अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हे नाव घराघरात काही वर्षांपूर्वीच पोहोचलं. पण तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील श्वेता कायम चर्चेत राहिली. तर आता ब्रा च्या साईजवरून केलेल्या वक्तव्यामुळे श्वेता तिवारी गेले काही दिवस चर्चेत आहे. ‘ब्रा ची साईज देव घेत आहे’ असं वक्कव्य केल्याने श्वेताला आता हे महाग पडले आहे. देवासंदर्भातील हे वक्तव्य श्वेताला महाग पडले असून तिच्याविरोधात भोपाळ येथील श्यामला हिल्स पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता 195A अंतर्गत श्वेता तिवारीच्या विरोधामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अधिक वाचा – नागिन 6 मध्ये तेजस्वी प्रकाशची एन्ट्री, बिग बॉस विनर झाल्यामुळे लागली लॉटरी
मस्करीची झाली कुस्करी
एका वेबसिरीजच्या प्रमोशनदरम्यान गंमतीमध्ये केलेले वक्तव्य आता श्वेताला चांगलेच महागात पडले आहे. श्वेता तिवारीने धार्मिक भावना दुखावल्या आहेत असा तिच्यावर आता आरोप करण्यात आला आहे. ‘आपल्या ब्रा ची साईज देव घेत आहे’ या वक्तव्यावर श्वेता आता चांगलीच ट्रोल होताना दिसून येत आहे. इतकंच नाही तर श्वेतावर अनेक संघटनांनीही कडाडून टीका केलेली दिसून येत आहे. त्यामुळे अखेर श्वेताने केलेल्या मस्करीची कुस्करी झालेली पाहायला मिळत आहे. मात्र यातून तिची सहजासहजी सुटका होईल असे वाटत नाही. गुन्हा दाखल झाल्यामुळे आता श्वेताला याबाबत ठोस पावलं उचलावी लागणार आहेत. कारण आता या वक्तव्याची दखल मध्यप्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनीही घेतली असून त्यांनी याची सखोल चौकशी करण्याचे आदेशही आयुक्त मकरंद देऊस्कर यांना दिले आहेत. इतकंच नाही तर 24 तासांत या गोष्टीचा अहवाल देण्यासही सांगितले आहे.
याबाबत भूमिका मांडताना मकरंद देऊस्कर यांनी सांगितले की, ‘गृहमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून आम्हाला याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणामध्ये आता श्वेतावर काय कारवाई करता येऊ शकेल याचा तपास चालू आहे. त्यानंतरच योग्य कारवाईसाठी पावलं उचलण्यात येतील’. त्यामुळे आता श्वेतावर नक्की कोणती कारवाई केली जाणार आणि श्वेताला हे प्रकरण किती महागात पडणार हे येणारी वेळच ठरवेल.
अधिक वाचा – दाक्षिणात्य कलाकारांना बॉलिवूडमध्ये मिळते चुकीची वागणूक, अभिनेत्रीने केला खुलासा
श्वेताने मागितली माफी
या वक्तव्यामुळे श्वेता तिवारी आणि दिग्दर्शकावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत आहे. इतकंच नाही यामुळे अनेक ठिकाणी श्वेताची पोस्टरही जाळण्यात आली आहेत. श्वेताे माफी मागावी यासाठी अनेकांनी इशारा दिला असून चित्रीकरण होऊ देणार नाही असाही इशारा संघटनांनी दिला आहे. दरम्यान याबाबत कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता म्हणत संपूर्ण प्रकरणावर श्वेता तिवारीने माफीही मागितली आहे. मात्र आता दाखल झालेल्या गुन्ह्यावर काय कारवाई होणार हे पाहावे लागणार आहे. तर श्वेता त्यावर काय करणार आहे हेदेखील आता तिच्या चाहत्यांना पाहावे लागणार आहे. मात्र श्वेताची वेबसिरीजच्या प्रमोशनच्या वेळी जीभ सरकली आणि आता तिला याचे परिणाम भोगावे लागणार हे नक्की. त्यामुळे तिचे चाहतेही आता चिंतेत आहेत.
अधिक वाचा – ” धर्मवीर” चित्रपटात उलगडणार आनंद दिघे यांचा जीवनपट
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade