घर आणि बगीचा

बेडशीट्स आणि उशांना येत असेल घामाची दुर्गंधी, तर वापरा सोप्या टिप्स

Dipali Naphade  |  Mar 16, 2021
बेडशीट्स आणि उशांना येत असेल घामाची दुर्गंधी, तर वापरा सोप्या टिप्स

उन्हाळा सुरू झाला आहे आणि अशावेळी आपल्याला अगदी खाण्यापिण्यापासून सगळी व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. या उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे घामाचा. काही जणांना आंघोळ केल्यानंतरही रात्री झोपेत घाम येतो. यामुळे उशी आणि बेडशीट्सला घाम लागून यातून दुर्गंधी (body odour) येण्याची खूपच शक्यता असते. या दुर्गंधीयुक्त उशा आणि बेडशीट्समध्ये किटाणू आणि बॅक्टेरिया लपलेले असतात. यामुळे अनेकांना खाज आणि अंगावर रॅश येण्याचा त्रासही होतो. बऱ्याचदा बेडशीट्स आणि उशा नेहमीच्या साबणांनी धुतल्यानंतरदेखील ही घामाची दुर्गंधी तशीच राहाते. या अशा दुर्गंधीयुक्त उशांमुळे आणि बेडशीट्समुळे रात्री रात्री झोपही लागत नाही. पण तुम्हाला यातून सुटका हवी असेल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स देत आहोत. या टिप्स वापरून तुम्ही घामाची दुर्गंधी दूर करू शकता. 

व्हिनेगरच्या वापराने घालवा बॅक्टेरिया

Shutterstock

पांढऱ्या अर्थात व्हाईट व्हिनेगरमध्ये अॅसिडिक गुण असतात जे उशा आणि बेडशीट्समधील बॅक्टेरिया दूर करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी सर्वात पहिले आपल्याला एक बादलीमध्ये गरम पाणी घ्यावे लागते. त्यामध्ये थोडे थंड पाणी मिक्स करा. हे पाणी जरा कोमट झाले आहे का याचा हात लाऊन अंदाज घ्या. यामध्ये एक भाग व्हाईट व्हिनेगर मिक्स करा. जर तुम्ही उशा आणि बेडशीट्स वॉशिंग मशीनमध्ये धुणार असाल तर तुम्ही व्हाईट व्हिनेगर त्यात आधीच मिक्स करा. साबणाच्या पाण्यात तुम्ही व्हिनेगर टाकले तरीही चालेल. याचा वापर केल्यास घामाची दुर्गंधी जाण्यास मदत मिळते. 

टॉप 10 आयडियाजमुळे तुमचं बेडरूम दिसेल अधिक सुंदर!

हायड्रोजन पेरॉक्साईड वाढवेल चमक

Shutterstock

व्हिनेगरमधून तुम्ही भिजवून हे कपडे बाहेर काढल्यानंतर तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये गरम पाणी आणि साबण मिक्स करा. तुम्हाला हवं तर तुम्ही अर्धा कप हायड्रोजन पॅराक्सॉईड मिक्स करू शकता. हे कपड्यांवरील डाग घालविण्यासह कपड्यांवरील चमक वाढविण्यासाठीही उपयुक्त ठरते. तसंच तुम्ही बेडशीट्स आणि उशा एकत्र धुऊ नका. आधी बेडशीट्स धुवा आणि मग दोन उशा धुवा. असे केल्याने घामाची दुर्गंधी जाण्यास मदत मिळते. 

उशांमुळे घराला आणा वेगळा ‘लुक’

ऊन दाखवणे आहे गरजेचे

व्हिनेगर आणि साबण घालून जेव्हा तुम्ही बेडशीट्स आणि उशा स्वच्छ करता, त्यानंतरही जर दुर्गंधी येत असेल तर तुम्ही उशा आणि बेडशीट्सना उन्हात वाळत घाला. वॉशिंग मशीनमधून काढल्यानंतर तुम्ही हे कपडे उन्हातच वाळत घालावेत. सूर्याची किरणे यावर पडणे आवश्यक आहे. या कपड्यांमध्ये कोणताही दमटपणा राहता कामा नये. तसंच घामाची दुर्गंधी आणि त्यावरील बॅक्टेरिया जाण्यासाठी ऊन दाखवणे अत्यंत गरजेचे आहे. उन्हामुळे कपड्यांवरील मरून जाण्यास आणि दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळते.

इसेंन्शियल ऑईलने मिळेल अधिक मदत

Shutterstock

बेडशीट्स आणि उशा सुकवल्यानंतर तुम्हाला जर ड्रायरचा वापर करायचा असेल तर तुम्ही त्यात लव्हेंडर इसेंन्शियल ऑईलच मिक्स करू शकता. त्वचेशिवाय यामध्ये स्वच्छता राखण्याचेही गुण आहेत. तुम्ही सुती अथवा कॉटनच्या बेडशीट्सवर 5-6 थेंब लव्हेंडर इसेंन्शियल ऑईल स्प्रे केल्यानंतर ड्रायर वापरा. नॉर्मल टेम्परेचर सेटिंगवरच तुम्ही ड्रायर चालवा. लव्हेंडर ऑईल डोकं अतिशय शांत ठेवते आणि याच्या सुगंधाने तुम्हाला चांगली झोपही लागते. 

घरच्या उशा स्वच्छ करताना होतोय त्रास तर वापरा सोपी पद्धत

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From घर आणि बगीचा