Periods

Period Tracker वापरण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का

Trupti Paradkar  |  Dec 27, 2018
Period Tracker वापरण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का

मासिक पाळी…अचानक घरी आलेल्या पाहुण्यांप्रमाणे महिलांच्या आयुष्यात मासिक पाळी देखील कोणत्याही क्षणी हजर होते. आता मात्र याबाबत काळजी करण्याचे मुळीच कारण नाही. कारण आता स्मार्ट फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मासिक पाळीचा दर महिन्याचा ट्रॅक ठेऊ शकता. काही महिलांमध्ये मासिक पाळीचा फ्लो हा साधारणपणे तीन-चार दिवस असतो. पण कधी कधी संपूर्ण आठवडाभर देखील एखादीला मासिक पाळीचा त्रास सहन करावा लागू शकतो. सामान्यपणे स्त्रीला मासिक पाळी ही दर 28 दिवसांनी येणं अपेक्षित असतं. मात्र काही महिलांना एक महिना पूर्ण झाल्यावर म्हणजेच साधारणतः  तीस दिवसांनी मासिक पाळी यते. थोडक्यात एक महिना पूर्ण झाल्यावर मासिक पाळी येणं हा मासिक चक्राचा सामान्य काळ असतो. आजकाल महिलांमध्ये 21 ते 40 दिवसांच्या काळात कधीही मासिक पाळी आल्याचे आढळून येतं. ‘गर्भाशय’ ही निसर्गाने स्त्रीला दिलेली एक अदभूत गोष्ट आहे. प्रत्येकीचं गर्भाशय निर-निराळ्या पद्धतीने कार्य करत असतं. म्हणूनच प्रत्येकीने आपल्या मासिक पाळीचा अहवाल अथवा पिरिएड ट्रॅक स्वत:च ठेवणं फार गरजेचे आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गर्भाशयाच्या कार्याचा योग्य अंदाज लावता येऊ शकतो.

तुमच्या पैकी प्रत्येकीने मासिक पाळीचे विविध अनुभव घेतले असतील. मासिक पाळी अचानक आल्याने कधीकधी तुमचे कपडे खराबदेखील झाले असतील. पण जर तुम्ही मासिक पाळीसाठी पिरिएड ट्रॅकर वापरलं तर तुम्हाला पिरिएड सुरु होण्याआधीच कोणते कपडे कधी घालावे, मासिक पाळीतील स्वच्छता याबाबतचा योग्य अंदाज लावता येईल. पिरिएड ट्रॅकरमुळे तुम्ही या काळात गडद रंगाचे अथवा काळ्या रंगाचे अंतरवस्र वापरु शकता ज्यामुळे तुमचं कमी नुकसान होतं.

Period Tracker म्हणजे नेमकं काय

कालावधी ट्रॅकर फायदे

पिरिएड ट्रॅकर अधिक चांगल्या पद्धतीने वापरण्यासाठी काही टिप्स

Period Tracker कसे वापराल

FAQs

Period Tracker म्हणजे नेमकं काय? (What is Period Tracker)

Period Tracker तुम्हाला तुमच्या मासिक पाळीचा योग्य ट्रॅक ठेवण्यास अथवा मागोवा घेण्यास मदत करतं. एखाद्या कॅलेंडर प्रमाणे ते दर महिन्याच्या तुमच्या मासिक पाळीचा अहवाल सादर करतं. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखाद्या खास प्रसंग नेमका कधी प्लॅन करावा हे समजण्यास मदत होऊ शकते. तसेच मासिक पाळीच्या काळात तुमची दैनंदिन कामे देखील विनासायास करण्यास या ट्रॅकची नक्कीच मदत होऊ शकते. हे ट्रॅकर तुम्हाला तुमच्या ओव्हुलेशन विषयी सविस्तर माहिती तुम्हाल देतं. प्रजननक्षमतेचा अंदाज आल्याने गर्भधारणा नेमकी कधी होऊ शकते हेही तुम्हाला समजू शकतं. पिरिएड ट्रॅकर वापरण्याचे अनेक फायदे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोतच शिवाय आमच्या गुलाबो पिरिएड ट्रॅकरच्या मदतीने तुमच्या मासिक पाळीचा काळदेखील अधिक सुखावह करणार आहोत.

Period Tracker वापरण्याचे फायदे (Benefits Of Using A Period Tracker)

चला तर मग जाणून घेऊ या… Period Tracker वापरण्याचे नेमके काय फायदे आहेत.

1. तुम्हाला मासिक पाळीचा अंदाज बांधता येतो (Used to predict menstrual cycle)

जर तुम्हाला अचानक एखाद्या ब्रॅन्डेड वस्तूचं गिफ्ट कार्ड मिळालं तर तुम्हाला नक्कीच सुखद धक्का बसेल. पण अचानक मासिक पाळी आल्याचा धक्का कुणालाच नको असतो. ‘पिरिएड ट्रॅकर’ तुम्हाला मासिक पाळी येण्याआधीच सतत त्याची सूचना देत राहतं. ते तुम्हाला मासिक पाळी कधी पूर्ण होणार हे देखील सांगू शकतं. म्हणूनच आज भारतातील अनेक महिलांमध्ये POPxo Gulabo period tracker अॅप फारच लोकप्रिय होत आहे. गुलाबो अॅप वापरण्यास अतिशय सोपं असून ते वापरल्यामुळे तुम्हाला नक्कीच आनंद मिळू शकेल.

2. जेव्हा तुम्ही आई होण्यासाठी प्रयत्न करत असता तेव्हा ते उपयुक्त ठरते. (Useful when you’re trying to get pregnant)

Period Tracker वापरल्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रेग्नंसीचा अचूक अंदाज येऊ शकतो. कारण या अॅपमुळे तुम्हाला तुमचं ओव्हुलेशन कधी होते, तुमची प्रजननक्षमता कशी आहे, गर्भधारणा कधी होऊ शकते किंवा कधी होऊ शकत नाही, तुमची पुढील मासिक पाळी कधी येणार या सर्व गोष्टींची स्पष्ट माहिती प्राप्त होते. ज्यामुळे तुम्हाला जर आई व्हावसं वाटत असेल तर त्यासाठी कोणत्या काळात सेक्स करावा हे कळतं. जेणेकरुन तुम्ही सहज कन्सीव्ह करु शकता.

3. जर तुम्हाला पीसीओएस अथवा पीसीओडीची समस्या असेल तर तुम्हाला याचा फायदा होतो (Beneficial for Women Suffering From PCOS/PCOD)

आजकाल अनेक महिलांमध्ये पॉलिसिस्टीक ओव्हरिअन सिड्रोंम Polycystic Ovarian Syndrome (PCOS) किंवा पॉलिसिस्टीक ओव्हरिअन डिसीज Polycystic Ovarian Disease (PCOD) ही आरोग्य समस्या आढळते. या महिलांची मासिक पाळी अनियमीत असल्याने त्यांना डॉक्टर मासिक पाळीचा ट्रॅक अथवा अहवाल ठेवण्याचा सल्ला देतात. अशा महिलांसाठी गुलाबोसारखे पिरिएड ट्रॅकर वरदानच ठरु शकते.

4. तुम्हाला तुमच्या मासिक पाळीचा काळ समजण्यास मदत होते (Help You to Understand Your Period Better)

पिरिएड ट्रॅकर वापरल्यामुळे तुम्हाला तुमच्या मासिक पाळीचे कार्य नीट समजू लागतंं. या ट्रॅकरमुळे दर महिन्यातील तुमच्या ओव्हुलेशन चक्राची सुरुवात व समाप्ती तसेच तुमचा प्रजनन काळ शोधण्यास तुम्हाला मदत होते. मासिक पाळीतील बारकावे जसं की, अतिरक्तस्राव होणं, मध्यम रक्तस्राव होणं अथवा फक्त स्पॉटींग होणं या गोष्टी तुम्हाला लगेच जाणवू शकतात. ज्यामुळे भविष्यात काही आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं सोपं होते.

5. पिरिएड ट्रॅकरमुळे तुमच्या हातात तुमच्या पाळीविषयी सविस्तर माहिती येते (Provide All The Information)

तुमच्या मासिक पाळीविषयी सविस्तर माहिती ट्रॅकर मुळे तुमच्या हातात असते. जेव्हा तुम्ही तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला भेट देता तेव्हा तुम्हाला ही माहिती उपयोगी पडते. तुमचे पिरिएड ट्रॅकर तुमच्या डॉक्टरांना तुमच्या मासिक चक्राविषयी सर्व लहान-सहान माहिती पुरवतं. ज्यामुळे तुम्ही निरोगी आहात का हे तपासणं सहज सोपं होतं.

6. तुमचं सेक्स लाईफ कसं आहे ते देखील समजू शकतं (Keep A Track Of Your Sex Life)

पिरिएड ट्रॅकरमध्ये असलेल्या ऑप्शनमुळे तुम्ही महिन्याभरात किती वेळा शारीरिक संबंध ठेवले आहेत याची नोंद करता येते.ज्यामुळे तुम्हाला तुमचे सेक्स लाईफ कसं आहे याचा अंदाज बांधता येतो. जेव्हा तुम्हाला आई व्हायचं असतं अथवा लवकर मुल नको असतं अशा दोन्ही परिस्थितींमध्ये या गोष्टीचा तुम्हाला फायदाच होऊ शकतो.

7. गर्भनिरोधन करणे सोपे होते (Keep A Track Of Birth Control)

जर तुम्ही गर्भनिरोधनासाठी काही उपाय करत असाल तर गर्भनिरोधनाची साधने वापरताना तुमच्या पिरिएड ट्रॅकरमध्ये तुम्ही त्याची नियमित नोंद करु शकता. काही ट्रॅकरमध्ये गर्भनिरोधनाच्या गोळ्यांची नोंद ठेवण्यासाठी अलार्म देखील सेट करता येतो. ज्यामुळे तुम्हाला गोळी घेणं लक्षात ठेवणं सोपं जातं.

8. तुम्ही यामध्ये तुमचे मुड्स व इतर नोंदी देखील नोंदवू शकता (You Can Add Notes & Moods)

काहीजणींना मासिक पाळीच्या काळात क्रॅम्प येणं, डोकेदुखी अथवा मुडस्वींगची समस्या होते. पिरिएड ट्रॅकरमध्ये तुम्ही तुमच्या या समस्यांची नोंद ठेवू शकता. पुढील मासिक पाळीच्या आधी त्यामुळे तुम्हाला याचा अंदाज येतो. ज्यामुळे तुम्ही आवश्यक असलेली औषधे वेळीच जवळ ठेऊ शकता. तसेच या काळात अधिक त्रास होत असल्यास मासिक पाळी येण्याआधीच डॉक्टरांचा अथवा थेरपिस्टचा सल्ला घेऊन या समस्येचं वेळीच निराकरण करू शकता.

9. तुमच्या हॉर्मोन्सचा ट्रॅक ठेवता येतो (Keep A Check Of Your Hormones)

मासिक पाळी आल्यावर अथवा मासिक चक्र सुरु असण्याच्या वयात तुमच्या भावनांमध्ये होणारे बदल, तुमच्या आचार-विचारांचा ट्रॅक ठेवणं या अॅपमुळे फार सोपं जातं. ज्यामुळे तुम्हाला जर या काळात चक्कर येणं, मळमळणं अथवा मूडस्विंगची समस्या असेल तर त्यावर उपाय करता येतात. तुम्हाला क्रॅम्प नेमके कोणत्या दिवशी येतात अथवा तुमचा मुड कधी बदलतो हे लक्षात आल्याने त्यावर उपाययोजना करणे सोपे होते. शिवाय आधीच या गोष्टींचा अंदाज येत असल्याने कुटूंबिय व मित्रमंडळींकडून आधार घेणं सोपं होतं.

10. पोटात गोळा येणं अथवा इतर शारीरिक बदल समजतात (Your Bloating & Other Changes)

मासिक पाळी आधी होणारी पोटदुखी अथवा इतर शारीरिक बदल यांची नोंद या ट्रॅकरमध्ये करू शकता. ज्यामुळे तुम्हाला मासिक पाळी येणार असल्याचे आधीच समजू शकते.  या सर्व गोष्टींची वेळीच कल्पना आल्याने तुम्ही या काळात आरामदायक कपडे घालून अथवा योग्य आहार घेऊन तुमच्या शरीराची काळजी घेऊ शकता.

पिरिएड ट्रॅकर अधिक चांगल्या पद्धतीने वापरण्यासाठी काही टिप्स (Tips To Use Your Period Tracker Efficiently)

पहिल्यांदाच पिरिएड ट्रॅकर वापरत असाल तर साईन इन करण्याआधी या काही महत्वाच्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा. ज्यामुळे तुम्हाला योग्य पद्धतीने पिरिएड ट्रॅकर वापरणे सोपे जाईल.

तुम्ही नोंदवलेली माहिती अचूक आहे याची खात्री करून घ्या (Entered Information Should Be Accurate)

तुम्ही अॅपमध्ये नोंदवलेली सर्व माहिती अचूक असणे फार गरजेचे आहे. अगदी तुमच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसांपासून ते मासिक पाळीच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्व माहिती योग्य आहे का ते तपासा. विशेषत: जेव्हा तुम्हाला बाळाची जबाबदारी नको असते तेव्हा सेक्स आणि गर्भनिरोधके घेण्याबाबत असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन मुळीच चालणार नाही.

नियमित माहिती अपडेट करा (Update it Regularly) 

प्रत्येक महिन्याची माहिती नियमित अपडेट करायला मुळीच विसरू नका. कारण जर तुम्ही एखाद्या महिन्यामध्ये ही माहिती अपडेट करायला विसरलात तर तुमच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरू शकतं. नियमित माहिती अपडेट केल्याने तुमच्या पुढील मासिक चक्राविषयी अचूक सांगणे ट्रॅकरला शक्य होतं. त्यात जर तुम्हाला पीसीओएस अथवा पीसीओडीचा त्रास असेल तर तुमचे मासिक चक्र अनियमित होतं. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये दर महिन्याची अचूक माहिती अपडेट करणे अतिशय गरजेचे आहे.

तुमच्या रुटीनमधले बदल नोंदवा (Notice Changes In Your Routine) 

तुमच्या दैनंदिन जीवनातील लहान बदल देखील या अॅपमध्ये वेळीच नोंदवा.जसे की बदलेलेलं झोपेचं वेळापत्रक, चुकीचा आहार, व्यायामातील बदल, प्रवास अथवा आजारपण यांचा देखील तुमच्या पाळीवर परिणाम होऊ शकतो. पिरिएड ट्रॅकर हे शंभर टक्के अचूक असतात त्यामुळे जर तुमच्या जीवनशैलीत बदल झाले तर त्यामुळे तुमच्या मासिक पाळीत होणारे बदल हे ट्रॅकर अचूक हेरू शकतात. या बदलांची नोंद वेळीच पिरिएड ट्रॅकरमध्ये करा. आरोग्यसमस्या असल्यास याबाबत तुमच्या गायनेकॉलॉजिस्टचा जरुर सल्ला घ्या.

ट्रॅकर वापरताय म्हणून गर्भनिरोधकं बंद करू नका (Do Not Replace Contraception With This)

पिरिएड ट्रॅकरमुळे तुम्ही वापरत असलेली गर्भनिरोधकं मुळीच बंद करू नका. कारण हे अॅप फक्त तुम्हाला तुमचा प्रजननाचा अचूक काळ दाखवू शकतं. तुम्ही कधी गरोदर राहण्याची दाट शक्यता आहे हे या अॅपमुळे समजतं. पण जर तुम्हाला मुल नको असेल तर फक्त या अॅपच्या माहितीवर अवलंबून राहू नका. त्यासाठी लागणारी गर्भनिरोधकं वेळीच घ्या. कारण नको असलेली प्रेग्नंसी टाळण्यासाठी व सुरक्षित सेक्स करण्यासाठी हे फार गरजेचे आहे.

Period Tracker कसे वापराल? (How To Use A Period Tracker)

पिरिएड ट्रॅकर वापण्यासाठी आमच्या गुलाबो अॅपवर क्लिक करा. एकदा POPxo पिरिएड ट्रॅकर अॅप डाऊनलोड केल्यावर त्यावरील आवश्यक असलेली माहिती भरा. त्यानंतर हे अॅप तुम्हाला तुमच्या इमेलवरुन अथवा फेसबूकवरुन लॉग इन करण्यास सांगेल.गुलाबो तुम्हाला तुमची मागील महिन्यातील मासिक पाळीची तारीख विचारेल व त्यांची नोंद करेल.तुम्हाला तुमच्या मागील मासिक पाळीच्या चक्राविषयी सविस्तर माहिती भरण्यास सांगण्यात येईल. कोणत्याही महिलेसाठी सामान्य मासिक चक्र 28 दिवसांचे असू शकते.

तुमच्या माहितीचे तपशील सेटींग्स मध्ये जाऊन एडीट करता येऊ शकतात. त्यामध्ये तुम्ही मागील मासिक चक्रांची देखील माहिती जोडू शकता. गुलाबोला तुमच्या पुढील मासिक चक्राची अचूक माहिती सांगता यावी यासाठी तुम्हाला मागील तीन महिन्यांचा मासिक पाळीचा तपशील भरण्याची विनंती केली जाईल.

तुमचे नोटीफिकेशन मोड ऑन ठेवा जेणेकरुन गुलाबो तुम्हाला मासिक पाळी येण्याआधीच सावध करु शकेल.

POPxo’s Period Tracker या गुलाबो अॅपवर क्लिक करुन तुम्ही मासिक पाळीविषयी इतर अधिक लेख आणि माहिती वाचू शकता. ज्यामुळे तुम्हाला मासिक पाळीतील इतर समस्येचे निराकरण करणे सोपे जाईल.

FAQs

Period Tracker सुरक्षित गर्भनिरोधक साधन म्हणून वापरता येऊ शकते का?

या लेखात आधीच सांगितल्याप्रमाणे गर्भनिरोधकांऐवजी पिरिएड ट्रॅकरचा वापर करु नका आणि गुप्तरोगांपासून (एसटीडी) स्वत:चा बचाव करा.असुरक्षित सेक्स सबंध ठेवताना पिरिएड ट्रॅकरमुळे  लक्षात आलेल्या तुमच्या प्रजनन काळाचा अथवा अप्रजनन काळाचा तुम्हाला फार उपयोग होणार नाही. जर सेक्स करण्यापूर्वी तुम्ही दोघांनी देखील एसटीडी टेस्ट केल्या असतील अथवा अचानक राहिलेली गर्भधारणा तुम्हाला मान्य असेल तर मात्र तुम्ही या ट्रॅकरचा तुम्ही सुरक्षित गर्भनिरोधकाचे साधन वापर करु शकता.

Period Tracker अॅप 100% सुरक्षित आहे का?

बऱ्याचदा पिरिएड ट्रॅकर हे अचूकच असतातच. पिरिएड ट्रॅकर तुम्हाला तेव्हाच हवा तो परिणाम देऊ शकतात जेव्हा तुम्ही त्यामध्ये योग्य माहितीची नोंद करता. त्यामुळे जर तुम्हाला पिरिएड ट्रॅकरवर अवलंबून राहायचे असेल तर कृपया त्यामध्ये अचूक माहितीची नोंद करा. ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल.

GIFs – Giphy

फोटोसौजन्य – Shutterstock 

तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:

PCOD Problem And Solution In Marathi

Read More From Periods