त्वचेची काळजी

प्रवास करताना अशी घ्या त्वचेची काळजी

Trupti Paradkar  |  Feb 17, 2020
प्रवास करताना अशी घ्या त्वचेची काळजी

देशविदेशात प्रवास करणं, नवनवीन पर्यटन स्थळांना भेट देणं, समुद्रकिनारी मौजमजा करणं, गिर्यारोहण करणं अशा अनेक गोष्टी वेकेशन प्लॅनमध्ये असू शकतात. मात्र प्रवासासाठी  फिरताना त्वचा आणि केसांची काळजी कशी घ्यायची हे मात्र बऱ्याच जणींना माहीत नसतं. घरी असताना आपण स्कीन केअर रूटीन नेहमीच फॉलो करत असतो. मात्र प्रवासादरम्यान हे रूटीन पाळणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. मात्र असं असलं तरी प्रवासादरम्यान त्वचा आणि केसांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. कारण प्रवासात धुळ, माती, प्रदुषण, सुर्यप्रकाश अशा अनेक गोष्टींशी आपला जवळून संबंध येत असतो. प्रवास करताना या काही सोप्या टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरतील. तेव्हा या टिप्स फॉलो करा आणि  मनसोक्त प्रवास करा. 

तुमचं नेहमीचं ब्युटी रूटीन फॉलो करण्याचा प्रयत्न करा –

प्रवासादरम्यान नवीन स्कीन केअर रूटीन फॉलो करण्याऐवजी तुम्ही दररोज करत असलेलं ब्युटी केअर रूटीन फॉलो करण्याचा प्रयत्न करा. कारण त्यामुळे तुमची त्वचा जास्त फ्रेश आणि टवटवीत राहील. शिवाय नेहमीप्रमाणे त्वचा आणि केसांची काळजी घेतल्यामुळे तुमची त्वचेची काळजी घेण्याची  सवयही मोडणार नाही. मात्र ते शक्य नसेल तर खाली दिलेल्या इतर काही टिप्स फॉलो करण्याचा प्रयत्न करा. 

Shutterstock

प्रवासादरम्यान भरपूर पाणी प्या –

जर तुम्हाला वेकेशनवर असताना सतत फ्रेश दिसायचं असेल आणि त्वचेची काळजी घ्यायची असेल तर सतत पाणी प्या. कारण मुबलक पाणी पिण्याने तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. शिवाय भरपुर पाणी पिण्याच्या  सवयीमुळे तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. 

दिवसभरात कमीत कमी दोन वेळा चेहरा स्वच्छ धुवा –

बऱ्याचदा बाहेर फिरताना तुम्हाला चेहरा स्वच्छ करण्यासाठी वेळ मिळत नाही. बाहेर चेहरा धुण्यासाठी सोय नसेल तर दिवसभर चेहऱ्यावर धुळ, माती, प्रदूषण जमा होतं. यासाठी दिवसभरात कमीत कमी दोन वेळा चेहरा स्वच्छ धुवा.

सतत चेहऱ्यावर वेट टिश्यूचा वापर करू नका –

बऱ्याचदा चेहरा स्वच्छ करण्याची सोय नसेल तर तुम्ही वेट टिश्यूचा वापर करता. वेट टिश्यू अथवा कोणतेही टिश्यू अती प्रमाणात वापरू नका. कारण त्यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. त्वचेच्या  संरक्षणासाठी त्वचेवर आवश्यक नैसर्गिक तेल असणं गरजेचं आहे. मात्र प्रवासादरम्यान सतत टिश्यूचा वापर केल्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि अशा त्वचेला इनफेक्शन लवकर होऊ शकतं. 

Shutterstock

चांगल्या प्रतीचे मॉश्चराईझर वापरा –

प्रवासादरम्यान तुम्हाला तुमचं नेहमीचं स्कीन केअर रूटीन फॉलो करण्याची नक्कीच गरज आहे. यासाठी प्रवासाच्या किटमध्ये चांगल्या प्रतीचे मॉश्चराईझर ठेवा. जर तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यासाठी जात असाल अथवा विमानाने बराच काळ तुम्हाला प्रवास करायचा असेल तर याची तुम्हाला नक्कीच गरज आहे. कधी कधी विमानात जास्त वेळ प्रवास करताना तुमची त्वचा थंड हवामानामुळे कोरडी पडते. अशावेळी चांगल्या मॉश्चराईझरची गरज पडू शकते. 

सनप्रोटेक्शनचं साहित्य बॅगेत जवळच ठेवा –

सुर्यप्रकाशात अथवा समुद्र किनारी फिरल्यामुळे तुमची त्वचा काळवंडते. त्वचेला टॅन होण्यापासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन जरूर लावा. चांगल्या दर्जाचं आणि  जास्त SPF असलेलं सनस्क्रीन वापरल्यास चांगला फायदा होऊ शकतो. सुर्यप्रकाशात जाण्यापूर्वी तीस मिनीटं आधी सनस्क्रीन लावा. शिवाय सुर्यप्रकाशात फिरताना सनग्लासेस, हॅट, स्कार्फ जवळ ठेवायला विसरू नका.

ब्युटी पाऊचमध्ये छोट्या प्रमाणात सर्व सौंदर्यप्रसाधने कॅरी करा –

प्रवासासाठी सौंदर्यप्रसाधने खास ट्रॅव्हल साईझ पॅकिंग मध्ये उपलब्ध असतात. पण जर तुमच्याकडे जर छोट्या पॅकिंगमधील सौंदर्यप्रसाधने नसतील तर ट्रॅव्हलिंग किटमध्ये छोट्या छोट्या डब्यांमध्ये क्लिंझर, मॉश्चराईझर, बॉडीलोशन, सनस्क्रीन लोशन, सिरम अशा गोष्टी घेऊन जा. कारण जर तुम्ही विमानाने प्रवास करणार असाल तर तुम्हाला 100 मिलीपेक्षा जास्त लिक्विड सामानातून कॅरी करता येत नाही. अशावेळी हे पाऊच तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरतं. 

आरामदायक कपडे घाला –

प्रवासात त्वचेला आणि आरोग्याला त्रासदायक कपडे मुळीच घालू नका. कारण आरामदायक कपडे घातल्यामुळे तुमचा प्रवास चांगला होईल शिवाय त्वचेला रॅशेस, पुरळ, इनफेक्शन होणार नाही. यासाठी जास्त घाम अंगात न मुरणारे, सुती, आरामदायक कपडे प्रवासासाठी नक्की कॅरी करा. 

 

 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

प्रवासादरम्यान तुमचेही केस होतात खराब,मग अशी घ्या काळजी

बाळासोबत प्रवास करताय, मग या गोष्टींची घ्या काळजी

प्रेगनन्सी विमान प्रवास करताना या गोष्टी जरूर लक्षात ठेवा

 

 

Read More From त्वचेची काळजी