Styling

कलर केलेल्या केसांवर शोभून दिसतात या हेअरस्टाईल

Leenal Gawade  |  Dec 2, 2020
कलर केलेल्या केसांवर शोभून दिसतात या हेअरस्टाईल

हेअर कलर करुन थोडासा लुक बदलायला अनेकांना आवडते. तुम्हीही येत्या काळात केसांना रंग करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या केसांना काही खास हेअरस्टाईल या चांगल्या दिसू शकतात. तुम्ही केलेल्या हेअर कलरला चांगला न्याय देऊ शकता.तुमचे केस कोणत्याही प्रकाराचे असोत तुमच्या हेअर कलरला या हेअरस्टाईल नक्कीच न्याय देऊ शकतील. चला जाणून घेऊया अशा काही सोप्या आणि रोजच्या रोज करता येतील अशा हेअरस्टाईल.

हेअरस्टाईल करताना हेअर स्टायलिंग स्प्रे वापरताय, मग वाचाच

बीच वेव्हज ( Beach wave)

Instagram

जर तुम्हाला कुरळे केस आवडत असतील तर तुम्हाला हा नवा पर्याय नक्की आवडेल. बीच वेव हा प्रकार थोडासा सैल कर्ल्सचा असतो. तुम्ही टाँगचा उपयोग करुन ही हेअरस्टाईल मिळवू शकता. साडी, ड्रेस, पार्टीवेअर अशा कोणत्याही कपड्यांव ही हेअरस्टाईल उठून दिसते. केलांना रंग केला असेल तर ही हेअरस्टाईल अधिक उठून दिसते. तुमचे केस लहान असतील तर त्यावर ही हेअरस्टाईल अधिक उठून दिसते. 

लग्नसमारंभात किंवा खास कार्यक्रमांसाठी घरीच करा अशी ‘अंबाडा’ हेअरस्टाईल- Ambada Hairstyles

द बायकर ब्रेड ( Biker Braid)

Instagram

तुमच्या केसांना थोडा स्पोर्टस लुक हवा असेल तर तुम्ही बायकर ब्रेड नक्कीच करा. बायकर ब्रेड हे वेगवेगळ्या पद्धतीच्या वेणी बांधून केल्या जातात. तुम्ही पुढच्या बाजूला केसांचा पफ काढून घ्या. त्यानंतर केसांची मागच्या बाजूला वेगवेगळ्या पद्धतीने मोकळ्या वेणी घालून घ्या. म्हणजे तुम्हाला ते वेगवेगळ्या पद्धतीने सोडता येतील. 

एंटवाईन ( Entwine)

Instagram

मुंग्याची जशी रांग असते. त्याप्रमाणेच ही हेअरस्टाईल असते. केसांच्या पुढच्या भागाचा पफ काढून  कानाच्या जवळच्या केसांची बट घेऊन त्याची दोन्ही बाजूने वेणी घाला. थोड्या अंतरावर अजून एक बट घेऊन त्याची वेणी घाला. आता आतल्या केसांची  बट घेऊन मागच्या बाजू पीनच्या मदतीने एकत्र करा. त्यानंतर केसांची बाहेरची बट घेऊन ती त्या खाली टक करा. हे केस मागे एखाद्या मुंग्यांच्या रांगेप्रमाणे दिसतील. 

पावसाळ्यात केसांच्या करा या झटपट हेअरस्टाईल आणि दिसा trendy

रेव्हिंग रोप्स (Raving Rops)

Instagram

केसांच्या क्राऊन भागावरील केसांचा पफ काढून घ्या.  उरलेल्या बाजूच्या केसांची पाच पेढ्यांची वेणी घालून घ्या. असे करताना तुम्हाला ही वेणी केसांच्या शेवटच्या टोकापर्यंत न्या.  ही हेअरस्टाईल थोडासा स्पोर्टी लुक देऊ शकते. पण ती खूपच चांगली  दिसते. तुमच्या केसांना संपूर्ण ग्लोबल कलर केला असेल किंवा तुमच्या केसांना हायलाईट केला असेल तर ही हेअरस्टाईल अधिक चांगल्या पद्धतीने उठून दिसते. ही हेअरस्टाईल करण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागेल पण ही हेअरस्टाईल केल्यानंतर खूपच चांगली दिसते. त्यामुळे थोडा वेळ घालवायला काहीच हरकत नाही.

 

आता या हेअरस्टाईल करुन तुमच्या कलर केसांना न्याय मिळवून देऊ शकता. 

Read More From Styling