खाणंपिण आणि नाइटलाईफ

आरोग्यदायी ड्रॅगन फळ खाण्याचे फायदे (Dragon Fruit Benefits In Marathi)

Leenal Gawade  |  Mar 1, 2021
dragon fruit benefits in marathi

भारतात आता अगदी सहज काही एक्झॉटिक अशी फळ मिळायला सुरुवात झाली आहेत. पूर्वी फक्त आंबा, पेरु, चिकू, फणस, अननस, सफरचंद, केळी अशीच काही फळ आपण खात होतो. पण आता भारतात परदेशातून आलेली फळ ही फारच प्रचलित झालेली आहेत. त्यापैकीच एक फळ म्हणजे ड्रॅगन फ्रुट. ड्रॅगन फ्रुट पाहिल्यानंतर ते किवी वर्गातील वाटते. पण हे फळ कॅक्टस गटातील आहे. या फळाला पिटाया किंवा पिठाया असे म्हणतात. अमेरिकेत ही फळ वाळवंटात फळ मिळतात.  हे फळ बाहेरुन गुलाबी रंगाचे असते आणि त्याचा गर पांढऱ्या रंगाचा असतो. हा गर चवीला फार वेगळ्या चवीचा लागत नाही. यामध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात. त्या काळ्या तिळाप्रमाणे दिसतात. त्याची चव चुरचुरीत लागते. पण य फळाची चव अजिबात गोड किंवा कडू नसते. हे फळ भारतात प्रकर्षाने आता मिळू लागले आहे. हे फळ बाजारात बाराही महिने मिळते. ड्रॅगन फ्रुटमधील घटक लक्षात घेता ते आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फारच फायदेशीर (dragon fruit benefits in marathi) असते.

ड्रॅगन फ्रुटमधील पोषकत्वे (Nutritional Value Of Dragon Fruit)

ड्रॅगन फळ फायदे (dragon fruit benefits in marathi) जाणून घेताना त्यामध्ये नेमकी कोणती पोषकत्वे असतात हे देखील जाणून घेणे गरजेचे असते. यामध्ये नेमके काय असते ते देखील जाणून घेऊया.

कॅलरीजः 60 

प्रोटीन : 1.2 ग्रॅम्स 

फॅट : 0 ग्रॅम्स 

कार्ब्स: 13 ग्रॅम्स 

फायबर : 3 ग्रॅम्स 

व्हिटॅमिन C : 3 %

आर्यन: 4 %

मॅग्नेशिअम : 10 %

चेहऱ्यावर पटकन ग्लो येण्यासाठी ट्राय करा हे फेसमास्क

आरोग्यासाठी ड्रॅगन फळ फायदे (Dragon Fruit Health Benefits In Marathi)

फळ ही आरोग्यासाठी फारच फायदेशीर असतात. ड्रॅगन फळ फायद्यांचा विचार करता त्यांचा आरोग्यासाठीही भरपूर फायदा होतो. जर तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी ड्रॅगन फ्रुट खायचे असेल तर तुम्हाला आरोग्यासाठी असलेले फायदे माहीत हवे (dragon fruit benefits in marathi)

अँटिऑक्सिडंटचा भरपूर साठा (Rich In Antioxidants)

ड्रॅगन फ्रुटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंटचा साठा असतो. शरीरात अँटीऑक्सिडंट घटकांचा भरपूर साठा असेल तर तुम्हाला अनेक आजारांपासून सुटका मिळण्यास मदत मिळते. ड्रॅगन फ्रुटमध्ये  बेटा कॅरेटीन, लायकोपिनी आणि बेटालिनी असते. ज्यामुळे क्रोनिक आजारांपासून सुटका मिळण्यास मदत मिळते. रॅडिकलमुळे होणारे शरीराचे नुकसान टाळण्यासाठी अँटिऑक्सिडंटनी युक्त असे ड्रॅगन फ्रुट खाणे महत्वाचे असते.

मधुमेहींसाठी चांगले (Lower Blood Sugar Level)

अनेक आजारांमध्ये अल्टरनेटिव्ह पर्याय म्हणून ड्रॅगन फुट खाण्याचा सल्ला दिला जातो. ड्रॅगळ फळात ज्या काळ्या रंगाच्या बिया असतात ज्या मधुमेंहीसाठी फारच फायद्याच्या असतात. रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम करते. ज्यांना टाईप दोन प्रकाराचा डाएबिटीझ असतो. अशांसाठी तर हा अगदी उत्तम असा पर्याय आहे. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी याचा वापर नक्कीच करायला हवा.

प्रतिकारशक्ती वाढवते (Strengthen Immune System)

आरोग्य चांगले आणि निरोगी हवे असेल तर तुमची प्रतिकारशक्ती चांगली असणे देखणे गरजेचे असते. तुम्ही आजारी असाल तर त्यावेळी मंदावणाऱ्या प्रतिकारशक्तीला वाढवण्यासाठी अगदी हमखास ड्रॅगन फ्रुट खाण्याचा सल्ला दिला जातो. अनेक डॉक्टर काही खास आजारांसाठी तुम्हाला अशी फळ खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही आहारात त्याचा नेहमी समावेश केला तर तुम्हाला निरोगी आयुष्य मिळण्यास मदत होईल.

हेल्दी बॅक्टेरीया पुरवते (Provide Healthy Bacteria)

शरीराला काही बॅक्टेरियांची गरज असते. असे हेल्दी बॅक्टेरीया ड्रॅगन फ्रुटमध्ये असतात. ड्रॅगन फ्रुटमध्ये लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरीया आणि बायफायडोबॅक्टेरिया असते. याच्या रोजच्या सेवनामुळे पोटाच्या समस्या आणि पोटाशी निगडीत असलेले आजार कमी होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर तुम्हाला या फळामुळे पोट चांगले राहण्यास मदत करते.

शरीरातील आर्यन वाढवते (Increase Iron Level)

शरीरात आर्यन म्हणजेच लोह ही योग्य प्रमाणात असायला हवे. शरीरात जर याचे प्रमाण योग्य नसेल तर शरीरात रक्त कमी होते. शरीराची वाढ खुंटते. लहान मुलांमध्ये आर्यनची कमतरता असेल तर लहानमुलांची वाढ होत नाही. आर्यनची कमतरता असलेल्या व्यक्तीला थकवा येतो. सतत डोकेदुखी होऊ लागतो. नख तुटू लागतात. असा त्रास तुम्हाला होऊ लागला असेल तर तुमच्या शरीरात आर्यनची कमतरता झाली असे समजावे.अशावेळी तुम्ही ड्रॅगन फ्रुट खाल्ले तर तुम्हाला आर्यनची कमतरता कमी करण्यास मदत मिळेल.

सौंदर्यासाठी ड्रॅगन फळ फायदे (Dragon Fruit Benefits In Marathi For Beauty)

 फळ ही आरोग्यासाठी चांगली असतात. पण ती त्वचेसाठीही फारच लाभदायक ठरतात. सौंदर्यासाठी ड्रॅगन फ्रुट हे फारच फायद्याचे असते. जाणून घेऊया ड्रॅगन फळ फायदे (dragon fruit in marathi)

पिंपल्स करते कमी (Reduce Acne)

 त्वचेवर पिंपल्सची समस्या तुम्हाला असेल तर ड्रॅगन फ्रुट नावाचे एक्झॉटिक फळ तुमच्यासाठी वरदानाहून कमी नाही. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन C असते. जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास असेल तर या फळाच्या सेवनामुळे आणि फळाचा गर चेहऱ्याला लावल्यामुळे त्वचेवरील पिंपल्सच्या समस्या कमी होण्यास मदत मिळते. खूप पिपंल्स असणाऱ्यांनीच आताच घरी ड्रॅगन फ्रुट आणावे. त्याचा गर काढून घ्यावा. त्याचा रस काढून हे तयार सीरम तुम्ही चेहऱ्याला लावून चोळा. तुम्हाला नक्कीच त्यामुळे त्वचेत झालेला फरक जाणवेल. 

त्वचेला आणते ग्लो (Skin Glow)

 त्वचा तेव्हाच चांगली दिसते. ज्यावेळी तिच्यावर एक प्रकारचा ग्लो असतो. अशी ग्लो असलेली त्वचा नेहमीच सगळ्यांना आकर्षित करते. निस्तेज त्वचा अजिबात चांगली दिसत नाही.ड्रॅगन फ्रुटचे फायदे (benefits of dragon fruit in marathi) जाणून घेतल्यानंतर त्यामध्ये आणखी एक त्वचेसंदर्भातील फायदा म्हणजे त्वचेला ग्लो आणण्याचे. ड्रॅगन फ्रुटच्या सेवनामुळे त्वचेला ग्लो मिळण्यास मदत मिळते. जर त्वचेची जळजळ झाली असेल तर तुम्ही ¼ कप ड्रॅगन फ्रुट घ्या त्यामध्ये तुमच्या आवडीचे तेल घ्या व्हिटॅमिन E घेतल्यास चालू शकेल. ते एकत्र करुन तुम्ही चेहऱ्याला चोळा. साधारण 10 मिनिटांसाठी ठेवा. नंतर चेहरा धुवून टाका. तुम्हाला त्वचेत फरक झालेला नक्कीच दिसेल.

त्वचा ठेवते चिरतरुण (Fight Prematuring Aging)

वयोमानानुसार त्वचेमध्ये अनेक बदल होत असतात. त्वचा ही सैल पडू लागते. ड्रॅगन फ्रुटमध्ये असलेले घटक हे चेहऱ्यावरील पोअर्स कमी करुन त्वचा घट्ट करण्याची काम करतात. त्यामुळे जर तुम्हाला चिरतरुण आणि सुंदर अशी त्वचा कायम राहावी असे वाटत असेल तर तुमच्या आहारात दिवसातून एकदा तरी ड्रॅगन फ्रुट असावे. त्याच्यासेवनामुळे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा मिळण्यास मदत होईल. त्वचेवर ड्रॅग फ्रुटचा पल्प लावल्यामुळे त्वचा फ्रिज होण्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. 

 त्वचेसाठी नॅचरल मॉईश्चर (Acts As A Natural Moisture)

त्वचा तजेलदार दिसण्यासाठी मॉश्चरायझर फारच महत्वाचे असते. त्वचा नॅचरल मॉईश्चराईज झाली तर ती अधिक सुंदर दिसते. त्यामुळे तुम्ही त्वचेला नॅचरल मॉईश्चर देण्यासाठी ड्रॅग फ्रुटचे सेवन रोजच्या रोज करा. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होण्यास मदत मिळेल. त्वचेला तजेला देत त्याला चांगले करण्याचे काम ड्रॅगन फ्रुट करते. त्वचा अधिक चांगली होण्यासाठी तुम्ही नक्कीच त्याचा रोजच्या रोज वापर करायला हवा. 

रेडिकल डॅमेजपासून वाचवते (Prevent Radical Damage)

त्वचा ही हल्ली प्रदूषणामुळे खराब होण्याची अधिक भीती असते. रेडिकल्स पासून त्वचेचे अधिक नुकसान होते. त्वचेचे हे नुकसान टाळायचे असेल तर तुम्ही ड्रॅगन फ्रुटचने सेवन करता. ड्रॅगन फ्रुटचा गर काढून त्याचा रस काढून घ्या तो हायरोलिक क्रिम किंवा  एखादे सीरम घ्या त्यामध्ये याचा अर्क घाला. दररोज रात्री ते चेहऱ्याला लावा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक आवरण तयार होते. जे तुमच्या त्वचेची रक्षा करते.

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. ड्रॅगन फ्रुटचा समावेश सुपरफुड्समध्ये होतो का?

ड्रॅगन फ्रुट हे एक एक्झॉटिक फळ आहे. लो शुगर, लो कार्ब असे हे फळ असल्यामुळे त्याचा अनेक जण समावेश हा हेल्दी डाएटमध्ये आवर्जून करतात. त्यामुळे हे फळ एक सुपरफ्रुट आहे असे म्हणायला हवे.

2. ड्रॅगन फ्रुट कसे खावे?

ड्रॅगन फ्रुटला तशी काहीही चव नसते. यामध्ये तिळासारख्या बिया असतात. त्याची नेमकी चव अशी काही सांगता येत नाही. हे फळ सॅलेड किंवा नुसते खाता येते. ड्रॅगन फ्रुट त्यामुळे नुसते कापून त्याचा गर काढून खाता येते. 

3. चांगले ड्रॅगन फ्रुट कसे निवडावे?

ड्रॅगन फ्रुट हे बाहेरच्या आवरणावरुन ओळखता येत नाही. कारण याचा रंग हा गोड गुलाबी रंगाचा असतो. त्याच्यावर अननसाप्रमाणे पानांचा आकार असतो. ज्याचा रंग हिरवा आणि अंशत: गुलाबी असतो. चांगले फळ निवडताना त्याे आवरण हे कडक आहे असे बघावे. फळाला थोडासा सुगंध येतो. त्यामुळे असे फळच तुम्ही निवडा.

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ