Handbags

स्टायलिश दिसायचं आहे मग वापरा या फॅशन अॅक्सेसरिज

Trupti Paradkar  |  Mar 1, 2021
स्टायलिश दिसायचं आहे मग वापरा या फॅशन अॅक्सेसरिज

स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी तुमच्या फॅशन अॅक्सेसरिज खूप महत्त्वाच्या ठरतात. शिवाय तुमच्याकडे चांगली बॅग, ज्वैलरी अथवा शूज फक्त असून चालत नाही ते तुम्हाला  तुमच्या आऊटफिटसोबत मॅचही करता यायला हवेत. ज्या महिला स्टाईल आणि फॅशनबाबत जागरूक असतात त्यांच्या वॉर्डरोबमध्ये अनेक सुंदर सुंदर अॅक्सेसरिज असतात. शिवाय त्यांना या अॅक्सेसरिज महिन्यातून एक किंवा दोनच वेळ वापराव्या असं वाटत असतं. क्लासिक लुकसाठी अशा काही गोष्टी तुमच्याकडे असायलाच हव्या.

बॅग्ज –

हॅंडबॅग्ज या सध्या स्टेटस सिंबॉल म्हणून ओळखल्या जातात. कारण यातून तुमचं व्यक्तिमत्व उघड होत असतं. त्यामुळे तुम्ही कोणत्या आकाराच्या, शेपच्या, स्टाईलच्या आणि रंगाची हॅंडबॅग कोणत्या आऊटफिटवर कॅरी करता हे खूप महत्त्वाचं ठरतं. बेस्ट परिणामासाठी तुमच्याकडे कमीत कमी तीन प्रकारच्या स्टाईल, शेप आणि आकार आणि रंगाच्या बॅग असायलाच हव्या. तुम्ही ब्लॅक, व्हाईट आणि ब्राऊन हे शेड यासाठी नक्कीच निवडू शकता. 

शूज –

शूज हे स्टाईलपेक्षा आरामदायक असावेत असं काहींचं मत असतं. मात्र जर तुम्हाला ते एखाद्या खास समारंभासाठी घालायचे असतील तर ते स्टायलिश असायलाच हवे असंही काहींना वाटतं. आजकाल निरनिराळ्या समारंभासाठी निरनिराळ्या पॅटर्नचे शूट वॉर्डरोबमध्ये असायला हवे. ज्यामध्ये तुम्ही ट्रेंडी आणि फॅशनेबल दिसू शकता. 

ज्वैलरी –

स्टाईल कोणतीही असो ज्वैलरी ही महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असू शकते. नेहमीच्या ऑफिस लुकसाठीही तुमच्याकडे खास चैन, पेंडट, ब्रेसलेट, रिंग्ज असायला हव्या. त्याचप्रमाणे खास समारंभासाठी थोडी हेव्ही ज्वैलरी कॅरी करायला काहीच हरकत नाही. साधे कानातले बदलण्यामुळेही तुमच्या लुकमध्ये खूप मोठा फरक जाणवू शकतो. यासाठी तुमच्या स्कीन टोन, फेसशेप यानुसार योग्य प्रकारची ज्वैलरी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवी. 

सनग्लासेस –

उन्हाळा सुरू झाला की फक्त सनग्लास घालावे असं मुळीच नाही. सुर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासोबत सनग्लासेस तुमच्या लुकमध्येही भर घालत असतात. आजकाल बाजारात विविध प्रकारचे सनग्लासेस मिळतात. त्यामुळे स्टायलिश दिसण्यासाठी तुमच्या वॉर्डरोबमध्ये काही प्रकारचे सनग्लासेस असतील तर तुम्हाला सतत एकच सनग्लासेस घालावे लागणार नाहीत. शिवाय फोटोमध्ये असे निरनिराळे सनग्लासेस घालून तुम्हाला आकर्षक पोझही देता येतील.

स्कार्फ –

तुमच्या स्टाईलमध्ये अधिक भर घालतात ते ट्रेंडी स्कार्फ्स. तुमच्या आऊटफिटच्या रंगसंगती आणि स्टाईलमध्ये या स्कार्फमुळे खूप फरक जाणवतो. उन्हाळ्यात स्कार्फमुळे तुमचं उन्हापासून रक्षणही होतं. यासाठी चांगल्या आणि आकर्षक रंगाचे, पॅर्टनचे स्कार्फ निवडा. स्कार्फ तुम्ही टी शर्ट, जीन्स, ब्लेझर, जॅकेट, स्कर्ट असं कशावरही मस्त कॅरी करू शकता.

याच प्रमाणे हॅट्स, शॉल, वॉच, जॅकेट्स, बेल्ट्स, लेगिंग्स अशा अनेक फॅशन अॅक्सेसरिज तुमच्याकडे असायला हव्या. ज्यामुळे तुम्ही स्टायलिश आणि फॅशनेबल दिसाल. पण या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाची अॅक्सेसरी आहे ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास. त्यामुळे वर दिलेल्या पैकी एकादी गोष्ट तुमच्याकडे कमी असेल तरी चालेल पण पूर्ण आत्मविश्वासाने स्टाईल करा आणि आनंदी राहा. कारण तुमचा आत्मविश्वास हाच तुमचा खरा दागिना आहे. सर्व काही असेल पण आत्मविश्वास नसेल तर या सर्व अॅक्सेसरिज असूनही काहीच फरक पडणार नाही. 

फोटोसौजन्य- इन्साग्राम

अधिक वाचा –

स्टायलिश दिसण्यासाठी व्हाईट शर्ट असा करा कॅरी

बॉडीकॉन ड्रेस आणि स्टायलिंग टिप्स (Bodycon Dresses In Marathi)

पेन्सिल स्कर्टने दिसा सडपातळ, फॉलो करा या स्टायलिंग टिप्स

Read More From Handbags