एकता कपूर टेलिव्हिजन माध्यम आणि बॉलीवूडमधली एक लोकप्रिय सेलिब्रेटी आहे. टेलिव्हिजन माध्यमात अनेकांचा चेहरा लोकप्रिय करण्यात एकता कपूरचा हात आहे. हिंदीतील डेलीसोपच्या अनेक अभिनेत्रींसोबत एकताची खास मैत्री आहे. काहींशी तर तिचं नातं मैत्रीच्या पलीकडचं आहे. मात्र तिच्या या मैत्रीतील यादीतून अनेक नावं सध्या कमी होऊ लागली आहेत. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीसोबत मैत्री तुटल्यानंतर आता आणखी एका खास मैत्रिणीसोबत एकताने दूरावा निर्माण केला आहे.
एकता आणि मोनाच्या नात्यात का आला दूरावा
एकता कपूरची आणि अभिनेत्री मोना सिंह यांच्या नात्यात फूट पडल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार त्या दोघींच्या नात्यात सध्या दूरावा आलेला आहे. एवढंच नाहीतर त्या दोघींनी एकमेकींना सोशल मीडियावरूनदेखील अनफॉलो केलं आहे. अशी चर्चा होण्यामागचं कारणदेखील तसंच आहे. एकता कपूर बऱ्याचदा तिच्या मालिकांच्या यशाची अथवा लॉंचसाठी पार्टी देत असते. या पार्टीजमध्ये ती मालिकांमध्ये काम करणाऱ्या आणि तिच्या खास जवळच्या कलाकारांना नेहमीच आमंत्रित करते. नुकतीच एकताने तिच्या मॉम MOM (मिशन ओवर मार्स) आणि कोल्ड लस्सी और चिकन मसाला या वेबसिरिजची लॉंच पार्टी ठेवली होती. या पार्टीत एकताने साक्षी तन्वर, दिव्यांका त्रिपाठी, राजीव खंडेलवाल, निधी सिंह, पॉलोमी घोष अशा अनेक कलाकारांना आमंत्रित केलं होतं. या कलाकारांच्या टीममध्ये मोना सिंह मात्र नव्हती. मॉम या वेबसिरिजमध्ये मोना एका प्रमुख भूमिकेत आहे. मात्र असं असूनही ती या पार्टीत न आल्यामुळे याची चर्चा होणं स्वाभाविकच आहे. ज्यामुळे एकता आणि मोनाच्या नात्यात दूरावा आल्याचं म्हटलं जात आहे. मोना सिंहने मात्र तिची तब्येत ठीक नसल्यामुळे या न पार्टीत आल्याचं सांगितलं आहे. मात्र असं असूनही मोना सिंह जाणिवपूर्वक या पार्टीला आली नाही असं म्हटलं आहे. कारण त्या दोघींनी त्यांच्या इंन्स्टा अंकाऊंवरून एकमेकींना अनफॉलो केलं आहे. शिवाय यामागचं कारण त्या दोघी सध्या एकमेकींशी बोलत नाही असं म्हटलं जात आहे. ज्यामुळे एकता आणि मोनाच्या नात्याला ग्रहण लागल्याचं दिसत आहे. मात्र यामागचं नेमकं कारण त्या दोघींनीही जाहीर केलेलं नाही.
मोना सिंहला एकताने दिला होता ब्रेक
मोनाने एकताच्या ‘जस्सी जैसी कोई नही’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. ही मालिका 2003 मध्ये प्रदर्शित झाली होती.मोनाला लॉंच करण्यासाठी या मालिकेत एकताने फार मेहनत घेतली होती. या मालिकेच्या प्रमोशनसाठी अनेक वेगवेगळ्या पद्धती वापरल्या होत्या. त्यानंतर मोना आणि एकतामध्ये एक छान मैत्रीचं नातं निर्माण झालं. मोनाने ‘राधा की बेटियाॅं कुछ कर दिखाएगी’, ‘क्या हुआ तेरा वादा’, ‘प्यार को जाने दो’ या मालिकेमध्ये काम केलं होतं. मोनाने थ्री इडीएट या सिनेमामध्ये काम केलं होतं. शिवाय झलक दिखला जा, कॉमेडी क्लासेस, कॉमेडी नाईट लाईव्ह बटावो अशा रिअॅलिटी शोमध्येदेखील ती झळकली होती. आता बऱ्याच दिवसांनी मोना सिंह एकताच्या MOM (मिशन ओवर मार्स) या वेबसिरिजमध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. मात्र एकता आणि मोनाची मैत्री तुटल्याच्या चर्चेमुळे त्यांच्या चाहत्यांना नक्कीच वाईट वाटत आहे.
एकताने लॉंच केलेले बॉलीवूड कलाकार
एकताने अनेक कलाकारांना टीव्ही मालिकांमधून लाँच केलं आणि त्यांना नावही मिळवून दिलं. यापैकी काही कलाकारांनी आपलं नशीब बॉलीवूडमध्येही आजमावलं. या कलाकारांनी बॉलीवूडमध्येही आपलं एक स्थान पक्कं केलं आहे. इतकंच नाही तर या कलाकारांनी बॉलीवूडही गाजवलं. एकताने त्यांना दिलेल्या संधीचं सोनं करत त्यांनी पुढे आपलं नशीब बॉलीवूडमध्ये आजमावलं आणि नाव कमावलं. असं असलं तरीही आजही हे कलाकार एकता कपूरला खूपच मानतात. विद्या बालन, सुशांत सिंह राजपूत, अंकिता लोखंडे, मौनी रॉय, मृणाल ठाकूर, पुलकित सम्राट, प्राची देसाई आणि अशा अनेक कलाकारांना एकता कपूरने लॉंच केलं आहे. एकताने लॉंच केलेल्या कलाकारांची यादी फारच मोठी आहे. मात्र आता तिच्या मैत्रीच्या यादीतून मात्र काही कलाकारांची नावं कमी होऊ लागली आहेत.
अधिक वाचा
एकता कपूरने लाँच केलेले ‘हे’ कलाकार गाजवत आहेत बॉलीवूड
हृतिक रोशन जगातील ‘हँडसम’ पुरुषांच्या यादीत अव्वल 5 मध्ये
Good News : अभिनेत्री नेहा पेंडसेने जाहीर केला तिचा ‘Reletionship Status’
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje