सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. या दिवसात घाम येऊन लग्नाचे कपडे घालायचे म्हणजे घाम, घाम आणि खूप घाम इतकेच असते. लग्नाचे कपडे हे नेहमीच खास असतात. ते अंगावर असेपर्यंत काही वाटत नाहीत. पण ते काढून टाकल्यानंतर कधी एकदा ते धुवू असे होऊन जाते. तुम्हीही या काळात अनेक लग्न अटेंट केली आहेत. लग्नासाठी वापरलेल्या खास साड्या, ड्रेस, ब्लाऊज तसेच कपाटात पडून असतील. त्यांचे काय करायेच कळत नसेल. म्हणजे असे कपडे घरी घुता येत नाहीत.ते तसेच वाळवून ठेवले तर त्याला घामाचा डाग येतात. महागातले कपडे क्षुल्लक डागांनी किंवा घामाचे खराब होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही लग्नातील कपडे ड्रायक्लीन करायला हवेत. पण तुम्हाला माहीत आहे का? कपडे सतत ड्रायक्लीन करणे योग्य की रोल प्रेस. या दोघांमधील फरक आणि कोणते तुमच्यासाठी बेस्ट हे आता आपण जाणून घेऊया.
ड्रायक्लीन म्हणजे काय?
ड्रायक्लीन हे खास कपड्यांना करण्याचा सल्ला दिला जातो. कपडे ड्राय क्लीन करण्यासाठी काही खास केमिकल्सचा वापर केला जातो. हे केमिकल्स वापरल्यामुळे जे डाग पाणी आणि डिटर्जंट याने जात नाही. असे डाग या प्रोसेसदरम्यान काढले जातात. ड्रायक्लीन केल्यामुळे कपड्यांचा रंग चांगला खुलतो. शिवाय असे काही कपडे असतात. ज्यांचा रंग इतका गडद असतो की, नुसता पाण्याने धुतला तर तो जाण्याची किंवा लाईट होण्याची शक्यता असते. अशा कपड्यांचा रंग टिकवण्याचे काम ड्रायक्लीन करते.
रोलप्रेस म्हणजे काय?
साड्या, ब्लाऊज किंवा कुडता आपण ज्यावेळी वापरतो त्यावेळी चुरगळ्याची शक्यता असते. एका वापरानंतर अगगी स्वाभाविकपणे कपडे हे चुरगळलेले असतात. अशा कपड्यांना पुन्हा एकदा कडक इस्त्री करुन त्यांना चमकवण्याचे काम रोल प्रेस करते. रोल प्रेसमध्ये कोणताही डाग जात नाही. त्यामुळे जर डाग लागला असेल तर रोल प्रेस काही काम येत नाही. पण जर तुमचे कपडे एखादी महागडी साडी तुम्हाला पुन्हा कपाटात नीट ठेवायची असेल तर तुम्ही नक्कीच रोलप्रेस करुन ठेवायला हवी.
ड्राय क्लीन आणि रोल प्रेस कधी करावे?
ड्रायक्लीन आणि रोलप्रेस यामधील फरक तुम्हाला कळला असेल पण तुम्ही रोलप्रेस किंवा ड्राय क्लीन कधी करावे असा प्रश्न पडला असेल तर ही गोष्ट जाणून घ्या.
- तुमच्या महागड्या कपड्यांना तेलाचे किंवा अन्य कशाचे डाग लागले असतील तर तुम्ही अगदी हमखास ते कपडे ड्राय क्लीनला द्या.
- एकदा कपडे ड्राय क्लीन करुन आल्यानंतर ते पुन्हा दुसऱ्या वापरानंतर ड्राय क्लीन करता येत नाहीत. कारण त्यामुळे कपडे विरण्याची शक्यता असते. जर तुम्ही पहिल्या वापरानंतर ड्राय क्लीन करत असाल तर डाग घरी काढण्याच्या प्रयत्न करा.
- साधारणपणे ड्राय क्लीन केल्यानंतर असे कपडे 3 ते 4 वेळा घालायला हवेत. त्यानंतर मग ते पु्न्हा धुतले तर चालू शकतात.
- डिझायनर साड्या किंवा अगदी पैठणी अशा साड्या सतत धुवून चालत नाहीत. त्यांच्यावर केमिकल रिॲक्शन होऊन या साड्या लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे साड्या शक्यतो रोल प्रेस कराव्यात त्यामुळे त्या चमकदार दिसतात.
- ओढणी, कुडते. चुरगळलेले ब्लाऊज यांना रोल प्रेस केले तर ते अधिक चांगले राहतात.
आता ड्राय क्लीन की रोल प्रेस काय तुमच्यासाठी योग्य ते वाचून मगच निर्णय घ्या.