मनोरंजन

स्वराज्यजननी जिजामाता’ रोमांचक वळणावर, डॉ अमोल कोल्हेची खास भूमिका

Dipali Naphade  |  Sep 2, 2020
स्वराज्यजननी जिजामाता’ रोमांचक वळणावर, डॉ अमोल कोल्हेची खास भूमिका

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे स्वराज्याचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकताना, पाहताना सर्वांचा ऊर अभिमानानं भरून येतो, पण त्यांच्या या शौर्य आणि जडघडण यांमागे मोठा वाटा आहे तो त्यांच्या आईचा, जिजाऊ माँसाहेबांचा आणि म्हणूनच त्यांना ‘स्वराज्यजननी जिजामाता’ म्हटलं जातं. कोरोनामुळे गेले तीन महिने सर्वच मालिकांचे चित्रीकरण थांबले होते. मात्र पुन्हा एकदा चित्रीकरणाला जुलैपासून सुरूवात झाली. ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका आता एका रोमांचक वळणावर येऊन पोहचली आहे. तर आता प्रेक्षकांना यामध्ये त्यांचा आवडता अभिनेता डॉ. अमोल कोल्हेची खास भूमिका पाहायला मिळणार आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या सर्व सुरक्षेचा विचार करूनच या मालिकेचे चित्रीकरण सध्या चालू आहे.

अखेर कंगनाची मुक्ताफळं थांबवायला रवीना सरसावली, दिले सडेतोड उत्तर

डॉ. अमोल कोल्हेची खास भूमिका

‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही मालिका सध्या रोमांचक वळणावर आली आहे. जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचा विडा उचलला आहे. जिजाऊ शिवबांना घेऊन पुण्यात आल्या आहेत. आता या पुढे मालिकेत प्रेक्षकांना स्वराज्य बांधणीची रोमांचकारी कथा आणि महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास पुन्हा अनुभवायला मिळणार आहे आणि याच दरम्यान प्रेक्षकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे डॉ. अमोल कोल्हे ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत एक खास भूमिका साकारणार आहेत. याच आठवड्यात हे भाग प्रसारित होणार असून डॉ. अमोल कोल्हेंच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच पर्वणी ठरेल. आतापर्यंत डॉ. कोल्हे यांनी मालिकांमध्ये ऐतिहासिका भूमिका साकारल्या आहेत. शिवाजी महाराजांचे भक्त म्हणून डॉ. अमोल कोल्हेंना नेहमीच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. आता या मालिकेमध्ये काय नेहमी भूमिका असणार आणि कसं काम असेल याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. सोनी मराठीवर प्रसारित होणारी ही मालिका प्रेक्षकांनीही डोक्यावर उचलून धरली आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हटल्यानंतर कोणाचाही ऊर अभिमानाने भरून येतो आणि त्यातही डॉ. अमोल कोल्हे असल्यावर मालिका बघायला अधिक मजा येते.

आयुषमान खुराना साकारणार अॅथलिट, नवा लुक पाहून व्हाल थक्क

कोरोनाचे सावट असूनही सावधानता

सध्या कोरोनाचे सावट असले तरीही मालिकेचे चित्रीकरण अगदी व्यवस्थित सुरक्षितता घेऊन करण्यात येत आहे. ऐतिहासिक मालिकांना प्रेक्षक नेहमीच डोक्यावर उचलून घेत आले आहेत. त्यातही ही मालिकादेखील डॉ. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्स अन्वये तयार होत असल्यामुळे प्रेक्षक ही मालिका बघण्यासाठी खूपच उत्सुक असतात. एका मुलखावेगळ्या आईची गाथा, जिनं स्वराज्याचा सिंह घडवला अशा जिजामातांच्या आयुष्यावर ही मालिका आहे. या मालिकेचं चित्रीकरण दादासाहेब फाळके चित्रनगरी  इथं सुरू असून सरकारने आखून दिलेले सर्व नियम पळून या मालिकेचं चित्रीकरण सुरू करण्यात आलं. संपूर्ण सेटचं सॅनिटायजेशन करण्यात आलं आहे. सेटवर मास्क सक्तीचे असून नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत चित्रीकरण पार पडत आहे. काही लोक सेटवरच राहून काम करत असून त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं ही निर्मात्या संस्थांची जबाबदारी आहे.  ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही ऐतिहासिक मालिका असल्यानं मिळालेल्या वेळेत कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखेसाठी कसून तयार केली आहे. आता नियमांच्या चौकटीत राहून आपलं काम व्यवस्थित करून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी  ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेचा पूर्ण चमू सज्ज आहे. 

या कारणामुळे झाले होते अंकिता-सुशांत सिंहचे ब्रेकअप

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

Read More From मनोरंजन