आरोग्य

प्रवासात प्रत्येक मुलीकडे असायलाच हवे ‘Travel kit’

Leenal Gawade  |  Aug 20, 2019
प्रवासात प्रत्येक मुलीकडे असायलाच हवे ‘Travel kit’

मुलांनाच नाही तर हल्ली मुलींनाही मस्त एकट्याने प्रवास करायला आवडतो. एकदम Queen होऊन आयुष्य जगायला अनेक मुलींना आवडत असतं. असाच एखादा प्रवास तुम्ही एकटट्याने करायचे ठरवले असेल तर तुमच्या बॅगमध्ये हमखास काही गोष्टी असायलाच हव्या.आता या गोष्टी म्हणजे नुसते कपडे आणि सॅनिटरी पॅड नाहीत तर तुमच्याकडे तुमचा ‘Travel kit’ असायला हवा. आता या ‘Travel kit’ मध्ये नेमकं काय-काय असायवा हवं ते देखील पाहुया.

गरोदरपणात विमान प्रवास करताना या गोष्टी जरूर लक्षात ठेवा

वेट वाईप्स (Wet wipes)

shutterstock

बाहेर फिरायला गेल्यानंतर सगळ्यात जास्त महिलांना त्रास होत असेल तर तो वॉशरुमचा. सगळीकडेच स्वच्छ आणि चांगले टॉयलेट असतात असे नाही. शिवाय बाहेर पाणी असेलच असे सांगता येत नाही. पण महिलांच्या आरोग्यासाठी त्यांची व्हजायना स्वच्छ असणे गरजेचे असते. नाहीतर इन्फेक्शन होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. त्यामुळे तुमच्या बॅगमध्ये व्हजायना साफ ठेवण्यासाठी वेट वाईप्स असायलाच हवे. तुम्ही मल्टीपर्पज व्हजायना व्हाईप घेतले तर त्याचा फायदा तुम्हाला तुमचा चेहरा, हात, पाय स्वच्छ करण्यासाठीही होऊ शकतो. तुमचा प्रवास आणि प्रवासाचा कालावधी लक्षात घेऊन तुम्ही तुमच्याकडे व्हाईप ठेवा.

Also Read About इन्स्टाग्रामसाठी प्रवास मथळे

मॉस्किटो रेपिलंट स्प्रे किंवा क्रिम (mosquito repellent cream and spray)

shutterstock

जर तुमच्या प्रवासात निसर्ग रम्य ठिकाणी फिरणे असेल तर तुम्हाला डास, चिलटांचा त्रास होण्याची शक्यता असते. ते तुम्हाला चावावे असे वाटत नसतील तर तुम्हाला तुमच्या बॅगमध्ये मॉस्किटो रेपिलंट स्प्रे किंवा क्रिम असायला हवे. बॅगमध्ये ते फार जागाही घेत नाही. पण तुम्हाला पटकन सापडतील अशा ठिकाणी या गोष्टी ठेवा. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला ही लावायची वेळ येईल त्यावेळी तुम्हाला ते शोधण्याची वेळ येणार नाही.

कार अथवा बसने प्रवास करताना उलटीचा होतो त्रास, ट्राय करा 5 टिप्स

गारबेज बॅग (Garbage bag)

shutterstock

कोणत्याही ठिकाणी कचरा टाकणे ही वाईटच गोष्ट आहे. विशेषत: तुम्ही बाहेर असाल आणि तुम्हाला कचरापेटी शोधणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्याकडे बायोडिग्रेडेबल गारबेज बॅग ठेवा. हल्ली सगळीकडेच कडक प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे प्रवासादरम्यान कचरा साचला असेल तर तो गोळा करण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे अशाप्रकारच्या गारबेज बॅग ठेवा. तुमच्या Travel kit मध्ये ही गोष्ट अगदी आवर्जून ठेवा.

सॅनिटायझर (Sanitizer)

shutterstock

प्रवासात असताना खाण्याची वेळ कधीही येते. म्हणजे सुका खाऊ किंवा मध्येच काही खाण्याचा बेत होत असतो. अशावेळी खाण्याआधी हात स्वच्छ करण्यासाठी आणि काही खाल्ल्यानंतर हाताचा दर्प घालवण्यासाठी तुम्ही तुमच्या सोबत सॅनिटायझर ठेवायला हवे. सॅनिटायझरची बॉटलही अगदी लहान असते. ती तुम्ही अगदी कुठेही ठेऊ शकता.

तुमचा प्रवास झक्कास करतील हे खास कोट्स (Best Travel Quotes In Marathi)

पँटी लायनर, सॅनिटरी पॅड (Panty liner /Sanitary pad)

shutterstock

जर तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज जास्त होत असेल तर तुमच्याकडे पँटी खराब होऊ नये यासाठी पँटी लायनर असायलाच हवी. पँटी लायनर सॅनिटरी पॅड प्रमाणेच असतात. पण लहान आणि पातळ असतात. त्या तुम्ही किमान 5 तास वापरु शकता. कॉटनच्या असल्यामुळे त्या लागतही नाहीत. जर तुमची पाळी जवळपास असेल तर तुम्ही तुमच्यासोबत सॅनिटरी पॅडही ठेवायला हवेत. 

पेन रिलीफ टॅबलेट (Pain relief tablet)

shutterstock

 प्रवासामध्ये अॅसिडीटी, डोकेदुखी, पोटदुखी, बद्धकोष्ठतेचा त्रास होणे अगदी स्वाभाविक आहे. हा त्रास टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन तशी औषधे घ्या. या औषधांचे सेवन कसे करायचे याची नीट माहिती करुन घ्या. म्हणजे तुम्हाला त्रास झाल्यानंतर या गोळ्या घेता येतील.  अनेकदा डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांमुळे तुम्हाला झोप येते आणि बरं वाटतं.

 तर या अगदी काही साध्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या  ‘Travel kit’ मध्ये ठेवायलाच हव्यात.

Read More From आरोग्य