Family Trips

पावसाळी पिकनिकला जाताय, मग करू नका या 5 चुका

Trupti Paradkar  |  Jun 12, 2019
पावसाळी पिकनिकला जाताय, मग करू नका या 5 चुका

पावसाने दमदार सुरूवात केली आहे. पहिलाच पाऊस मुसळधार पडला. त्यामुळे उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना चांगलाच दिलासा मिळाला. पावसाळा सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते पावसाळी पिकनिकला जाण्याचे. पावसाळी पिकनिकला जाण्यासाठी मुंबई आणि मुंबई बाहेर अनेक पर्यटन स्थळं आहेत. डोंगराळ भागातील नद्या, धरणे, धबधबे पावसाळ्यात पर्यटकांची जणू वाटच पाहत असतात. डोंगरदऱ्यांमधून दुधड्या भरून वाहणाऱ्या नद्या आणि धबधब्यांमध्ये चिंब भिजण्याचा आनंद लुटायला कोणाला आवडणार नाही. त्यामुळे पावसाळ्यात विक ऐंडला अनेक ग्रुप डोंगरमाथ्यांवर फिरायला जातात. या पावसाळ्याच तुम्ही देखील फिरायला जाण्याचा बेत आखला असेल तर या पाच चुका मुळीच करू नका.

पावसाळी पिकनिकमध्ये टाळा या पाच चुका

1. हवामानाचा अंदाज न घेणं

पावसाळ्यात फिरायला जाण्याआधी या गोष्टीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. कारण वाढत्या लोकसंख्येमुळे माणसाने आधीच अनेक नैसर्गिक ठिकाणांवर अतिक्रमण केलं आहे. त्यामुळे पावसाळ्या पाऊस जसा रिमझिम पडतो तसाच तो त्याचे मुसळधार आणि आक्रमक रूपही दाखवतो. बऱ्याचदा उत्साहाच्या भरात तुम्ही अशा ठिकांणांना भेट देतो. ज्या ठिकाणची माहिती तुम्हाला नसते. डोंगरांचे खोदकाम झालेले असेल आणि तिथे मुसळधार पाऊस कोसळला तर दरड कोसण्याची शक्यता असते. म्हणूनच हवामानाचा आणि तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात. त्याचा आधीच अंदाज घ्या.

2. सेल्फी घेण्याचा मोह न आवरणं

आजकाल सेल्फीचा जमाना आहे. त्यामुळे प्रत्येकाला सगळीकडे सेल्फी घेण्याचा मोह होत  असतो. मात्र पावसाळी पिकनिक साठी गेल्यावर सेल्फी घेण्याचा मोह तुम्हाला आवरता यायला  हवा. कारण अनेक जण डोंगरकड्यांवर , धबधब्यांमध्ये सेल्फी घेतात. मात्र पाण्याचा अथवा हवामानाचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा तोल जाण्याचा अथवा पाण्यात वाहत जाण्याचा धोका त्यामुळे निर्माण होतो.

3. भरतीच्या वेळी समुद्रकिनारी जाणं

पावसाळ्यात भरतीच्या वेळी समुद्राला उधाळ आलेलं असतं. अशा भरतीच्या वेळी लाटांचा अंदाज घेणं पट्टीच्या पोहणाऱ्या लोकांना देखील घेणं शक्य नसतं. त्यामुळे पावसाळ्यात समुद्रकिनारी फिरण्याचा कितीही मोह झाला तरी भरतीच्या वेळी समुद्रकिनारी मुळीच जाऊ नका.

4. मेडीकल किट सोबत न ठेवणं

जर तुम्ही पावसाळी पिकनिकसाठी एखाद्या डोंगरमाथ्यावर अथवा जंगलात फिरण्याचा बेत आखला असेल तर मेडीकल किट सोबत जरूर ठेवा. कारण पावसाळ्यात अशा ठिकाणच्या पाऊलवाटा निसरड्या आणि गवतामुळे अरुंद झालेल्या असतात. अशा वेळी पाय सटकून पडण्याचा अखवा कीटकदंशाचा धोका अधिक वाढतो. यासाठी पावसाळी पिकनिकला जाताना प्रथमोपचारासाठी मेडिकल किट तुमच्या फायद्याची ठरू शकते.

4. मद्यपान करणं

अनेकजण पावसाळी पिकनिक मद्यपान करण्यासाठी आणि धिंगाणा घालण्यासाठीच आहे असं समजतात. डोंगरमाथ्यावर अथवा निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर तिथल्या निसर्गाचा आनंद लुटण्याऐवजी तो नष्ट करण्यावरच अनेकांचा भर असतो. शिवाय मद्यपान केल्यामुळे तोल जाणे, पोहण्याची क्षमता कमी होणे अशा गोष्टींमुळे अशा लोकांचा जीव जाण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात फिरताना मद्यपान अथवा इतर व्यसनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

अधिक वाचा

पावसाळ्यातही राहा ‘स्टायलिश’, छत्री बदलेल तुमचा लुक

कमी बजेटमध्ये भारतात फिरण्यासाठी ’25’ पर्यटन स्थळं

Viral Video : समुद्रकिनाऱ्यावर कार नेण्याआधी ‘हा’ व्हिडीओ नक्की पाहा

फोटोसौजन्य – इन्टाग्राम

Read More From Family Trips