Party

पेन्सिल स्कर्टने दिसा सडपातळ, फॉलो करा या स्टायलिंग टिप्स

Trupti Paradkar  |  Oct 28, 2020
पेन्सिल स्कर्टने दिसा सडपातळ, फॉलो करा या स्टायलिंग टिप्स

हाय हिल्स, व्हाईट शर्ट, सिंपल ब्लेझर आणि क्लासिक आणि बॉडी हगिंग पेन्सिल स्कर्ट घालून तुमचा प्रोफेशनल लुक कप्लीट करू शकता. विशेष म्हणजे हिवाळा असो वा उन्हाळा तुम्ही वर्षभर हे स्कर्ट वापरू शकता. पेन्सिल स्कर्ट निरनिराळ्या लुकसासाठी वापरता येत असले तरी. फॅशनेबल आणि स्टनिंग दिसायचं असेल तर मात्र तुम्हाला पेन्सिल स्कर्टसोबत योग्य कपडे पेअर करता यायला हवेत. ऑफिस लुक, पार्टी लुक, कॅज्युअल मिटींग, प्रेंझेंटेशन अशा निरनिराळ्या कामांसाठी पेन्सिल स्कर्टने तुम्ही विविध प्रकारचे लुक करू शकता. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत पेन्सिल स्कर्टसोबत कॅरी करता येतील असे काही लुक्स शेअर करत आहोत. ज्यामुळे तुम्ही सर्वांपेक्षा नक्कीच हटके आणि आकर्षक दिसू शकाल.

ब्लेझरसोबत पेन्सिल स्कर्ट

एखादी परफेक्ट ऑफिस मिटिंग अथवा प्रेझेंटेशनसाठी ब्लेझरसोबत पेन्सिल स्कर्ट हा एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. कारण यामुळे तुमचा प्रोफेशनल लुक नक्कीच पूर्ण होईल. ऑफिस पार्टीजसाठीही तुम्ही हा लुक करू शकता. अशा वेळी स्कर्टसोबत स्किन कलर अथवा न्यूड कलरचे स्टॉगिंग्ज वापरा. ज्यामुळे तुम्हाला  यात आरामदायक वाटेल. 

Instagram

हॉल्टर नेक स्पेगेटी आणि पेन्सिल स्कर्ट

एखाद्या पार्टीमध्ये ग्लॅम दिसण्यासाठी तुम्ही हा लुक नक्कीच ट्राय करू शकता. सध्या हॉल्टर नेक इन आहे त्यामुळे अशा गळ्याचा एखादा टॉप अथवा स्पेगेटी घाला आणि त्यासोबत पेन्सिल स्कर्ट कॅरी करा. लक्षात ठेवा पार्टीसाठी जाताना तुमचा टॉप शिमर लुकचा असेल तर खूपच छान वाटेल. त्यावर हाय हिल्स आणि एखादं अॅंकलेट घालून थोडा क्लासी टच द्या. स्पेगेटी टॉप आणि पेन्सिल स्कर्टमध्ये योग्य इनरवेअर वापरले तर या लुकमध्ये वावरणं नक्कीच सोयीचं जाईल.

Instagram

रफल स्लीव्ज टॉप आणि पेन्सिल स्कर्ट –

तुम्हाला टॉपमध्ये वेगवेगळे प्रकार ट्राय करायचे असतील हा सर्वात हटके लुक ठरू शकेल. अशा रफल स्लीव्जमुळे तुम्ही फॅशनेबल आणि स्टायलिश दिसाल. यावर तुम्ही योग्य रंगसंगतीचे कोणतेही कॉम्बिनेशन वापरू शकता. 

Instagram

लेदर जॅकेट आणि पेन्सिल स्कर्ट –

तुम्हाला हिवाळ्यामध्ये लेदरचे कपडे वापरणं आवडत असेल तर यंदा हा लुक ट्राय करायला हरकत नाही. लेदरमध्ये स्कर्ट आणि जॅकेटचं अप्रतिम कलेक्शन बाजारात मिळू शकतं. त्यामध्ये निरनिराळे रंगही आता उपलब्ध आहेत. काळ्या  लेदर जॅकेट आणि स्कर्टने तुमचा लुक नक्कीच छान दिसेल पण हवं असेल तर तुम्ही ब्राऊन अथवा ऑलिव्ह कॉम्बिनेशनही ट्राय करू शकता. 

Instagram

डेनिम आणि पेन्सिल स्कर्ट

पेन्सिल स्कर्टवर डेनिम कॅरी करण्याची सध्या फॅशनच आहे. असं केल्यामुळे तुम्हाला एक फ्युजन लुक मिळू शकतो. डेनिम जॅकेटची फॅशन कधीच कमी होऊ शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला पेन्सिल स्कर्टमध्ये हटके दिसायचं असेल तर एकतरी डेनिम जॅकेट तुमच्याकडे असायलाच हवं. 

Instagram

पेन्सिल स्कर्टसोबत हे विविध लुक ट्राय केल्यावर तुमचा लुक कप्लीट करण्यासाठी मायग्लॅम प्रॉडक्टने मेकअप करा. मायग्लॅमच्या न्यूड लिपस्टिक शेडने तुमचा कोणताही प्रोफेशनल लुक नक्कीच परिपूर्ण होईल. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

बॉडीकॉन ड्रेस वापरायचे असतील तर लक्षात ठेवा या टिप्स

ट्युब टॉपचे स्टायलिश आणि हटके प्रकार (Tube Tops For Women In Marathi)

स्किनी पॅंटने अशी करा हटके स्टाईल (How To Wear Skinny Pants In Marathi)

Read More From Party