Fitness

लॉकडाऊनच्या काळात गर्भवती महिलांनी अशी घ्या फिटनेसची काळजी, तज्ज्ञांचा सल्ला

Dipali Naphade  |  Apr 14, 2020
लॉकडाऊनच्या काळात गर्भवती महिलांनी अशी घ्या फिटनेसची काळजी, तज्ज्ञांचा सल्ला

करोनाग्रस्तांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या हे काळजीचे कारण होऊ लागले आहे. ज्या घरांमध्ये गरोदर महिला आहेत अशा घरामधील चिंता वाढणे सहाजिकच आहे. गरोदर महिलांमधील रोगप्रतिकारक व्यवस्थेत बदल घडतात, तसंच फुफ्फुसं आणि ह्रदय यांवरही परिणाम होत असतो. या दिवसांमध्ये घरबसल्या काही सवयींचे पालन केले तर योग्य फिटनेस राखण्यात नक्कीच मदत होऊ शकते. सध्या तरी लॉकडाऊन हा 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पण ज्या महिला गरोदर आहेत त्यांच्यासाठी ही खरी कसोटीच आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरोदर महिला या कोणत्याही प्रकारच्या श्वसनाशी संबंधित संक्रमणांना अधिक संवेदनक्षम असतात आणि त्यामुळेच फ्ल्यूसारखे आजार इतर व्यक्तींच्या तुलनेत गरोदर महिलांसाठी अधिक घातक ठरू  शकतात. गरोदर महिलांनी या कालावधीत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्याची लक्षणं दिसत असलेल्या व्यक्तीशी संपर्क टाळावा तसेच स्वच्छतेवर विशेष भर द्यावा. या दरम्यान अन्न योग्य पद्धतीने शिजवून खा. आरोग्यदायी, जीवनसत्वयुक्त पदार्थांचे सेवन करा. यासंदर्भात POPxo मराठीने डॉ. सुरभि सिद्धार्थ, सल्लागार प्रसुती व स्त्रीरोग तज्ञ, मदरहुड हॉस्पिटल खारघर यांच्याशी बातचीत केली. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात गर्भवती महिलांनी कशी फिटनेसची काळजी घ्यायला हवी याचा सल्ला दिला आहे. 

समतोल आहाराचे सेवन करा

Shutterstock

गर्भारपणात पौष्टिक आणि समतोल आहार घेणे बाळाच्या वाढीसाठी आणि आईच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, जीवनसत्त्व, क्षार आणि पाणी यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. आहारातील मिठाचे प्रमाण मर्यादित असावे. ताजी कापलेली फळे सुकामेवा यांचा देखील रोजच्या आहारात समावेश करावा. किवी, कोबी, ब्रोकोली, गाजर, हळद आणि आले यासारखे पदार्थ आपली त्वचा आणि केसांसह रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करण्यास मदत करतात. खारट, तेलकट, मसालेदार आणि जंक फूडचे सेवन करणे टाळा. भरपूर पाणी प्या.

गरोदरपणात सकाळीच उठल्यावर मळमळतंय…तर करा नैसर्गिकरित्या उपचार

घरच्या घरी व्यायाम करा

Shutterstock

घरी जमेल तितका वेळ चाला. आपण योगाभ्यास किंवा मेडिटेशनची निवड देखील करू शकता. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काही हलके व्यायाम करा. तुम्ही यासाठी तुमच्या नियमित डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. मात्र घरी केवळ बसून राहू नका. कारण त्याचा परिणाम तुमच्या  शरीरावर आणि होणाऱ्या बाळावरही होऊ शकतो. बाहेर फिरायला जायचे नाही हे खरे आहे. पण तुम्ही घरच्या घरी किमान थोड्या थोड्या वेळाने चाला. गतीने अथवा जलद चालण्याची आवश्यकता नाही. तसंच तुम्हाला जर गरोदरपणातील योगा माहीत असेल तर तुम्ही व्यवस्थित कोणाची तरी मदत घेऊन अथवा घरच्यांच्या देखरेखीखाली योगा करू शकता. 

गरोदरपणात होणाऱ्या बद्धकोष्ठतेची कारणे आणि सोपे उपाय – Constipation During Pregnancy

भरपूर पाणी प्या

Shutterstock

गरोदरपणी प्रत्येक महिलेने मुबलक प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ही गोष्ट फारच महत्त्वाची ठरते.  कारण या काळात कमी पाणी पिणं गर्भासाठी धोकादायक ठरू शकतं. वास्तविक या काळात तुमच्या शरीरात अनेक बदल होत असतात. या बदलांमुळे शरीर डिहायड्रेट होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच जर तुम्हाला हायड्रेट रहायचं असेल पुरेसं पाणी प्या.

‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा

वर्क फ्रॉम होम करताना छोटे-छोटे ब्रेक घ्या

लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम करताना दिवसभर 8 ते 9 तास एकाच ठिकाणी बसून काम करण्यामुळे शरीरावर ताण येऊ शकतो. त्यासाठी कामाच्या मध्ये मध्ये छोटे-छोटे ब्रेक घ्या. एक दोन तासांनी थोडसं चालणं, कुटुंबीयांशी गप्पा मारणं यामुळे तुमचं शरीर आणि मन निवांत राहण्यास मदत होईल. गरोदरपणी ऑफिसचे  काम करताना शक्य तितक्या ताण-तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ताणामुळे मनात कोणताही नकारात्मक विचार येणार नाही याची काळजी घ्या. 

Read More From Fitness