आरोग्य

जास्त वेळ वज्रासनात बसणं वाटतं कठीण, फॉलो करा या टिप्स

Trupti Paradkar  |  Jul 6, 2022
Follow these tips to stay in Vajrasana posture for a long time in Marathi

वज्रासन हे योगासनामधील एक मुख्य बैठे आसन आहे. यासाठी गुडघ्यात पाय दुमडून निंतब पायाच्या घोट्यांवर टेकवून बसावे लागते. संस्कृतमध्ये वज्र म्हणजे हिरा आणि आसन म्हणजे मुद्रा.. थोडक्यात या आसनाचा सराव करणे म्हणजे अशा आसनात बसणे ज्यामुळे तुमचे शरीर हिऱ्याप्रमाणे मजबूत होते. वज्रासनाचा नियमित सराव केल्याने शरीरातील सर्व रक्तवाहिन्या कार्यरत होतात, मांड्या आणि पायातील, पोट आणि ओटीपोटातील रक्तसंचार सुधारतो. यासाठी जाणून घ्या वज्रासनाचे फायदे (Vajrasana Benefits In Marathi) वज्रासनात बसताना काही काळासाठी तुमच्या पाय आणि मांड्यामधील रक्तप्रवाह रोखला गेल्यामुळे तुमच्या पायाला मुंग्या येतात, म्हणजेत ते बधीर होतात. वज्रासनात बसण्याची सवय नसल्यामुळे असं होतं. मात्र योगासने करताना तुम्हाला बराच वेळ वज्रासनात बसावे लागते यासाठीच जाणून घ्या काही सोप्या टिप्स… तसंच वाचा Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे

वज्रासनात बसल्यावर पाय बधीर का होतात

वज्रासनाचे अनेक फायदे शरीरावर होतात. मात्र यासाठी तुम्हाला कमीत कमी पाच मिनीटे वज्रासनात बसायला हवे. तज्ञ्ज सांगतात की जेवल्यानंतर पाच ते दहा मिनीटे वज्रासनात बसल्यामुळे अन्नाचे पचन नीट होते. पण सुरुवातीला अनेकांना वज्रासनात बसणे कठीण जाते. काही सेंकदातच पायाला मुंग्या येतात आणि पाय सुन्न होतो. असं होतं कारण सध्या लोकांना जमिनीवर बसण्याची सवय नाही. कामासाठी टेबल खुर्ची, जेवणासाठी डायनिंग टेबल आणि आरामासाठी सोफा अथवा बेडची सवय लागल्यामुळे खाली बसणं अनेकांना कठीण जातं. त्यामुळे जमिनीवर बसताच पायाला होणारा रक्तसंचार खंडीत होतो आणि पाय सुन्न पडतात. वज्रासनात बसल्यावर काही काळासाठी हा त्रास तुम्हाला होतो मात्र पुन्हा पूर्वस्थितीत आल्यावर पाय मोकळे होतात. वज्रासनाचे अनेक फायदे असल्यामुळे या आसनात बराच काळ बसण्याची सवय लावायची असेल तर काही सोप्या टिप्स तुमच्या फायद्याच्या ठरू शकतात. 

जास्त वेळ वज्रासनात बसण्यासाठी सोप्या टिप्स

वज्रासनात जास्त बसणं कठीण जात असेल तर या टिप्स फॉलो करा.

वज्रासनात बसण्याचा सराव करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य