Fitness

चुकीच्या व्यायामामुळे स्तनांचा आकार होऊ शकतो लहान, आताच टाळा हे व्यायाम

Leenal Gawade  |  Jan 5, 2021
चुकीच्या व्यायामामुळे स्तनांचा आकार होऊ शकतो लहान, आताच टाळा हे व्यायाम

व्यायाम हे शरीराला उत्तम आकार देण्यासाठी असतात. तुमच्या वेढब शरीराला एक योग्य आकार मिळावा यासाठी ही सगळी कसरत करण्यात येते. पण काही व्यायाम प्रकार असे असतात की ज्याचे काही गंभीर परिणाम शरीरावर होतात. जे कदाचित कोणत्याही महिलेला होऊ नयेत असे असतात. स्तनांचा योग्य आकार हा प्रत्येक महिलेच्या सौंदर्याची ओळख असते. स्तनांचा आकार लहान असणे आणि खूप मोठा असणे हे या सौंदर्यात बसत नाहीत. शरीर सुडौल ठेवण्यासाठी काही व्यायाम प्रकार करत असाल तर अशा व्यायामामुळे तुमच्या स्तनांचा आकार गरजेपेक्षा लहान होण्याची शक्यता असते. तुमच्याही स्तनांच्या आकारामध्ये असा फरक पडत असेल आणि तो भाग अनाकर्षक दिसत असेल तर तुम्ही काही व्यायामप्रकार हे टाळायला हवेत. चला जाणून घेऊया असे व्यायामप्रकार

आठवड्याभरात नितंब आणि मांड्या कमी करण्याचे उपाय (How To Reduce Butt Fat)

पुशअप्स

पुशअप्स हे खांदा, स्तन आणि पाठीसाठी खूप चांगला व्यायाम प्रकार आहे. पुशअप्सचे जास्त सेट्स जर तुम्ही केले तर त्यामुळे तुमच्या स्तनांचा आकार लहान होऊ शकतो.  जर तुम्हाला स्तनांचा आकार खूप कमी करायचा नसेल तर  याचे कमी आणि योग्य सेट्स करा. जर तुम्ही जीमला जात असाल तर तुमच्या शरीराच्या दृष्टिकोनातून किती पुशअप्स योग्य आहेत ते जाणून घ्या. त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल 

सर्वसाधारणपणे तुम्ही 12-15 चे दोन सेट करायला काहीच हरकत नाही.

साईड रेसेझ

Giphy

खांदे, टोन्ड आर्म्स यासाठी साईड रेसेस हा एक उत्तम व्यायाम आहे. हातात डंबेल्स घेऊन हा व्यायाम केला जातो. साईड रेसेज हा व्यायाम  उत्तम आहे. साईड रेसेस करतानाही  छातीच्या बाजूला एक ताण येतो. त्यामुळे स्तनांना टोन्ड करायला मदत मिळते.  साईड रेसेसमुळे तुमच्या स्तनांना एक प्रकारे उभारी येते. स्तनांन उभारी हवी असेल तर तुम्ही हा व्यायाम प्रकार करा. पण हा व्यायाम जास्त करणेही योग्य नाही. 

सुरुवातील 12 ते 15 असे दोन ते तीन सेट करा. इतकेच तुमच्यासाठी योग्य आहे.

नितंब आणि मांड्या सुटतायत? हे पदार्थ टाळलेत तर व्हाल बारीक

वॉल पुशअप्स

Giphy

पुशअप्सचा मॉर्डन व्हर्जन असलेला प्रकार म्हणजे वॉल पुशअप्स. हा प्रकार छातीचा उत्तम व्यायाम प्रकार आहे.यामुळे तुमच्या स्तनांना योग्य आकार मिळतो. पण हा व्यायाम प्रकार खूप जास्त वेळ करु नका.कारण हा व्यायाम प्रकार तुमच्या सुडौल स्तनांना कमी करु शकतो. वॉल पुशअप्स  हा व्यायाम प्रकार खूप जास्त करु नका. कारण त्यामळे तुमच्या स्तनांचा आकार कमी होईल. 

चेस्ट प्रेस

GIPHY

स्तनांसाठी असलेला हा खास व्यायामप्रकार असून हा व्यायाम प्रकारही तुमच्या स्तनांसाठी फारच उत्तम आहे. डंबेल्सच्या मदतीने हा व्यायाम प्रकार केला जातो.  हा व्यायाम बोर्डवर झोपून केला जातो. त्यामध्ये विविधतेने इन्क्लाईन आणि डिक्लाईन असे प्रकार येतात. डंबेल्सचे कमीत कमी वजन हे महिलांसाठी आदर्श मानले जाते. जर तुम्ही बॉडी बिल्डींग क्षेत्रा असाल तर ठिक. अन्यथा अति वजन उचलल्यामुळे तुमच्या स्तनांचा आकार कमी होऊ शकतो. सपाट छाती नको असेल तर अति व्यायाम करणे टाळा

जॉगिंग

GIPHY

जॉगिंग करणे आरोग्यासाठी  खूप चांगले असते. पण अति जॉगिंग केल्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यासोबतच स्तनांचा आकार कमी होऊ लागतो. जर तुम्हाला जॉगिंग करायचे असेल तर ते योग्य वेळ करा. साधारण 30  मिनिटे चालणे हे आरोग्यासाठी चांगले असते. पण त्यापुढे जाऊन जर तुम्ही अति जॉगिंग केले तर तुमच्या कॅलरीज आवश्यकतेपेक्षा जास्त बर्न होतात. ज्याचा परिणाम तुमच्या स्तनांवर जास्त जाणवू लागतो. 

आता स्तनांचा आकार कमी होऊ द्यायचा नसेल तर काही व्यायाम प्रकार योग्य प्रमाणातच करणे गरजेचे आहे. 

वेटलॉससाठी करून पाहा ‘ही’ योगासनं (Yoga For Weight Loss In Marathi)

Read More From Fitness