मनोरंजन

एका दिवसात एका चित्रपटगृहात झिम्माचे 18 खेळ हाऊसफुल्ल

Dipali Naphade  |  Nov 25, 2021
zimma

प्रेक्षकांच्या प्रतिक्षेला विराम देत 19 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात ‘झिम्मा’ (Zimma) प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याचे सर्व शोज हाऊसफुल्ल जात आहेत. विकएंडला संपूर्ण महाराष्ट्रात सर्व चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले होते तर ‘झिम्मा’चे प्री बुकिंगही (pre booking) जोरदार सुरु आहे. विशेष म्हणजे विकएंडला ठाण्यातील एका मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचे 18 शोज (18 Shows) लागले होते आणि तेसुद्धा सगळे हाऊसफुल्ल. प्रेक्षकांबरोबरच पत्रकारांकडूनही या चित्रपटाचे प्रचंड कौतुक होत असून वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेल्स, सिनेसृष्टीकडूनही ‘झिम्मा’ला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. सोशल मीडियावरही (social media) या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. तसंच या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांचेच नाही तर अगदी समीक्षकांचेही मन जिंकले आहे. बऱ्याच वर्षांनी असा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे अशा प्रतिक्रियादेखील सध्या येत आहेत.

अधिक वाचा – आधी कोर्ट मॅरेज करणार विकी आणि कतरिना, नंतर रंगणार शाही विवाह

चित्रपटाला मिळत आहे उदंड प्रतिसाद

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित ‘झिम्मा’ चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘झिम्मा’ चित्रपटाला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे याने आपल्या भावना व्यक्त केल्या, ” सर्वप्रथम ‘झिम्मा’ला मिळत असणाऱ्या प्रेमाबद्दल मी सर्व मराठी प्रेक्षकांचे आभार मानतो. त्यांच्या या पाठिंब्यामुळे एक प्रकारचे बळ मिळाले आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी चित्रपटसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. विशेष म्हणजे शासनाच्या नियमांनुसार पन्नास टक्के सीट्सची परवानगी असूनही कोरोनाबद्दलच्या भीतीवर मात करत, प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये येऊन चित्रपटाचा आनंद घेत आहेत.’’ या चित्रपटाला खूपच चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल चित्रपटाच्या कलाकारांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रेक्षकांचे धन्यवाद मानले आहेत. 

अधिक वाचा – आला रे आला ‘पांडू’ चा ट्रेलर आला

सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमेची चित्रपटगृहांना भेट 

झिम्माच्या प्रदर्शनापूर्वीपासूनच या चित्रपटाचे चांगले प्रमोशन करण्यात आले होते. तर आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेला सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि हेमंत ढोमे (Hemant Dhome) हे दोघेदेखील चित्रपटगृहांमध्ये भेट देऊन प्रेक्षकांना सरप्राईज देत आहेत. इतकंच नाही तर त्यांना मिळणारा प्रतिसाद हा त्यांच्यासाठीही अतिशय सुखद आहे. हा येणारा अनुभव अत्यंत चांगला असल्याचेही दोघांनी व्यक्त केले आहे. बऱ्याच वर्षांनी एका वेगळ्या धाटणीचा मराठी चित्रपट पाहायला मिळत असल्याचे मतही अनेक मराठी प्रेक्षकांनी व्यक्त केले आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना काळात मनावर असणारा ताण हा चित्रपट नक्कीच कमी करतो अशी प्रतिक्रियादेखील अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे. ही नक्कीच अतिशयोक्ती नाही हे चित्रपट पाहून आल्यानंतर लक्षात येते. तर बऱ्याच कालावधीनंतर लॅाकडाऊननंतर चित्रपटगृहांमध्ये सुपरहिट ठरलेला पहिला मराठी चित्रपट म्हणून नक्कीच आता झिम्मा चित्रपटाचे नाव घेता येईल. 

अधिक वाचा – या कारणामुळे शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरने सोडली मालिका

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन