DIY सौंदर्य

स्ट्रॉबेरी खा आणि मिळवा सुंदर नितळ त्वचा

Leenal Gawade  |  Dec 8, 2019
स्ट्रॉबेरी खा आणि मिळवा सुंदर नितळ त्वचा

 सध्या स्ट्रॉबेरीचा सीझन सुरु झाला आहे.  बाजारात हळुहळू स्ट्रॉबेरीचज येऊ लागल्या आहेत. लाल चुटुक, आबंड- गोड लागणारं हे फळ अनेकांच्या आवडीचं असतं. वर्षाच्या 12 महिने तुम्हाला या फळाचा आनंद घेता येत नाही. तर केवळ थंडीच्या काळातच तुम्हाला या फळाचा आस्वाद घेता येतो. या स्ट्रॉबेरीजचे अनेक फायदे आहेत. पण एक फायदा तुम्हाला हवा हवासा आहे तो म्हणजे तुमच्या त्वचेला सुंदर आणि नितळ बनवण्याचा.. आज जाणून घेऊया स्ट्रॉबेरीचे तुमच्या चेहऱ्यासाठीचे फायदे

आयलायनर आणि मस्कारा काढण्याच्या या आहेत सोप्या ट्रीक्स

shutterstock

तुमची स्किनटोन करते लाईट

प्रत्येकाला गोरं होण्याचं वेड असतं. पण स्कीनटोन लाईट करणे आणि गोरेपणा यामध्ये बराच फरक आहे. तुमच्या चेहऱ्यावर धूळ- माती साचून राहते. ती जास्त काळासाठी तशीच राहिली की, मग तुमची त्वचा काळवंडलेली दिसू लागते. अशावेळी तुम्हाला तुमच्या त्वचेचा रंग उजळवायचा असेल तर तुम्ही स्ट्रॉबेरीज खायला हवीत. स्ट्रॉबेरीजमधील व्हिटॅमिन C आणि नैसर्गिक अॅसिड तुमच्या त्वचेवरील डाग कमी करते . 

सनडॅमेजपासून वाचवते

त्वचेला आणखी एका गोष्टीची भीती असते ती म्हणजे सूर्याच्या प्रखर किरणांची.स्ट्रॉबेरीजमधील अँटीऑक्सिडंट तुमच्या चेहऱ्याचे नुकसान होण्यापासून बचाव करते. तुमच्या त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या काळे डाग स्ट्रॉबेरीमुळे पडत नाही. त्यामुळे तुमची त्वचा सुरक्षित राहते.        

कोलॅजनला देते चालना

shutterstock

तुमची त्वचा चांगली हवे असेल तर तुमच्या त्वचेखाली असणारे कोलॅजन चांगले राहणे गरजेचे असते. व्हिटॅमिन C मुळे कोलॅजनला चालना मिळते आणि तुमची त्वचा तुकतुकीत आणि चांगली दिसू लागते.  त्यामुळे तुम्ही एका दिवसात किमान 10 ते 12 स्ट्रॉबेरीजचे सेवन करायला विसरु नका. 

पिंपल्स करते कमी

आपल्या त्वचेवर असलेले पिंपल्स आपल्याला अगदी नकोसे होतात. अनेक इलाज करुनही जेव्हा ते जात नाहीत त्यावेळी फारच कंटाळा असतो. अशावेळी तुम्ही स्ट्रॉबेरीजचे सेवन करा. तुमच्या त्वचेवर पिंपल्स तयार होतात. त्यामागे असते. Sebum आणि तेल. जर तुमच्या त्वचेखाली असलेल्या थरामध्ये याची निर्मिती होत राहिली तर तुम्हाला पिंपल्स येतात. अशावेळी तुम्हाला स्ट्रॉबेरीजच्या सेवनाचा फायदा होऊ शकेल. स्ट्रॉबेरीच्या सेवनामुळे पिंपल्स येण्यासाठी कारणीभूत असलेल्या sebum आणि तेलाची निर्मिती नियंत्रणात राहते आणि तुमची त्वचा चांगली दिसू लागते. 

चेहऱ्याला आणते नैसर्गिक ग्लो

shutterstock

चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो आणण्याचे काम स्ट्रॉबेरीज करत असते. त्याच्या नित्य आणि योग्य प्रमाणातील सेवनामुळे तुमच्या त्वचेला भरपूर फायदे मिळत असतात. त्यामुळे तुमच्या त्वचेला आपोआपच एक छान ग्लो येऊ लागतो. तुमची त्वचा छान लाल दिसू लागते. आता तुम्हाला चांगली त्वचा हवी असेल तर स्ट्रॉबेरीजचे सेवन करायला विसरु नका.

एका रात्रीत निघून जाईल हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा, करा घरगुती उपाय

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From DIY सौंदर्य