Table of Contents
- पारंपारिक सजावट, चंद्र आणि डोहाळे जेवण
- कुणी तरी येणार..येणार गं शब्दांनी केलेली सजावट
- प्रकाशमय सजावट
- सुटसुटीत आणि सुरेख सजावट
- फुग्यांची रंगीबेरंगी सजावट
- भव्य पण इकोफ्रेंडली सजावट
- गुलाबाच्या पाकळ्यांनी केलेली सजावट
- होडीतलं डोहाळे जेवण
- आकर्षक आणि इकोफ्रेंडली सजावट
- इकोनॉमिकल सजावट
- लक्ष वेधणारी जंगी सजावट
- डोहाळे जेवणासाठी खास रांगोळ्या
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात गर्भारपण हा महत्त्वाचा क्षण असतो आणि त्यातही आनंदादायी असते ते डोहाळे जेवण. डोहाळे जेवणाच्या निमित्ताने गर्भवती महिलेचं सर्व कुटुंबियांकडून आणि मित्रपरिवारांकडून कोडकौतुक करण्यात येतं आणि डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा देण्यात येतात. या समारंभासाठी बरंच प्लॅनिंग केलं जातं. आजकाल बरेच जण डोहाळेजेवण अगदी थाटामाटात साजरं करतात. तर काहीजण अगदी साध्या पद्धतीने आणि घरगुती समारंभ करतात. पण दोन्हीमध्ये सजावटही महत्त्वाची असतेच. तुमच्याकडेही जर डोहाळे जेवण असल्यास आणि तुम्ही त्याच्या सजावटीसाठी आयडियाच्या शोधात असाल तर खालील डोहाळे जेवण सजावटीचे (Dole Jevan Decoration Ideas In Marathi) फोटोज नक्की पाहा. तुम्हाला सजावटीसाठी नक्कीच मदत होईल.
पारंपारिक सजावट, चंद्र आणि डोहाळे जेवण
मराठी मालिकेतील अभिनेत्री गौरी निगुडकरच्या डोहाळे जेवणाचे हे फोटोज आहेत. गौरी ही सध्या भारताबाहेर स्थायिक असते. पण तरीही तिचं परदेशातही अगदी छान डोहाळेजेवण करण्यात आलं. या डोहाळे जेवणाला तिने पारंपारिक फुलांचे दागिने घातले होते. तसंच ती बसलेल्या झोपाळ्याला फुलांनी सजवण्यात आलं होतं. तसंच चंद्राच्या आकारानेही हा झोपाळा सजवला होता. पाठीमागे दिसत असल्याप्रमाणे बाळकृष्णाची चित्रंही लावण्यात आली होती. तुम्ही डोहाळेजेवणाच्या दिवशी अशी पारंपारिक सजावट करू शकता.
कुणी तरी येणार..येणार गं शब्दांनी केलेली सजावट
कुणी तरी येणार.. येणार गं हे मराठीतील प्रसिद्ध डोहाळेजेवणाचं गाणं आहे. प्रत्येक डोहाळेजेवणाला हे गाणं आवर्जून लावलं जातंच. वरील फोटोमध्ये या गाण्याच्या शब्दांचे कटआऊट्स अगदी क्रिएटीव्हली वापरण्यात आले आहेत. तसंच टीपिकल झोपाळ्याऐवजी गर्भवती मातेसाठी छान उशी साधीच पण आरामशीर कुशन ठेवून सजवण्यात आली आहे. नेहमीच्या फुलांच्या सजावटीऐवजी ही थोडी मॉर्डन सजावट केलेली दिसतेय. कारण यामध्ये आर्टिफिशियल फुलं आणि सजावट वापरली आहे. तीसुद्धा अगदी छान दिसतेय. तुम्हीही असं गाण्याच्या शब्दांनी छान सजावट करू शकता.
प्रकाशमय सजावट
साधारणतः डोहाळेजेवणाला फुलांची सजावट असते. पण अशी लाईटींगची सजावट क्वचितच पाहायला मिळते. या फोटोतील सजावटीमध्ये झोपाळा ऑर्किडच्या फुलांनी सजवलेला असून पाठीमागे लाईटींग करून त्यावर बेबी शॉवर असे बलून लावण्यात आले आहेत. तसंच पाळण्याच्या खाली कमळ बनवून तेही ठेवण्यात आलं आहे. नेहमीच्या फुलांच्या सजावटीऐवजी तुम्ही अशी लाईटींगची सजावटही करू शकता. अशी सजावट सुटसुटीत आणि छान दिसेल.
सुटसुटीत आणि सुरेख सजावट
काहीवेळा आपण घरच्याघरी डोहाळे जेवण करण्याचं ठरवतो. पण घरच्याघरी डोहाळे जेवणाची सजावट मात्र छान असलीच पाहिजे. मग या वरील फोटोप्रमाणे तुम्हीही सजावट करू शकता. एका भिंतीवर छान ढग आणि चांदण्या आणि बाजूला झेंडूची फुलं आंब्याचं डहाळं व हाराने केलेली पारंपारिक सजावट अगदी मस्त आहे. पण झोपाळ्याऐवजी इथेही दोन्ही सजावटीत स्टूल वापरण्यात आलं आहे. काही वेळा अशी छान सुटसुटीत सजावट फारच सुरेख वाटते.
फुग्यांची रंगीबेरंगी सजावट
ना झोपाळा ना जास्त फुलं पण तरीही छान अशी ही सजावट आहे. पाठीमागे कापड, थोड्याश्या झेंडूच्या माळा, रंगीबेरंगी फुगे, कागदापासून बनवलेले पाण्याचे थेंब आणि कार्डबोर्डचा चंद्र अशी ही डोहाळेजेवण सजावट अगदी सुंदर आहे. चंद्रातलं हे डोहाळेजेवण अगदी युनिक आणि सिंपल आहे. तुम्हाला आवडेल का अशी सजावट करायला. कारण या सजावटीला फारसा खर्चही नाही आणि श्रमही नाहीत.
भव्य पण इकोफ्रेंडली सजावट
डोहाळेजेवणासाठी जर तुम्हाला ईकोफ्रेंडली सजावट हवी असेल तर तुम्ही वरील फोटोप्रमाणे सजावट करू शकता. या सजावटीमध्ये मोठ्या हॉलमध्ये डोहाळे जेवण असलं तरी सजावट मात्र खऱ्या फुलांनी झोपाळा सजवून आणि पुष्पगुच्छांनी करण्यात आली आहे. ज्यामुळे या डोहाळेजेवणाला भव्य पण ईकोफ्रेंडली लुक आला आहे. फलटणमधल्या एका कार्यक्रमाला आरएस डेकोरेटर्सने केलेली ही सजावट अगदी पर्यावरणाला अनुसरून आहे.
गुलाबाच्या पाकळ्यांनी केलेली सजावट
औरंगाबादच्या सुबोध शिंदे यांनी शेअर केलेला हा फोटो आहे. ज्यामध्ये अगदी घरगुती पद्धतीने पण छान असं डोहाळे जेवण करण्यात आलं आहे. सजावटही अगदी सुटसुटीत आणि सुंदर करण्यात आली आहे. या सजावटीत गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर जास्त प्रमाणात करण्यात आला आहे. झोपाळ्याला पांढऱ्या आणि गुलाबाच्या फुलांनी सजवण्यात आलं आहे. तसंच पाठीमागे पांढरा पडदा लावला असून त्यावर लाईट्स सोडण्यात आले आहेत. या पांढऱ्या पडद्यामुळे गुलाबाने केलेलं डेकोरेशन अगदी उठून दिसतंय. झोपाळ्यावर घातलेली निळी बेडशीटही उठून दिसत आहे. तसंच समोर टीपॉयवरही गुलाबांनी सजवलेली थाळी छान दिसत आहे. घरच्याघरी डोहाळे जेवण असल्यास अशी सजावट करायला हरकत नाही.
होडीतलं डोहाळे जेवण
नेहमीच्या डोहाळे जेवणापेक्षा हटके असलेलं हे डोहाळेजेवण आहे. हा फोटो आराधना यांनी शेअर केला आहे. त्यांचं हे आगळंवेगळं डोहाळेजेवण लेकमध्ये बोटीमध्ये बसवून करण्यात आलं होतं. बोटीतलं हे डोहाळे जेवण आराधना यांच्यासाठी खास फार्महाऊसवर करण्यात आलं आहे. या डोहाळेजेवणामागील विचारही त्यांनी शेअर केला आहे. प्रेग्नंसीदरम्यान अनेकींना पाण्याची भीती वाटू लागते. पण बोटीत अशाप्रकारे फेरी मारल्यास हा फोबिया दूर होईल. या डोहाळेजेवणासाठी खास बोटीला सजवण्यात आलं आहे. तुम्हीही असं आगळंवेगळं डोहाळेजेवण करू शकता. पण काही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या.
आकर्षक आणि इकोफ्रेंडली सजावट
रूचाज फोटोग्राफीने नाशिकमधल्या डोहाळेजेवणाचा शेअर केलेला हा फोटो फारच सुरेख आहे. ही सजावटसुद्धा ईकोफ्रेंडली आहे. पूर्णपणे फुलं आणि पानं वापरून तसंच पाठीमागे सुंदर कापडाचा वापर करून ही सजावट करण्यात आली आहे. फुलांच्या योग्य रंगसंगतीमुळे ही सजावट उठून दिसते आहे. तसंच या डोहाळेजेवणातही झोपाळ्याऐवजी सोफा ठेवण्यात आला आहे आणि समोर तांब्याच्या घंगाळ्यावर काच ठेवून त्यावर चांदीचं ताटं-भांड आणि गुलाबाच्या फुलांनी सजावट केली आहे. खूपच सिंपल आणि सोबर अशी सजावट आहे.
इकोनॉमिकल सजावट
स्पेशल मूमेंटच्या योगिता रचना यांनी शेअर केलेला हा फोटो आहे. या फोटोतील सजावट खूपच क्युट आहे. घरच्या घरी असलेल्या डोहाळे जेवणासाठी आयडियल अशीही सजावट आहे. ज्यात पाठीमागे कागदाने ढग, चंद्र तसंच डोहाळे जेवण असंही लिहीलं आहे. छोटाश्या झोपाळ्याला खोट्या फुलांनी सजवून त्यावर खणाचं कापड ठेवण्यात आलं आहे. कमीत कमी खर्चात जर तुम्हाला डोहाळे जेवण करायचं असल्यास ही आयडिया छान आहे.
लक्ष वेधणारी जंगी सजावट
मॅजिकमस्ती इव्हेंट्सने शेअर केलेला हा डोहाळे जेवण सजावटीचा (Dohale Jevan sajawat) व्हिडिओ एकदम जोरदार आहे. भरपूर प्रोप्स, बलून्स,लाईट्स वापरून या ओटीभरण समारंभाची सजावट करण्यात आली आहे. जी फारच आकर्षक आणि लक्ष वेधणारी आहे.
डोहाळे जेवणासाठी खास रांगोळ्या
डोहाळे जेवणाच्या सजावटीसोबतच रांगोळीसुद्धा महत्त्वाची आहे. आपल्या परंपरेप्रमाणे कोणत्याही शुभ समारंभाला रांगोळी तर हवीच. मग पाहा या डोहाळेजेवणासाठी काढलेल्या खास रांगोळ्या.
सोलापूरच्या मेघना करवंदे यांनी संस्कारभारती या रांगोळीच्या प्रकाराने साकारलेली ही सुंदर रांगोळी खास डोहाळेजेवणासाठी रेखाटली आहे. सुंदर रंगसंगती आणि छोटुकली झबली अशी ही क्युट रांगोळी तुमच्याही डोहाळे जेवणाला काढल्यास सजावटीत नक्कीच भर पडेल.
नवखी चाहूल इवलं पाऊल…विचार करा हॉलच्या किंवा डोहाळे जेवणाच्या समारंभावेळी अशी सुंदर रांगोळी असल्यास किती छान वाटेल. आर्ट बाय प्रियांका बोधले यांनी शेअर केलेली ही स्पेशल डोहाळे जेवण रांगोळी खूपच क्युट आहे. डोहाळे जेवणाच्या सजावटीत अशी रांगोळी अजून भरच टाकेल. चिमुकलं चंद्रावर निजलेलं बाळ, बाबागाडी आणि सुंदर रंगाने सजलेली अशी ही रांगोळी आहे.
बॉय की गर्ल असा प्रश्न प्रत्येक डोहाळेजेवणात असतोच. मुलगा असो वा मुलगी येणाऱ्या बाळाची सगळेच जण आतुरतेने वाट पाहत असतात. सोलापूरच्या मेघना करवंदे यांनी साकारलेली ही सुरेख रांगोळी.
मग तुम्हीही तुमच्या डोहाळे जेवणाच्या निमित्ताने वरीलप्रमाणे सुंदर सजावट करा आणि येणाऱ्या बाळाचं छान स्वागत करा.
हेही वाचा –
प्रेग्नंट महिलांसाठी खास गिफ्ट आयडियाज
गरोदरपणातही दिसा अधिक स्टायलिश
जर तुम्हाला ही लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही प्रेग्नंट असू शकता