DIY लाईफ हॅक्स

अधिक काळ तूप टिकविण्याच्या सोप्या टिप्स, स्वाद राहील टिकून

Dipali Naphade  |  Feb 9, 2021
अधिक काळ तूप टिकविण्याच्या सोप्या टिप्स, स्वाद राहील टिकून

खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये असे काही पदार्थ असतात ज्यांना आपण व्यवस्थित स्टोअर केले नाही अथवा नीट हवाबंद डब्यात भरून ठेवले नाहीत तर हे पदार्थ खराब होतात अथवा त्यांना एक विशिष्ट आणि वेगळा स्वाद येतो. विशेषतः दूध आणि दह्याने तयार करण्यात आलेले पदार्थ. यामध्ये आपल्या घरात सर्वात जास्त वापरण्यात येणारा पदार्थ म्हणजे तूप. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तूप सर्वांनाच आवडतं. तुम्ही तूप अधिक काळ टिकविण्यासाठी कसे स्टोअर करायला हवे हे या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तूप तुम्ही जुने असले तरीही वापरू शकता. अगदी रवाळ तूपही खूप चांगले तुम्हाला टिकवून ठेवता येते. आम्ही सांगितलेल्या काही टिप्स वापरून तुम्ही तूप अधिक काळ टिकवून ठेऊ शकता. तूप नीट ठेवले नाही तर त्यातून एक विशिष्ट उबट वास येतो आणि त्यामुळे आपल्याला तूप खराब असून खाऊ नये असं वाटतं. पण या वासातून तुम्हाला सुटका हवी असेल आणि नेहमी साजूक तुपाचा वास आणि स्वाद हवा असेल तर वापरा काही सोप्या टिप्स.

तूप काढण्याची पद्धत हवी योग्य

Shutterstock

बऱ्याच घरांमध्ये बाजारातील तुपापेक्षा घरच्या घरी तयार करण्यात आलेले तूप वापरण्यात येते. त्यासाठी घरात साय काढून त्याचे लोणी तयार करण्यात येते. पण जेव्हा हे लोणी आपण काढतो अथवा साय आपण जमा करतो ती साय आंबट होऊ न देणं हे सर्वात जास्त महत्वाचे आहे. जर तुमची साय आंबट झाली तर तुपाचा स्वाद अजिबात चांगला येत नाही आणि तुपाचा एक वेगळा वासही येतो. तुम्ही जर जास्त दिवस साय साठवणार असाल तर ही साय फ्रिजमध्ये योग्यरित्या डब्यात भरून ठेवा. तसंच साय अजिबात भांड्यात ठेवल्यावर उघडी ठेऊ नका. यावर झाकण असायला हवे. अन्यथा त्याला फ्रिजमधील एक विशिष्ट वास लागतो. तुम्हाला हवं तर तुम्ही सायीमध्ये थोडंसं दही मिक्स करून घ्या. यामुळे तूप अधिक चांगले तयार होते. लोणी काढल्यावर ते व्यवस्थित धुवा. तसंच लोणी कढवल्यास, तूप खराब होते. 

सौंदर्य वाढविण्यासाठी करा तुपाचा वापर, चेहरा आणि केस होतील चमकदार (Ghee For Skin & Hair)

योग्य भांड्यांमध्ये करा तूप स्टोअर

Shutterstock

पुरातन काळात तूप हे स्टील अथवा मातीच्या भांड्यामध्ये स्टोअर करण्यात येत होते. यामुळे तूप लवकर खराब होत नाही. पण काळानुसार स्वयंपाकघरातील भांडीही बदलली गेली. मातीच्या भांड्याचा खूपच कमी वापर करण्यात येतो. तूप ठेवण्यासाठी हल्ली अधिकाधिक स्टील अथवा प्लास्टिकच्या डब्यांचा उपयोग केला जातो. काही जण तर असे आहेत जे बाजारातून आणलेले तूप हे असलेल्या पॅकिंगसह तसंच स्टोअर करतात. पण ही योग्य पद्धत नाही. तुम्हाला अधिक काळ तूप टिकवायचे असेल तर तूप प्लास्टिकच्या डब्यात ठेवण्यापेक्षा स्टीलच्या भांड्यात ठेवा. यामुळे तुपाचा स्वाद आणि रंग दोन्ही खराब होणार नाही.

गावठी तूप खा आणि मिळवा आरोग्यासाठी अफलातून फायदे

योग्यरित्या करा वापर

Shutterstock

तूप हे नेहमी झाकूनच ठेवायला हवे. जर तुपाला हवा लागली अथवा यामध्ये पाणी गेले तर त्याचा स्वाद लवकर खराब होतो आणि तूप टिकतही नाही. बऱ्याच घरांमध्ये तूप हे फ्रिजमध्ये ठेवण्यात येतं. पण यामुळे तूप अधिक घट्ट बनते. त्यामुळे जेव्हा तूप खायचे  असेल तेव्हा ते बरेच जण पुन्हा पुन्हा गरम करून घेतात, जे अजिबात योग्य नाही. तुपाचा डबा बाहेरच ठेवा. ज्यामुळे त्याचा मूळ स्वाद टिकून राहतो. त्याचा नैसर्गिक रवाळपणा टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तूप बाहेरच ठेवायला हवे. तसंच तुम्ही जर फ्रिजमध्ये  ठेवणार असाल तर तुम्हाला ज्यावेळी खायचे आहे त्याआधी एक तास आधी तुपाचा डबा बाहेर ठेवा. जेणेकरून त्याचा घट्टपणा कमी होईल. सतत तूप गरम करू नका. तूप स्टोअर करायचे असेल तर दिलेल्या या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

पोळीवर तूप लावून खाण्याचे होतात अप्रतिम फायदे

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स