Advertisement

मनोरंजन

या कारणामुळे शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरने सोडली मालिका

Leenal GawadeLeenal Gawade  |  Nov 25, 2021
अपूर्वाने सोडली मालिका

Advertisement

 मराठी मालिकांच्या बाबतीत कलाकारांचे पैसे न देण्याच्या तक्रारी खूप वेळा समोर आलेल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. असाच काहीसा अनुभव हा रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवतांची भूमिका साकारणाऱ्या अपूर्वा नेमळेकरला देखील आला आहे. जुन्या शेवंताने सोडली मालिका…. अशा स्वरुपाच्या बातम्या सुरु असताना तिचे कारण समोर आलेले नव्हते. मालिकेमुळे अपूर्वाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. या नव्या सीझनमध्ये तिचे कामही बरेच होते असे असताना आता मालिका सोडण्याचे खरे कारण काय आहे ते अपूर्वाने सांगितले आहे. मालिकेतील काही कलाकारांकडून अवहेलना झाल्याने तिने मालिका सोडल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे. जाणून घेऊया या विषयी अधिक

कलाकाराकडून होत होती अवहेलना

मालिकेच्या सेटवर नेमकं काय झाले हे अपूर्वाने तीन पोस्ट करत सांगितले आहे. खूप जणांनी अपूर्वाला तिने मालिका का सोडली या बद्दल विचारणा केल्यामुळे तिने प्रेक्षकांसमोर या मागील कारणे सांगण्याचा निर्णय घेतला आहे. अपूर्वाने केलेल्या पोस्टनुसार तिने या भूमिकेसाठी 10 किलो वजन वाढविले होते. मालिकेनुसार तिने वजन वाढवले होते. पण अनेकदा सेटवर असताना ज्येष्ठ आणि काही नवख्या कलाकाराकडून तिचा सतत अपमान होत होता. शिवाय ही मालिका सावंतवाडीमध्ये शूट होतेय. मालिकेने सुरुवातीला तिला अगदी काहीच दिवसांसाठी यावे लागेल असे सांगितले होते. पण त्यानंतर आठवड्यातून काही दिवसांसाठी जाण्यासाठी तिला हा प्रवास करावा लागत होता. त्यामुळेही त्रास होत होता. मालिका साकारात असताना अशा पद्धतीने अवहेलना होणे हे अपेक्षित नव्हते. म्हणूनच ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचे तिने म्हटले आहे. मालिकेतील काही कलाकार ज्यामध्ये ज्येष्ठ आणि नवख्या कलाकारांचा समावेश आहे असे तिने म्हटल्यामुळे सगळ्यावरच संशयाची सुई फिरत आहे.

प्रेक्षकांनी घेतली बाजू

अपूर्वाची जागा या मालिकेत कृतिका तुळसकरने घेतली आहे.  मालिकेत तिला पाहिल्यानंतर खूप जणांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण आता ही मालिका का सोडली याचे कारण कळल्यामुळे अनेकांना त्याचा धक्का बसला आहे. पण अपूर्वासोबत काय झाले हे जाणून घेतल्यानंतर त्यांनी तिची बाजू घेतली आहे. शेवंताची जागा कोणीच घेऊ शकत नाही. नव कलाकार आणि ज्येष्ठ कलाकारांवर खूप जणांनी ताशेरे ओढले आहेत. मालिकेची गरज म्हणून कलाकार आपल्यात बदल करतो.त्यामुळे अशा पद्धतीने एखाद्याचे वजन पाहून त्याच्यावर टीक करणे अजिबात चांगले नाही. अपूर्वाला दिलेला पाठिंबा पाहता या कलाकारांची नावे सांगावी अशी मागणी देखील खूप जणांनी केली आहे.

वजन वाढीवरुन खूप जणांना केले जाते टार्गेट

अभिनेत्री किंवा हिरोईन म्हणून वावरताना तिने परफेक्ट असायला हवे अशी अपेक्षा असते. अशावेळी जर एखादी हिरोईन थोडी वेगळी दिसू लागली किंवा तिचे वजन वाढले की, लगेच तिच्या वजनावरुन ट्रोल करण्यास सुरुवात केली जाते. अभिनेत्री स्पृहा जोशीलाही तिच्या वाढत्या वजनावरुन खूप जणांनी ट्रोल केले होते. पण त्यावर तिने मात करत आपल्यातील विश्वास वाढवला होता आणि या विषयी संवाद साधला होता. 

अपूर्वाने ही पोस्ट केल्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत

अधिक वाचा

आधी कोर्ट मॅरेज करणार विकी आणि कतरिना, नंतर रंगणार शाही विवाह

Bigg Boss Marathi: स्नेहा पाठोपाठ आता मीरानेही विकासवर केले आरोप