खाणंपिण आणि नाइटलाईफ

भाजलेले चणे खा आणि झटपट वजन कमी करा

Leenal Gawade  |  Sep 11, 2019
भाजलेले चणे खा आणि झटपट वजन कमी करा

वजन कमी करण्यासाठी व्यायाम सोडून  सगळं काही करायला अनेक जण तयार असतात.  प्रत्येकाला झटपट असा उपाय हवा असतो. आताचे लाईफस्टाईल पाहता कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठीच लोकांना इतका वेळ लागतो की, रोज व्यायाम करायला मिळेल की नाही याची अजिबात खात्री देता येत नाही. अशावेळी चांगले खाणे हाच पर्याय असतो. वजन कमी करण्यासाछी अनेक गोष्टी खाण्यासाठी सांगितल्या जातात त्यापैकीच एक आहे भाजलेले फुटाणे.. भाजलेल्या फुटाण्यांमध्ये तुमचे वजन कमी करण्यासोबतच अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया भाजलेल्या फुटाण्यांचे फायदे

Relaxationसाठी महिलांनी करायलाच हवे Body spa

वजन करते कमी

shutterstock

वजन कमी करण्यासाठी भाजलेले चणे खाण्याचा सल्ला दिला जातो. या मागे एक कारण आहे. ते म्हणजे भाजलेले चण्यांमुळे तुमच्या शरीरातील चरबी वितळण्यास मदत होत असते. म्हणूनच ज्यावेळी तुम्हाला नको ते खाण्याची इच्छा होईल त्यावेळी तुम्ही भाजलेले फुटाणे म्हणेच चणे खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही हमखास ही गोष्ट करायला हवी हे लक्षात ठेवा

पचनशक्ती वाढवते

चणे खाल्ल्यामुळे गॅस होते हे अनेकांना माहीत आहे. म्हणूनच अनेक जण चणे फुटाणे खाणे टाळतात. पण तुम्हाला माहीत आहे का चणे खाल्ल्यामुळे तुमची पचनशक्ती वाढते. चण्यामुळे तुमचे रक्त शुद्ध होते. चण्यामध्ये असलेले फॉस्फर हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. त्यामुळे किडणीतील अतिरिक्त मीठही निघून जाते.  

चुकूनही ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खाऊ नका, होतील दुष्परिणाम

मूत्रासंदर्भातील आजार

shutterstock

चणे खाल्ल्यामुळे मूत्रांसदर्भातील समस्या दूर होतात. काही जणांना सतत लघवीला जाण्याची सवय असते. अशांना तर चणे फारच लाभदायक आहेत. तुम्ही दररोज चणे आणि गूळ याचे सेवन केले तर तुम्हाला अवघ्या काहीच दिवसात हा त्रास कमी झालेला जाणवेल. तुम्हाला सतत होणारा लघवीचा त्रास कमी होईल. रोज अगदी मूठभर चणे तरी तुम्ही खायला हवेत.

त्वचा करते तजेलदार

जर तुम्हाला सुंदर, तजेलदार त्वचा हवी असेल तर तुम्ही चण्याचे सेवन करायला हवे. चण्यातील रक्त शुद्ध करण्याच्या गुणाचा तुम्हाला फायदा त्वचेसाठी होऊ शकतो. तुमची त्वचा पिंपल्सरहीत होण्यास चणे मदत करु शकते. त्यामुळे जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास असेल तर तुम्ही आजपासूनच चणे खायला सुरुवात करा.

घर स्वच्छ ठेवण्यासाठी सोप्या टिप्स

बद्धकोष्ठता होईल कमी

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही चणे हमखास खायला हवेत. कारण चण्यामुळे तुम्हाला असलेला बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होईल. बद्धकोष्ठता असल्यास तुम्हाला सतत अस्वस्थ आणि आळशी असल्याचे जाणवत राहते. चणे खाल्ल्यामुळे तुमचे मल बाहेर पडण्यास मदत होते. 

सालीसकट खा चणे

shutterstock

चण्यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन असते. पण जर तुम्ही चणे सोलून खात असाल तर असे करु नका. तर चणे सालीसकट खा. दिवसाला तुम्हाला अगदी  50 ग्रॅम चणे खायचे आहेत. चणे खाताना तुम्हाला घास लागत असेल तर त्याचा अधिक फायदा मिळवण्यासाठी तुम्ही चणे गुळासोबत खाण्यास काहीच हरकत नाही. 

मग आता इतके फायदे मिळत असतील तर आतापासूनच चणे खाण्यास सुरु करा. 

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ