणजे केसगळती आणि कोंड्याची. कोंड्याची समस्या तर आपण कशीही सोडवतो पण केसगळती एकदा सुरू झाली की थांबवताना नाकी नऊ येतात. अनेक उपचार करून थकायला होतं. नक्की असं का होतं असाही प्रश्न अनेकदा आपल्याला त्रास देत राहतो. तर थंडीमध्ये केसांमधील कोरडेपणा वाढतो. त्यामुळे केसगळती, केसांमध्ये कोंडा होणं आणि अन्य तऱ्हेच्या केसांच्या समस्या या जास्त प्रमाणात वाढतात. थंडीत तुम्हाला तुमची ही केसगळती थांबवायची असेल आणि केसांची योग्य काळजी घ्यायची असेल तर त्यासाठी आता तुम्ही घरच्या घरी तेल बनवून केसांची काळजी घेऊ शकता. तुम्हाला बाजारातून महागडी तेलं आणून वेगळे काही उपचार करण्याची गरज नाही. तुम्हाला हे काम थोडं वेळकाढू वाटू शकतं. पण तुम्हाला चांगले केस हवे असतील आणि केसांची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही हे नक्कीच करा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. घरच्या घरी तुम्ही नारळाचं तेल तर वापरताच पण यासाठी आम्ही तुम्हाला एक खास तेल सांगत आहोत जे बनवून वापरल्यास, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.
मेथीच्या दाण्यांचं परिणामकारक तेल
Shutterstock
केसगळतीपासून वाचण्यासाठी तुम्ही मेथीच्या दाण्याचं तेल वापरू शकता. DIY करून तुम्हाला घरच्या घरी हे बनवता येईल आणि नियमित स्वरूपात लावल्यास तुम्हाला त्याचा फायदाही मिळेल. त्याशिवाय यासाठी लागणारं साहित्य हेदेखील कमी आहे. जे तुम्हाला घरच्या घरामध्ये मिळतं. केसांसाठी मेथी दाणे अत्यंत उपयुक्त आहे. हे तेल लावल्यानंतर तुम्हाला आठवड्यातच त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. त्यामुळे जास्त वेळ घालवू नका. आम्ही तुम्हाला तेल बनवण्याची जी पद्धत सांगणार आहोत ती फॉलो करून नक्की हे तेल बनवा आणि त्याचा वापर तुमच्या केसगळतीसाठी करा.
साहित्य –
नारळ तेल
सुके मेथीचे दाणे
कडिपत्ता
तेल बनवण्याची पद्धत
Shutterstock
तेल बनवण्याची पद्धत कशी आहे ते जाणून घेऊया. आम्ही तुम्हाला पॉईंटनुसार त्याची पद्धत देत आहोत जेणेकरून तुम्हाला समजून घेणं सोपं होईल.
- एका भांड्यात अर्धा कप नारळाचं तेल घ्या. आपल्या केसांना जितकी गरज आहे तितकंच तेल घ्या. अति तेल तुमच्या त्वचेला हानी पोहचवू शकतं.
- त्यानंतर नारळाच्या तेलामध्ये 2 चमचे मेथी दाणे मिसळा. तुम्हाला जर त्याचा चांगला उपयोग करून घ्यायचा असेल तर तुम्ही मेथीचे दाणे जास्त मिसळले तरीही चालेल. त्यामध्ये कडिपत्ता मिक्स करा
- त्यानंतर गॅसवर तुम्ही हे मिश्रण मंद आचेवर ठेऊन साधारण 10 मिनिट्स गरम होऊ द्या
- तेल गरम झाल्यानंतर मेथी दाणे आणि कडिपत्ता दोन्ही काळे होऊ लागतील
- त्यानंतर तुम्ही हे तेल थंड होऊ द्या
- आता यामधील कडिपत्ता क्रश करा
- एका भांड्यावर चाळणी ठेऊन हे तेल गाळा आणि एका बाटलीमध्ये भरून ठेवा
- दिवसातून एकदा तुम्ही हे तेल तुमच्या केसांना लावा. लक्षात ठेवा की, अति तेलाचा वापर करू नका
#DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय
काय आहेत फायदे
Shutterstock
या तेलाचे नक्की केसांना कसे फायदे होतात ते पाहूया. यामध्ये नारळ तेल, मेथी दाणे आणि कडिपत्ता या तिन्हीचं मिश्रण आहे आणि त्यामुळे केसांना कसा फायदा मिळतो ते जाणून घेऊया –
मेथी दाणे – मेथी दाण्यामुळे केसातील कोंड्यापासून सुटका मिळण्यास मदत होते. तसंच डोक्यात ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यास याचा उपयोग होतो आणि त्यामुळेच केसगळती थांबून केस येण्यास सुरूवात होते. याशिवाय डोक्यामध्ये होणारं संक्रमण थांबवण्यासही याची मदत होते.
नारळ तेलाचा फायदा – नारळाच्या तेलाने केस तुटण्यापासून वाचतात. तसंच डोक्याला पूर्णतः हायड्रेट करण्यासाठी याचा वापर करून घेता येतो. त्याचप्रमाणे केस पातळ होण्यापासूनही नारळाचं तेल रोखतं आणि कोंड्याच्या समस्येपासूनही सुटका मिळवून देतं.
केसांसाठी कडिपत्त्याचे फायदे – आजकाल बऱ्याच तरूण मुलामुलींचे केस पांढरे झालेले दिसतात. कमी वयात केस पांढरे होत असतील तर कडिपत्ता केसांना लावण्याचा फायदा होतो. केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी कडपत्ता चांगला आहे. तसंच केसांमधील कोंडा काढून टाकण्यासाठी याची मदत मिळते.