DIY सौंदर्य

सनटॅन घालवण्यासाठी बेस्ट आणि सोपे उपाय

Leenal Gawade  |  Jan 13, 2022
सनटॅन घालवण्यासाठी उपाय

 एखाद्या छान ठिकाणी फिरायला गेल्यानंतर तेथील उन्हात फिरताना किंवा त्या वातावरणाचा आनंद घ्यायला त्यावेळी काहीही वाटत नाही. पण घरी परतल्यानंतर जे काही टॅन व्हायला होते. त्यामुळे मूड चांगलाच ऑफ होतो. काही टॅन काही केल्या जात नाही. तुम्हीही हल्लीच्या काळात बीच किंवा अशा ठिकाणी फिरून आला असाल आणि शरीरावर टॅनचे काही पॅचेस आले असतील तर तुम्ही काही सोपे उपाय फॉलो करुन सनटॅन घालवू शकता. सनटॅन हा असा पटकन जात नाही. त्याला घालवण्यासाठी थोडा धीर धरावा लागतो. काही उपाय करुन त्याला थोडे थोडे कमी करण्यास नक्कीच मदत मिळते. चला जाणून घेऊया सनटॅन घालवण्यााठी बेस्ट आणि सोपे उपाय

बदामाच्या फेसपॅकचे आश्चर्यकारक फायदे (Benefits Of Almond Face Pack In Marathi)

कॉफी- बेसन पॅक

 कॉफी आणि बेसन हा पॅक तुमच्या त्वचेसाठी खूपच चांगला आहे. सनटॅन घालवण्यासाठी हा एक उत्तम पॅक आहे. एका भांड्यात दोन चमचे बेसन, एक लहान चमचा कॉफी आणि थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये एक ते दोन थेंब पाणी घाला. ही एकदम जाड पेस्ट व्हायला हवी. त्यामुळे पाणी थोडे जपून घाला. तयार पॅक हा संपूर्ण शरीरासाठी एकदम योग्य आहे. हा पॅक तयार करुन तुम्ही छान वाळेपर्यंत ठेवा. तो चांगला वाळला की, मग तो कोमट पाण्याने किंवा तुम्हाला आवडेल अशा पाण्याने काढून टाका. 

आठवड्यातून तीन वेळा तुम्हाला हा प्रयोग करायला काहीच हरकत नाही.

दही-कॉफी पॅक

दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड हे देखील त्वचेला लाईट करण्याचे काम करते आणि त्वचेवरील टॅन घालवते. तुम्हालाही टॅनचा त्रास झाला असेल तर तुम्ही तो पॅक तयार करु शकता. एका भांड्यात एक चमचा बेसन, एक चमचा कॉफी आणि भिजवण्यासाठी दही घ्यायचे आहे. दही घेऊन तुम्ही छान त्याचा पॅक करायचा आहे. तयार पॅक चेहऱ्यावर, हातावर आणि संबंध अंगावर लावून तुम्हाला चांगला चोळायचा आहे. असे केल्यामुळे सनटॅन कमी होण्यात मदत मिळते. सनटॅन घालवण्यासाठी हा एक उत्तम असा पर्याय आहे. 

आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग करा.

बटाटा-बेसन-दही पॅक

सनटॅन

बटाटामध्येही काही घटक असतात. ज्यामुळे त्वचा लाईट होण्यास मदत मिळते. तुम्हाला कच्चा बटाटा घेऊन तो चांगला किसायचा आहे. बटाटा किसून लावल्यामुळे त्याचा गर चांगला त्वचेला लागतो. बटाट्याचा गर- बेसन आणि दही असे सांहित्य एकत्र करुन तुम्हाला त्याचा एक जाडसर पॅक तयार करायचा आहे. हा पॅक लावल्यामुळेही त्वचेवरील टॅन निघण्यास मदत मिळते. तुम्ही अगदी हमखास हा पॅक वापरा तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये झालेला फरक नक्की जाणवेल. 

कोणतेही स्किनकेअर उपाय करताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते. एकाचवेळी तुम्ही सगळे उपाय अजिबात करु नका. कारण असे केल्यामुळे त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते. ते तुम्हाला नको असेल तर उपायांमध्ये थोडा गॅप ठेवा. नाहीतर त्याचा परिणाम दिसून येणार नाही.  

शरीरावर या पाच ठिकाणी सनस्क्रीन लावणं आहे अत्यंत गरजेचं

Read More From DIY सौंदर्य