Acne

त्वचेवरील मुरूमांपासून सुटकेसाठी सोपे घरगुती उपाय

Dipali NaphadeDipali Naphade  |  Sep 20, 2020
त्वचेवरील मुरूमांपासून सुटकेसाठी सोपे घरगुती उपाय

शहरातील लोकांना प्रदूषण आणि धुळीमुळे सर्वात जास्त कोणती समस्या अधिक उद्भवत असेल तर ती म्हणजे त्वचेवर येणारी मुरूमांची. कितीही काळजी घेतली तरीही आपल्या अनियमित खाण्याच्या वेळा, प्रदूषण, सततची धावपळ, ताण, तणाव यामुळे चेहऱ्यावर मुरूमं येतातच.आपण चेहर्‍यावरील मुरुमांसाठी क्रीम वापरू शकता किंवा घरगुती उपचार वापरू शकता. सर्वात जास्त ही समस्या जाणवते ते टीएनएजर्स अर्थात नुकत्याच वयात आलेल्या मुलींना. पण यासाठी तुम्हाला सतत पार्लरची ट्रीटमेंट अथवा महागड्या ब्रँडच्या मुरुम काढण्याची क्रिम्सची आवश्यकता नाही. त्वचेवरील मुरूमांपासून सुटकेसाठी अनेक सोपे घरगुती उपाय आहेत. तेच आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. तुम्ही याचा वापर केल्यास, तुम्हालाही मुरूमांपासून त्वरीत सुटका मिळू शकते. घरच्या घरी तुम्ही हे उपाय करून या त्रासापासून सुटका करून घ्या. तसंच त्वचेवर सतत धूळ जमू नये म्हणून तुम्ही MyGlamm चे वाईपआऊटही वापरू शकता.

पपई

Shutterstock

गालावर मुरूमं आल्यास, पपई हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. मुळात पपईचे गुणधर्म तुमच्या त्वचा अधिक चमकदार आणि मुलायम बनविण्यास फायदेशीर ठरतात. त्वचेवरील डेड स्किन अर्थात मृत त्वचा काढून टाकून त्वचा अधिक सुंदर बनविण्यासाठी पपईचा उपयोग होतो. तसंच त्वचेला स्वच्छ  करण्याचं आणि त्वचेतून माती काढून टाकण्याचं कामही पपई करते. म्हणून नैसर्गिकरित्या उत्तम घटक म्हणून याचा वापर करता येतो. 

 

अॅप्पल साईड व्हिनेगर

Shutterstock

अॅप्पल साईड व्हिनेगर हा सर्वात सोपा आणि प्रसिद्ध असा घरगुती उपाय आहे. यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिबॅक्टेरियल घटक आढळतात. मात्र याचा वापर करताना अतिशय सावधानता बाळगावी लागते. कारण कधीतरी संवेदनशील त्वचेवर यामुळे इन्फेक्शन होण्याची भीती असते. 

चेहऱ्यावर असतील मुरूमं, तर नक्की ट्राय करा ‘हे’ फेस वॉश (Best Face Wash For Pimples)

टी ट्री ऑईल

Shutterstock

टी ट्री ऑईल मुरूमांसाठी उपयुक्त मानले जाते. हे त्वचा अधिक मुलायम बनवते आणि अँटिबॅक्टेरियल घटक असल्यामुळे त्वचेतील रेडनेस अर्थात लालिमा कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते. 

चेहऱ्यांवरील मुरुमांपासून कशी होणार सुटका – घरगुती उपाय, आहार आणि बरंच काही (How To Remove Pimples In Marathi)

कोरफड

Shutterstock

त्वचेसाठी कोरफड हे एक वरदान मानलं जातं. मुरूमांसाठी हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. हे केवळ मुरूम हटविण्यासाठीच नाही तर त्वचेवर होणारे सर्व स्कार्स अर्थात व्रण ठीक करण्यासाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्ही याचा उपयोग बिनधास्त करू शकता आणि यामुळे त्वचेला कोणतीही हानी पोहचत नाही. यातील इन्फ्लेमेटरी आणि अँटिमायक्रोबायल घटकांमुळे त्वचा हायड्रेट राहण्यासही मदत मिळते. 

 

मध

Shutterstock

चेहऱ्यावर बऱ्याचदा मुरूमांमुळे लालिमा येते. मधाचा वापर करून तुम्ही या दोन्ही समस्या दूर करू शकता. अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा अधिक चमकदार आणि स्वच्छ होण्यासाठी मधाचा उपयोग करून घेता येतो. 

मुरूमं घालवण्यासाठी करा हळदीचा 5 तऱ्हेने उपयोग

नारळाचे तेल

Shutterstock

नारळाचे तेलही मुरूमं घालविण्यासाठी उपयुक्त ठरते. नारळाच्या तेलामध्ये अँटिबॅक्टेरियल घटक आढळतात जे त्वचेतील इन्फ्मेशन ठीक करण्यास फायदेशीर ठरतात

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Acne