DIY लाईफ हॅक्स

कांदा कापताना आता डोळ्यात येणार नाही पाणी, करा नामी युक्ती

Dipali Naphade  |  Apr 17, 2020
कांदा कापताना आता डोळ्यात येणार नाही पाणी, करा नामी युक्ती

स्वयंपाकघरामध्ये सर्वात जास्त त्रासदायक ठरणारी भाजी म्हणजे कांदा.  बाकी कोणामुळे डोळ्यात पाणी येवो न येवो कांद्यामुळे डोळ्यात पाणी आले नाही असा एकही माणूस सापडणार नाही. बरं आपले जेवण कांद्याशिवाय पूर्ण होतही नाही.  त्यामुळे कांदा हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. काही जणांच्या डोळ्यातून कांदा चिरताना खूपच पाणी येते. तर काही जणांना त्याचे टेक्निक जमलेले असते. कांद्यामध्ये असणाऱ्या सिंथेस एंजाइममुळे कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते. यामुळे तुमच्या डोळ्यात जळजळ निर्माण होते आणि आपोआपच पाणी येते. पण कांदा कापताना तुम्हाला डोळ्यातून पाणी यायला नको असेल तर तुम्ही काही नामी युक्ती नक्कीच करू शकता. कोणत्या  या युक्ती आहेत हे आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत. आजच तुम्ही या युक्ती करून बघा आणि डोळ्यातून पाणी येत नाही ना? हे नक्की आम्हाला टॅग करून सांगा. 

पाण्यात कापा कांदा

तुम्ही जर पाण्यात कांदा कापला तर वेपर फॉर्मोशनला बाधा येते आणि यातील एन्जाईम नष्ट होते. ज्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी येत नाही.  पाण्यात कांदा कापायचा म्हणजे नक्की काय करायचे? तर तुम्ही एखादे पसरट भांडे घेऊन त्यात पाणी घाला आणि त्यामध्ये कांदा ठेऊन तो कापा. असे केल्याने तुमच्या डोळ्यातून पाणी येणार नाही. 

महागड्या कांद्याला करा हद्दपार, या स्वस्त-मस्त पर्यायांनी स्वादिष्ट होईल स्वयंपाक

पाण्यात कांदा भिजवा

Shutterstock

पाण्यात कांदा भिजवल्याने यातील अॅसिडिक एन्जाईम निघून जाण्यास मदत मिळते आणि त्यामुळे डोळ्यातून पाणी येत नाही. यासाठी तुम्ही एक पसरट भांडे घ्या. त्यात पाणी घाला. कांद्याची साले काढून तुम्ही कांदा  त्यात साधारण पाच ते दहा मिनिट्स ठेऊन द्या. त्यानंतर कांदा त्यातून काढा आणि मग तुम्ही तो बारीक कापा. तुमच्या डोळ्यातून पाणी अजिबात येणार नाही. 

गरम पाण्याजवळ घेऊन कापा कांदा

गरम पाणी हे कांद्यातून निघणारा दर्प नष्ट करते आणि त्यामुळे आपल्या डोळ्यातून येणारे पाणी थांबवण्यासाठी याचा उपयोग होतो. ज्यामुळे डोळ्यांना अजिबात जळजळ कळत नाही. एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि कांदा कापताना तुम्ही ते तुमच्या कांद्याजवळ ठेवा. असं करून पाहा. तुम्हाला नक्की चांगला अनुभव येईल आणि डोळ्यातून पाणीही येणार नाही. 

परफेक्ट आणि कुरकुरीत भजी करायच्या असतील तर फॉलो करा या टीप्स

च्युईंगम खा

च्युईंगम खाणे  जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा कापताना याचा वापर  करा. तुम्ही जेव्हा च्युईंगम चघळता तेव्हा कांदा कापताना कांद्याचा दर्प हा तुमच्या नाकातून आत जात असतो. पण च्युईंगम खात असताना तुम्ही श्वास घेता आणि ही प्रक्रिया करत असल्यामुळे तुमच्या डोळ्यातून पाणी येत नाही. तुम्हाला याचा फायदा मिळतो. 

मजबूत आणि चमकदार केसांसाठी करा कांद्याच्या रसाचा असा वापर

मेणबत्ती लावा

Shutterstock

तुम्ही जेव्हा कांदा कापणार असाल तेव्हा तुम्ही तुमच्या बाजूला मेणबत्ती लावा.  तुम्हाला कदाचित हे वाचून थोडं आश्चर्य वाटेल. पण मेणबत्तीमधून निघणारी वाफ ही अॅसिड एन्जाईमला आपल्या लॅक्रिमल ग्लँडपर्यंत पोहचवण्यापासून रोखते. ज्यामुळे आपल्या डोळ्यातून पाणी येत नाही. कांदा कापताना तुम्ही अगदी मेणबत्ती जवळ ठेवा. याचा परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येईल. तुमच्या डोळ्यातून अजिबात पाणी येणार नाही. 

 

Read More From DIY लाईफ हॅक्स