शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांचे एक अतुट नाते असते. आपल्याला समजायला लागल्यापासून ते जीवनाच्या शेवटपर्यंत हे नाते जुळलेले असते. शिक्षकांनी दिलेली चांगली शिकवण घेऊन आपण आपल्या आयुष्यात अनेक यशस्वी गोष्टी करत असतो. अशाच शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भावविश्वावर आधारित एक सिनेमा आपल्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे ‘शिष्यवृत्ती’. साज एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि अखिल देसाई निर्मित आणि दिग्दर्शित ‘शिष्यवृत्ती’ हा सिनेमा येत्या 21 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयुष्यात प्रत्येक प्रगतीच्या वाटेवर आपल्याला शिक्षक भेटतात जे आपल्याला योग्य ते मार्गदर्शन देत असतात. त्यांनीच दर्शविलेल्या त्या मार्गावर चालत आपण यशाचे शिखर गाठत असतो. असेच काहीसे भावविश्व ‘शिष्यवृत्ती’ ह्या सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या चित्रपटात ‘थ्री इडियट’ ह्या हिंदी चित्रपटात सेंटीमीटरची भूमिका साकारणारा दुष्यंत वाघ हा प्रमुख कलाकार म्हणून आपल्या भेटीला येणार आहे. तसेच त्याच्यासोबत रुद्र ढोरे, अंशुमन विचारे, झील पाटील, प्रशांत नगरे, कमलेश सावंत, अनिकेत केळकर, उदय सबनीस आदी कलाकार आपल्याला दिसणार आहेत.
(वाचा : फॉरेनची फॅन ! माधव देवचकेला कुवेतवरून भेटायला आली चाहती)
दुष्यंत वाघ सिनेमात साकारणार शिक्षकाची भूमिका
ह्या चित्रपटाची निर्मिती अखिल देसाई ह्यांनी केली असून सोबतच दिग्दर्शनाची जबाबदारी ही अखिल देसाई ह्यांनी पार पाडली आहे. ह्या चित्रपटातील गाणी प्रसंन्नजीत कोसंबी, जयदीप बागवडकर आणि मिथीला माळी ह्यांच्या सुरात सजली असून भरतसिंग ह्याचे संगीत ह्या चित्रपटाला लाभले आहे.चित्रपटात दुष्यंत वाघ शिक्षक म्हणून तर रुद्र ढोरे हा विद्यार्थी म्हणून प्रमुख भूमिका साकारत आहे. सिनेमाचे पोस्टर आणि टीझर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. शिक्षक- विद्यार्थ्यातील अतूट नाते, त्याचे महत्त्व आणि त्या नात्याचा आदर करणारा ‘शिष्यवृत्ती’ सिनेमा 21 फेब्रुवारी 2020 रोजी चित्रपटगृहात येत आहे.
(वाचा : लग्न ठरवण्यापूर्वी रणबीर-आलिया शोधताहेत हनिमूनसाठी जागा)
नवीन वर्षात हे सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे पहिल्यांदाच एकाच चित्रपटात काम करणार आहे. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी दिग्दर्शित ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटात हा योग जुळून आला आहे. त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात रंगणार आहे. ‘फटमार फिल्म्स एलएलपी’ या निर्मिती संस्थेकडून ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ची निर्मिती करण्यात येत आहे. हा सिनेमा 3 एप्रिल 2020 ला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.
(वाचा : FIRST LOOK : अक्षय कुमारचा सिनेमा ‘पृथ्वीराज’मध्ये अशी दिसणार मानुषी छिल्लर)
‘चंद्रमुखी’
मराठीमध्ये ‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं गेलं, ऐकलं गेलं ते सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतून आणि आता ‘चंद्रमुखी’ नाव मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात एका नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आणि त्या सिनेमाचे नाव आहे ‘चंद्रमुखी’. आपल्या रपाने आणि घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहीत करणारी सौंदयवती, ‘चंद्रमुखी’ हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्रं. त्यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या मराठी सिनेमाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी सांभाळली आहे. लेखकाचं मनोगत पडद्यावर मांडण्याचं प्रसाद ओक यांचं कौशल्य अनेकांनी त्यांच्या ‘हिरकणी’ या सिनेमात अनुभवलं आहे. ‘चंद्रमुखी’ सिनेमाचे पटकथा- संवाद चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेले आहे. ‘हिरकणी’ची लेखक-दिग्दर्शक जोडी ‘चंद्रमुखी’साठी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.
हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade