DIY फॅशन

जीन्सवर घालता येतील असे लाँग टॉप्सचे प्रकार (Long Tops For Jeans In Marathi)

Leenal Gawade  |  Aug 24, 2020
जीन्सवर घालता येतील असे लाँग टॉप्सचे प्रकार (Long Tops For Jeans In Marathi)

जीन्स घालायला आवडते? पण शॉर्ट टॉप घालायला आवडत नाही. तुम्हाला जीन्सवर मस्त लेटेस्ट फॅशनचा लाँग टॉप हवा असेल तर आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. अनेक जण जीन्सवर किंवा लेगिंग्जवर शॉर्ट टॉप घालण्यास पसंती देत नाहीत. तर काहींना त्यांचे शरीर उगाच बेढब वाटते. अशावेळी त्यांना फॅशन करायची असते पण असे कपडे घालायचे असतात जे त्यांना चांगलेही दिसतील आणि त्यामुळे त्यांची फॅशन उठूनही दिसेल. तुम्ही देहयष्टी काहीही असली तरी देखील तुम्ही असे लाँग टॉप घालू शकता. अगदी ऑफिसपासून ते एखाद्या पार्टीपर्यंत तुम्हाला हे टॉप घालता येतात. चला तर मग जाणून घेऊया असेच काही जीन्सवर घालता येतील असे लाँग टॉप (Long Tops In Marathi)

ट्युनिक टॉप (Tunic Tops)

Instagram

ट्युनिक हा टॉपमधील अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे. साधारण गुडघ्यापेक्षा थोडा वर असलेले हे टॉप जीन्स घालणाऱ्यांसाठीच असतात. तुम्हाला यामध्ये कित्येक वेगळे प्रकार आणि मटेरिअल मिळतील. तुम्ही अगदी कोणत्याही ब्रँडमध्ये कपडे घ्यायला जा. तुम्हाला हा प्रकार अगदी हमखास सगळीकडे पाहायला मिळेल. कॉटन, जीन्स, शिफॉन, होजिअरी अशा वेगवेगळ्या मटेरीअलमध्ये तुम्हाला हे ट्युनिक टॉप पाहायला मिळतात. 

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) : ट्युनिक टॉपमध्ये जशा मटेरिअलमध्ये व्हरायटी आहेत. तसे तुम्हाला यामध्ये वेगवेगळे पॅटर्नसुद्धा मिळतात. स्ट्रेट फिट पॅटर्न किंवा कंबरेपासून खाली फ्लोई अशा पॅटर्नमध्येसुद्धा टॉप मिळतात. यामध्ये साईड कट आणि साईड कट नसलेला असा प्रकार देखील मिळतो.

 स्टायलिंग टिप्स (Styling Tips) : 

असिमेट्रिक कुडती (Asymmetric Kurti)

Instagram

असिमेट्रिक कुडती या प्रकाराचीही सध्या फारच चलती आहे. पुढून लहान आणि मागून मोठा असा हा या कुडतीचा पॅटर्न असतो. याला साईड कट मुळीच नसतो. पुढचा भाग हा गुडघ्यापर्यंत येतो. तर मागचा भाग हा थेट पायापर्यंत लोळतो. हा प्रकार तुम्ही वनपीस म्हणूनही घालू शकता.  

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) : ट्रेडिशनल लुकपासून ते अगदी वेस्टर्न लुकपर्यंत तुम्हाला अनेक प्रकार यामध्ये मिळतात. यामध्ये तुम्हाला इतके छान पॅटर्न मिळतात की, तुम्हाला ते अगदी कधीही कोणत्याही ठिकाणी घालता येतील. अगदी ऑफिसपासून छोटेखानी समारंभ आणि लग्नातही तुम्हाला ते घालून स्टायलिंग करता येईल. 

 स्टायलिंग टिप्स (Styling Tips)

ट्युब टॉपचे स्टायलिश आणि हटके प्रकार (Tube Tops For Women In Marathi)

कफ्तान (Kaftan)

Instagram

थोडासा सैल पण तरीही स्टायलिश वाटणारा हा प्रकारही अनेकांच्या आवडीचा आहे. कोणत्याही जीन्सवर तुम्हाला तो घालता येतो. याला कफ्तान म्हणतात ते त्याच्या बाह्यांमुळे अगदी दोन शिलाईमध्ये हा टॉप रेडी होतो. या टॉपच्या हाताचा भाग हा सैल फारच सैल असतो. पण तुम्ही घातल्यानंतर तो अधिक उठून दिसतो. कफ्तान हा तुम्हाला कोणत्याही पार्टीसाठी, ट्रॅव्हलिंगसाठी घालता येतो कारण यामध्ये हवा खेळती राहते. शिवाय तुमच्या शरीराचा कोणताही अवयव यामध्ये उठून दिसत नाही

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) : कफ्तान टॉपही वेगवेगळ्या लेंथचे असतात. तुम्हाला अगदी कंबरेपासून ते पायघोळ असे प्रकार यामध्ये मिळतात. पायघोळ हा प्रकार तुम्ही गाऊन म्हणूनही घालू शकता. तर यामध्ये मिळणारा शॉर्ट कुडतीचा आकार हा कोणत्याही जीन्ससाठी अगदी परफेक्ट आहे. 

 स्टायलिंग टिप्स (Styling Tips) :  

टी शर्ट कुडता (T-shirt Kurta)

Instagram

लाँग टॉपमधील आणखी एक आवडता प्रकार म्हणजे टी-शर्ट कुडता. याला वेगवेगळ्या नावाने देखील ओळखले जाते. कुडत्याच्या लेंथ प्रमाणे हे टॉप असतात. यामध्ये तुम्हाला स्ट्रेट फिट कपडे जास्त मिळतात. अनेकदा होजिअरीचे कपडे शरीराला एकदम घट्ट बसतात. जर तुम्ही बारीक असाल तर तुम्हाला हा पर्याय छान उठून दिसतो. 

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) : टी शर्ट कुडता हा जरी तुमच्या शरीराला घट्ट बसत असला तरी देखील तुम्हाला यामध्ये अनेक वेगळे प्रकार मिळतील जे सैल बसतात आणि तुम्हाला चांगलेही दिसतात. 

 स्टायलिंग टिप्स (Styling Tips) :

नवरात्रीला स्पेशल दिसण्यासाठी ‘9’ प्रकारच्या पारंपरिक साड्या

फ्लोरल फ्रंट कट लाँग टॉप्स (Floral Front Cut Long Tops)

Instagram

अगदी ट्रेडिशनल असा हा प्रकार फारच प्रसिद्ध आहे. या टॉप फॅन्सी असला तरी तो तुम्हाला एखाद्या ट्रेडिशनल कार्यक्रमात किंवा पार्टीमध्येही घालता येऊ शकतो. याची उंचीही पायघोळ असते. लाँग टॉपमधील हा प्रकार खास जीन्सवरच घालण्यासारखा असतो त्यावरच तो शोभून दिसतो. 

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) : फ्लोरल पॅटर्नमध्ये मिळणारे हे टॉप तुम्हाला वेगवेगळ्या रंगामध्ये आणि पॅटर्नमध्ये मिळतात. स्ट्रेट फिट पँटपेक्षाही हा प्रकार तुमच्या जीन्सवर अधिक खुलून दिसतो. हा प्रकार थोडा पारदर्शक असल्यामुळे तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागते. 

 स्टायलिंग टिप्स (Styling Tips) : 

ओव्हरसाईज शर्ट टॉप (Over Size Shirt Top)

Instagram

ओव्हरसाईज शर्ट हे अनेकांच्या आवडीचे असतात. हे शर्ट सैल वाटत असले तरी देखील ते दिसायला छान दिसतात. यावर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या पँटस तुम्हाला घालता येऊ शकतात. तुमच्या वॉर्डरोबमध्ये एकतरी असा टॉप असायलाच हवा. 

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) : ओव्हरसाईज शर्टची लांबी नेहमीच थोडी लांब असते. तुम्हाला यामध्ये लिनन, कॉटन असे मटेरिअल मिळतात. हे टॉप दिसायला नेहमीच रिच दिसतात. 

 स्टायलिंग टिप्स (Styling Tips) :

स्टिक ऑन ब्रा वापरताय, तर तुम्हाला हे माहीत हवं (Stick-On Bra In Marathi)

लाँग डेनिम शर्ट (Long Denim Shirt)

Instagram

डेनिम शर्टची फॅशन कधीही जुनी होत नाही. तुम्हाला डेनिम आवडत असेल तर तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये तुम्ही हा एक लाँग डेनिम शर्ट ठेवायला हवा. ऑफिस किंवा डेटला जाताना तुम्ही अशा प्रकारचा लाँग डेनिम शर्ट घालू शकता. 

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) : डेनिम शर्टमध्ये तुम्हाला ओव्हरसाईज किंवा लांब असे शर्ट मिळतात. यात तुम्हाला वेगवेगळे रंगही मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने स्टायलिंग करता येते. 

 स्टायलिंग टिप्स (Styling Tips) :

फ्रॉक टॉप (Frock Style Long Tops)

Instagram

जर तुम्हाला अंगालगत टॉप आवडत नसेल तर तुम्ही असे फ्रॉक टॉप निवडू शकता. हे दिसायला खूपच चांगले दिसतात. तुम्ही चारचौघात गेल्यावर नक्कीट उठून दिसणार. साधारण खिशालगत हा टॉप येतो. पण यामध्येही तुम्हाला थोडी लहान मोठी लेंथ मिळू सकते. 

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) :  फुल स्लिव्हज, बलुन हँडस आणि खूप घेर तुम्हाला मिळू शकतात. मिक्स कॉटन मटेरीअलमध्ये असे टॉप्स मिळतात. 

स्टायलिंग टिप्स (Styling Tips) :

ऑफ शोल्डर लाँग टॉप (Off Shoulder Long Tops)

Instagram

ऑफ शोल्डर टॉपची फॅशनही आहे. यामध्ये शॉर्ट आणि लाँग टॉप्सही मिळतात. ही फॅशन कॅरी करायलही फार सोपी आहे. रोजच्या कपड्यांपेक्षा तुम्हाला थोडे वेगळे काही घालायये असेल तर तुम्ही असे ऑफ शोल्डर लाँग टॉप घालू शकता. 

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) : ऑफ शोल्डरमध्ये तुम्हाला टॉप आणि कुडता असे पर्याय मिळतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची निवड करु शकता. 

स्टायलिंग टिप्स (Styling Tips) :

श्रेडेड लाँग टॉप्स (Shredded Long Tops)

Instagram

फॅन्सी आणि लेटेस्ट ट्रेंड ही तुमची चॉईस असेल तर तुम्ही श्रेडेड लाँग टॉप्स घालू शकता. जीन्सवर ते चांगले दिसतात.जास्तीकरुन हे टॉप्स टिशर्ट मटेरिअलमध्ये असतात. त्यामुळे त्यांना इस्त्री करण्याची फारशी गरज नसते. 

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) : तुम्हाला यामध्ये वेगवेगळे रंग आणि पॅटर्न मिळतात. स्लिव्हिज, फुल स्लिव्हज असे प्रकार तुम्हाला मिळतात

 स्टायलिंग टिप्स (Styling Tips) : 

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. लाँग टॉप वनपीस ड्रेसप्रमाणे घालता येऊ शकतो का?  

हो, ज्या टॉपना साईड कट नसतो… जे गुडघ्यापर्यंत किंवा तुम्हाला चालू शकेल अशा उंचीचे असतील असे टॉप तुम्हाला वनपीससारखे घालता येतात. फक्त या टॉपला जर तुम्हाला थोडा ग्रेस आणायचा असेल तर तुम्ही कंबरेला बेल्ट लावू शकता. त्यामुळे तुमचे हे लाँग टॉप खूप छान दिसतात. 

2. लाँग टॉप घातल्यावर बारीक दिसता येते का?  

हे शक्य आहे, ज्यावेळी तुम्ही उंचीने कमी असा टॉप घालता त्यावेळी तुमचे शरीर अधिक दिसते. पण लाँग टॉप घातल्यामुळे तुमचे शरीर झाकले जाते. तुम्हाला तुमचे शरीर जाड दिसते असे वाटत असेल तर तुम्ही लाँग टॉप घालून पाहा. तुम्हाला नक्कीच तुम्ही स्थुल न दिसता अधिक चांगले दिसता असे दिसेल. 

3. लाँग टॉप फॅन्सी टॉप्समध्ये येते का?  

तुम्ही लाँग टॉप घालता म्हणजे तुम्ही फॅशनेबल नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे मानातून काढून टाका. कारण हल्ली लाँग टॉपची चांगलीच चलती आहे. त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्त हे टॉप घाला. तुम्ही अजिबात वेगळे किंवा फॅशनच्या बाहेर दिसणार नाही. आता नक्की ट्राय करा हे फॅशनेबल लाँग टॉप आणि दिसा सुंदर …

Read More From DIY फॅशन