Jewellery

जाणून घ्या हिऱ्याविषयी ’10’ आश्चर्यकारक तथ्य

Trupti Paradkar  |  Apr 15, 2021
जाणून घ्या हिऱ्याविषयी ’10’ आश्चर्यकारक तथ्य

हिरा हे एक मौल्यवान आणि सुंदर रत्न आहे त्यामुळे आपल्याला हिऱ्याविषयी नेहमीच आकर्षण वाटत आलं आहे. अतुलनिय सौंदर्य असलेल्या प्रत्येक हिऱ्यामध्ये प्रचंड रहस्यमयी उर्जा आणि अनंत वर्षांचा वारसा दडलेला असतो. असं म्हणतात की, हिऱ्याला जितके पैलू पाडावेत तितकी त्याची किंमत वाढत जाते. एप्रिल महिना हा हिरा खरेदीसाठी खास आहे. कारण या महिन्यात जन्माला आलेल्या वक्तीसाठी हिरा हे बर्थ स्टोन म्हणजे जन्म रत्न मानले जाते. यासाठीच जाणून घ्या हिऱ्याची निर्मिती, शोध आणि इतिहासाबाबत ही रोचक माहिती. ही माहिती इतकी रंजक आहे की, तुम्ही पुन्हा पुन्हा हिऱ्याच्या प्रेमात पडाल. शिवाय एप्रिलमध्ये जन्मलेल्या लोकांना यामुळे वाढदिवसाच्या विश लिस्टमध्ये हिरा घेण्याचे आणखी एक कारणही मिळेल. 

हिऱ्याविषयी ’10’ आश्चर्यकारक तथ्य

हिऱ्याविषयी ही रंजक माहती वाचल्यावर तुम्हालाही नक्कीच वाटेल की जगातील मौल्यवान रत्न असलेला हिरा तुमच्याकडे असायलाच हवा. 

1. हिरा निसर्गाचा एक अद्भूत चमत्कार

हिरा हे अतिशय प्राचिन आणि शुद्ध रत्न आहे. कारण असं म्हणतात की, हिऱ्याचा जन्म तीन अब्ज वर्षांपूर्वी झाला. हिरा हा निसर्गाचा एक अद्भूत चमत्कार असून पृथ्वीवर डायनॉसरचा वावर असण्यापूर्वी हिरा निर्माण झालेला होता. काही तज्ञ तर सांगतात की, हिरा हे रत्न ताऱ्यांच्या निर्मितीच्याही आधी पृथ्वीवर  होते. कदाचित म्हणूनच हिऱ्याची तुलना आपण चमचमत्या ताऱ्यांशी करतो. यासाठीच जन्मोजन्मीच्या सुंदर आठवणींना प्रतिबिंबीत करण्यासाठी बोटामध्ये हिरा परिधान केला जात असावा.  

2. हिऱ्याची अभूतपूर्व ताकद

हिरा हे एक नाजूक आणि सुंदर रत्न तर आहेच  पण तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की हिरा पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ आहे. निसर्गातील इतर खनिज पदार्थांपेक्षा हिरा जवळजवळ 58 पट कठीण असू शकतो. त्यामुळेच हिरा सामर्थ्याचे प्रतिक मानले जात असावे.

3. हिरा है सदा के लिए

‘हिरा है सदा ते लिए’ असं तुम्ही आजवर बऱ्याचदा ऐकलं असेल मात्र हिरा खरंच  अविनाशी आहे हे तुम्हाला माहीत आहे का?  डायमंड अथवा हिरा हा शब्द मुळच्या ग्रीक शब्द ‘Adamas’ पासून आलेला आहे. ज्याचा अर्थ अविनाशी म्हणजेच कधीच नष्ट न होणारा असा आहे. हिरा हे रत्न चिरंतन टिकणारं असल्यामुळेच याची तुलना आयुष्यभर एकमेकांना साथ देणाऱ्या जोडीदारांच्या वचनांशी केली जाते. सहाजिकच हिऱ्याला प्रेम आणि सामर्थ्याचे प्रतिक मानणं यात काहीच वावगं नाही. इतिहासातील अनेक उदारणातून असं सिद्ध होतं की, युद्धाच्या वेळी राजे,महाराजे अंगावर हिरा परिधान करत असत कारण पुरातन संस्कृतीनुसार हिरा शक्ती आणि धैर्याचं प्रतिक मानला जात असे.

‘हिरा है सदा के लिए’ पण तो कोणी घालावा,जाणून घ्या

4. हिरा एक दुर्मिळ रत्न

हिरा हा जगातील सर्वात मौल्यवान रत्न आहे. एवढंच नाही तर जगातील सर्वात सुंदर आणि दुर्मिळ संपत्तीदेखील आहे. जर तुम्ही जगातील सर्व हिरे एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्या घराच्या एका खोलीतदेखील मावतील. यासाठीच जेव्हा तुम्ही एखाद्याला हिरा भेट देता अथवा एखाद्याकडून हिरा भेट म्हणून स्वीकारता तेव्हा तुम्ही कोणीतरी खास आहात ही भावना त्या भेटवस्तू मागे असते.

5. जगातला सर्वात मोठा हिरा

जगभरातील सर्वात मोठा हिरा कलिनन (Cullinan) हा 530.20 कॅरेटचा आहे. हा जगातील सर्वात मोठा आणि विशेष कट असलेला म्हणजेच पैलू असलेला हिरा आहे. जो डी बिअर या मुख्य खाणीतून मिळाला होता. 3,106 कॅरेटच्या ओबडझोबड हिऱ्याला पैलू पाडून तो काढण्यात आला होता. जो दक्षिण आफ्रिकेच्या ट्रान्सव्हाल या मुख्य खाणीतून मिळाला होता. कलिननला शेवटी  नऊ मोठे आणि एकशे सात लहान कट देण्यात आले. जगभरातील दोन मोठे हिरे तुम्हाला ब्रिटिश क्राऊन  ज्वैलरीमध्ये पाहायला मिळतात. 

7. प्रत्येक हिरा पांढराच असतो असं नाही

सर्वच हिरे पांढऱ्या रंगाचे असतात असं नाही. दागिन्यांमध्ये प्रामुख्याने असे डी टू झेड रंगाचे हिरे वापण्यात येतात. पण तुम्हाला कदाचित माहीत नसेल हिरे इंद्रधनुष्यातील सर्व रंगामध्ये असू शकतात. हिऱ्यामध्ये निळ्या, हिरव्या, केशरी आणि लाल रंगाचे हिरे हे सर्वाधिक दुर्मिळ समजले जातात. मात्र पिवळ्या आणि तपकिरी रंगाचे हिरे सहज आढळतात. 

या कारणासाठी धारण करावा पाचू, होईल फायदाच फायदा

8. प्रत्येक हिरा युनिक असतो

हिरा हे एक दुर्मिळ रत्न आहेच मात्र फॉरएव्हरमार्कचे हिरे सर्वाधिक दुर्मिळ आहेत. जगातील एक टक्याहून कमी हिरे फॉरएव्हरमार्कसाठी पात्र ठरतात. फॉरेव्हर प्रत्येक हिरा हा वेगळा असून तुमच्याजवळ असलेला फॉरेव्हरचा हिरा हा जगातील एकमेव हिरा असू शकतो. कारण त्याच्या आत खास अशी ओळख असलेला युनिक नंबर कोरण्यात आलेला असतो  ज्यामुळे तो हिरा खास होतो. 

9. ‘द पिंक स्टार’ सर्वात महागडा हिरा

तुम्हाला जगातील सर्वात महागडा हिरा कोणता ते माहीत आहे का ? हा मौल्यवान हिरा आहे ‘दी पिंक स्टार’ जो हॉंगकॉंगमध्ये सर्वात जास्त किंमतीत विकला गेला  आणि  त्याचे वजन होते 59.60 कॅरेट

अशी निवडा परफेक्ट साखरपुड्याची अंगठी

10. हिऱ्याच्या निर्मिती म्हणजे देैवी चमत्कारच

पृथ्वीच्या गाभाऱ्यात हिरे 45 ते 60 Kbar च्या दबावाखाली तयार होतात.  पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली असलेल्या 125 ते 200 किलोमीटर खोल सुमारे पन्नास हजार वेळा झालेल्या वातावरणातील बदलातील दाबामुळे हिरा तयार होतो. या क्रियेची तुलना करायची झाल्यास आयफेल टॉवर जर उलटा करून तुमच्या तळहात्याच्या मध्यभागी ठेवला तर जितका दाब होईल तितकी असू शकते. त्यामुळे प्रत्येक हिऱ्याच्या निर्मितीमागे एक युनिक कथा असू शकते. शिवाय प्रत्येक हिरा हा दुसऱ्या हिऱ्यापासून वेगळा असून अतिशय मौल्यवान आणि दुर्मिळच असतो. 

 

हिऱ्याची खरेदी केल्यावर तयार होण्यासाठी परफेक्ट मेकअप करायलाच हवा. यासाठी वापरा मायग्लॅमचे खास मेकअप प्रॉडक्ट

Read More From Jewellery