DIY सौंदर्य

घरीच करा असं ऑरेंज फेस क्लिनअप, राखा त्वचेची निगा

Trupti Paradkar  |  Feb 23, 2022
घरीच करा असं ऑरेंज फेस क्लिनअप, राखा त्वचेची निगा

वातावरणातील उष्णतेमुळे तुमच्या त्वचेमधील ओलावा कमी होतो. त्वचा हायड्रेट झाल्यामुळे ती कोरडी होते आणि काळवंडते. बऱ्याचदा यामुळे त्वचेवर हवा तसा ग्लो येत नाही. एखाद्या खास कार्यक्रम अथवा पार्टीसाठी जाताना तुम्हाला इन्स्टंट ग्लोची गरज भासते. चेहऱ्यावरील सन टॅन, कोरडेपणा आणि काळेडाग कमी होऊन चमकदार त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही घरीच प्रयत्न करू शकता. वास्तविक आजकाल बाजारात यासाठी विविध प्रॉडक्ट मिळत असतात. पण त्यातील कोणते प्रॉडक्ट तुमच्या त्वचेसाठी योग्य आहे हे समजत नसेल तर करा घरच्या घरी ऑरेंज क्लिन अप तसंच वाचा संत्री खाण्याचे फायदे अवश्य जाणून घ्या (Benefits Of Orange In Marathi)

ऑरेंज क्लिन अप केल्यामुळे काय फायदा होतो 

संत्र्यापासून तयार केलेलं हे क्लिन अप तुमच्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरतं. कारण यातून तुमच्या त्वचेला नैसर्गिक पोषण मिळतं. संत्र्यामध्ये भरपूर अॅंटि ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असतं. ज्यामुळे तुमच्या त्चचेच्या समस्या कमी होतात. हे क्लिन अप केल्यामुळे तुमची त्वचा टॅन होत नाही. संत्रे तेलकट असल्यामुळे त्वचाला पुरेसं नैसर्गिक तेल आणि पोषण मिळते. त्वचेवरील डेड स्किन निघून जाते आणि त्वचा नितळ दिसू लागते. तुम्हाला ओपन पोअर्सचा त्रास होत असेल तर या क्लिन अपमुळे तुमच्या त्वचेवरील छिद्रे पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होते. 

ऑरेंज क्लिन अप करण्याची सोपी पद्धत 

फेशिअल नेहमी स्टेप बाय स्टेप करायला हवं. यासाठी या टिप्स जरूर फॉलो करा.

क्लिंझिंग – सर्वात आधी कच्चं दूध अथवा एखाद्या चांगल्या आणि सौम्य फेसवॉशनचे चेहरा स्वच्छ करा. यासोबतच जाणून घ्या क्लिनझर की फेसवॉस, जाणून घ्या दोघांमधील फरक (Cleanser Vs Face Wash In Marathi)

टोनिंग – एका भांड्यात एक चमचा ग्रीन टी पावडर, संत्र्याचा रस आणि पाणी मिसळा आणि चेहऱ्यावर स्प्रे करा. ज्यामुळे तुमची त्वचा टोन होईल.

स्क्रबिंग – क्लिन आणि टोन केल्यानंतर डीप स्क्रबिंग करून त्वचा मुळापासून स्वच्छ करायला हवी. यासाठी एक चमचा बेसण, संत्र्याचा रस, गुलाब पाणी आणि एक चमचा संत्र्याच्या सालांची पावडर एकत्र करून त्वचेला हळुवार हाताने स्क्रबिंग करा. चेहऱ्यावर वाफ द्या आणि पाच मिनीटांनी त्वचा स्वच्छ करा. 

मसाज – यानंतर सर्वात महत्त्वाची स्टेप आहे मसाज यासाठी एखाद्या ऑर्गेनिक ऑरेंज क्रीमने अथवा मलईत संत्र्यांचा रस मिसळून त्याने त्वचेवर मसाज करा. क्रीम त्वचेत मुरेपर्यंत मसाज करा आणि उरलेलं क्रीम कॉटनपॅडवर गुलाबपाणी शिंपडून त्वचेवरून पुसून टाका. 

फेस पॅक – फेसपॅक नेहमी घरी तयार केलेला आणि त्वचेला पोषक असेल असाच असावा. यासाठी चंदन पावडर, हळद, संत्र्याची पावडर, गुलाब पावडर आणि गुलाब पाणी प्रमाणात एकत्र करा आणि हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. पंधरा मिनीटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ करा आणि त्वचेवर एखादं चांगलं मॉईस्चराईझर लावा. 

यासोबतच कोरड्या त्वचेसाठी बेस्ट फेशिअल किट (Best Facial Kits For Dry Skin In Marathi)

Read More From DIY सौंदर्य