मनोरंजन

फराह खानच्या मुलीने स्केच काढून मिळवले 70 हजार, भटक्या प्राण्यांना करणार मदत

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Apr 12, 2020
फराह खानच्या मुलीने स्केच काढून मिळवले 70 हजार, भटक्या प्राण्यांना करणार मदत

जगावर पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सर्वांची जीवनशैली बदलून गेली आहे. देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे तळहातावर पोट असणाऱ्या लोकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. अशा लोकांच्या मदतीसाठी अनेक दानशुर लोकांनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. खरंतर लॉकडाऊनचा परिणाम निसर्गातील प्रत्येक जीवावर होत आहे. कारण यापूर्वी कधीच असं घडलं नव्हतं. रस्त्यावर माणसांची वर्दळ कमी झाल्यामुळे आता रस्त्यावर भटकणाऱ्या प्राण्यांची अवस्था फारच वाईट झाली आहे. कोरिओग्राफर फराह खान आणि तिची मुलं या प्राण्यांना मदत करण्यासाठी पुढे आली आहेत. फराह खानने सोशल मीडियावरून तिच्या कुटुंबाने यासाठी केलेला एक उपक्रम शेअर केला आहे. ज्यातून फराह खानच्या मुलगी  ‘अन्या’ने अशा प्राण्यांना मदत करण्यासाठी पाच दिवसात जवळजवळ 70 हजार रूपये गोळा केले आहेत. 

आन्याने कसे कमवले इतके पैसे

फराहने तिच्या ट्वीटर अकाऊंटवरून ही माहिती तिच्या चाहत्यांसाठी  दिली आहे. तिने शेअर केलं आहे की, ” माझी 12 वर्षांची मुलगी अन्याने फक्त पाच दिवसांत 70 हजार रूपये गोळा केले आहेत. तिने लोकांच्या पाळीव प्राण्यांचे स्केच तयार केले आणि हे स्केच प्रत्येकी एक हजार रूपयांना विकले. आता अशा पद्धतीने तिच्याकडे एकूण 70 हजार रूपये गोळा झाले आहेत. ज्यातून ती रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांना खाद्य पुरवण्यासाठी करणार आहे. ज्या ज्या लोकांनी यासाठी त्यांच्या प्राण्यांचे स्केच तिच्याकडून करून घेण्यासाठी ऑर्डर आणि देणगी दिली त्या सर्व दयाळू लोकांची मी मनापासून आभारी आहे”

फराह खानच्या मुलीचे होत आहे कौतुक

फराह खानच्या मुलीने या लहान वयात प्राण्यांबाबत दाखवलेल्या भूतदयेबाबत सर्वांना कौतुक वाटत आहे. अनेक लोकांनी यासाठी तिच्याकडून आपल्या पाळीव प्राण्यांचे स्केच काढून घेतले आणि तिला यासाठी देणगीदेखील दिली. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटीजनी आन्यावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे. रितेश देशमुख, नील मुकेश, दीया मिर्जा, रेणूका शहाणे, रोनित रॉय अशा अनेक सेलिब्रेटीजनी तिचं अगदी गोड शब्दात कौतुक केलं आहे. 

फराहला आन्याबद्दल वाटत आहे अभिमान

फराह खानला तीन जुळी मुलं आहेत. तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलाचे नाव जार असून मुलींची नावे अन्या आणि दिव्या अशी आहेत. फराह तिच्या मुलांसोबत फोटो नेहमीच सोशल मीडियावरून शेअर करत असते. काही दिवसांपू्र्वीच तिने तिच्या चाहत्यांना आणि मित्रमंडळींना अन्याच्या या उपक्रमाविषयी माहिती दिली होती. आता ज्या लोकांनी यासाठी अन्याला मदत केली त्यांचे तिने मनापासून आभार व्यक्त केले आहेत. शिवाय एवढ्या लहान वयात तिच्या मुलीला प्राण्यांबाबत वाटत असलेल्या संवेदनशीलतेबाबत तिला  नक्कीच अभिमानदेखील वाटत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने अन्याने आपल्या पिगी बँकेतील सर्व पैसे स्ट्रीट डॉग्ज अर्थात रस्त्यावरील कुत्र्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेसाठी दान केले होते. या पैशांमुळे 30 कुत्र्यांच्या आठवड्याच्या खाण्याचा प्रश्न सुटला होता.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

 अधिक वाचा –

‘तडजोड’ करण्यासाठी तिप्पट पैशाची ऑफर, ‘शुभमंगल ज्यादा सावधान’च्या अभिनेत्रीचा खुलासा

अभिनेत्री शिवांगी जोशीला लाईफ पार्टनरमध्ये हव्या आहेत या ‘3’ गोष्टी

अभिनेता आयुषमान खुरानाने मानले मुंबई पोलिसांचे मराठी भाषेत आभार

Read More From मनोरंजन