Diet

पाठीवर व कंबरेवर आले असतील टायर्स तर कमी करण्यासाठी हे करा

Vaidehi Raje  |  Apr 8, 2022
How to reduce back fat

आनुवंशिकता, आहार आणि जीवनशैली या सर्व घटकांचा आपल्या शरीरयष्टीवर परिणाम होतो. आपल्या शरीरात चरबी कुठे कुठे साठून राहते हे आपल्या रोजच्या लाइफस्टाइलवर ठरते. चालणे आणि कामे करणे, वजन उचलून नेणे यासारख्या तुमच्या दैनंदिन हालचालींचा आपल्या पायांवर, हातांवर आणि छातीच्या पुढील भागावर परिणाम होतो. त्यामुळे पाठीचे स्नायू कसे टोन करावे आणि पाठीवर, कंबरेवर साठलेली चरबी कशी कमी करावी हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. विशिष्ट व्यायाम करून तुमच्या शरीरावर चरबीचे “स्पॉट रिडक्शन” होणे हे एक मिथक आहे. तुमच्या शरीरात पोटावर, कंबरेवर, पाठीवर साठलेली चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला एकूणच संपूर्ण शरीरावरचे फॅट्स कमी करावे लागतील. केवळ पोट किंवा नितंब किंवा कंबर बारीक होणे शक्य नसते. व्यायामाचा आपल्या संपूर्ण शरीरावरच परिणाम होतो. निरोगी आहार, कॅलरीजवर नियंत्रण तसेच तुमच्या पाठीच्या खालच्या आणि वरच्या भागावर जाणूनबुजून लक्ष केंद्रित करणारी व्यायामाची दिनचर्या यांचे संयोजन तुमची पाठ मजबूत आणि अधिक तंदुरुस्त बनवण्यासाठी एकत्र काम करू शकते. या आरोग्यदायी टिप्स फॉलो केल्यात तर तुम्हाला फिट होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

पाठीवर व कंबरेवर साठलेली चरबी कशी कमी करावी

How To Lose Back Fat

तुमच्या पाठीवर साठलेली चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारातील कॅलरीज कमी करून सुरुवात करावी लागेल. याचा अर्थ असा की तुम्ही आहारात घेता त्यापेक्षा जास्त कॅलरीज तुम्हाला व्यायाम करून जाळाव्या लागतील. कॅलरी कमी करण्याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या पाठीच्या वरच्या आणि खालच्या स्नायूंना लक्ष्य करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम केल्यास तुमच्या पाठीच्या स्नायूंना टोन करू शकता. रोज HIIT (हाय इंटेन्सिटी इन्टर्वल ट्रेनिंग) या प्रकारचा व्यायाम केल्यास अपेक्षित परिणाम तुम्हाला मिळू लागतील.

आहारात या गोष्टींचा समावेश करा 

भरपूर फायबर आणि सोडियम कमी असलेला आहार घेतल्याने अतिरिक्त चरबी आणि “वॉटर वेट” कमी करण्यास मदत होऊ शकते जे आपले शरीर साठवून ठेवते. वजन कमी करण्यासाठी अनुकूल असलेल्या या पदार्थांचा आहारात समावेश करा. अवाकाडो, उकडलेली अंडी, पालेभाज्या, ब्रोकोली, फुलकोबी, रताळी, सॅल्मन आणि ट्यूना हे मासे, लीन चिकन ब्रेस्ट हे पदार्थ आहारात घेतल्यास व त्याबरोबरच HIIT या प्रकारचा व्यायाम केल्यास वजन व फॅट्स कमी होण्यास मदत होते. हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये हे थोडेसे बदल करावे लागतील.

हे व्यायाम केल्यास चरबी नक्कीच होईल कमी 

How To Lose Back Fat

जंपिंग जॅक 

जंपिंग जॅक हा व्यायाम तुमच्या शरीराच्या फक्त एकाच भागावर नाही तर संपूर्ण शरीरावर काम करतो. म्हणूनच हा एक उत्तम व्यायाम आहे. यामध्ये तुमच्या हातापासून पायापर्यंत सर्व स्नायूंना व्यायाम मिळतो आणि त्यामुळे शरीरातील चरबी सहज कमी होते. पाय, पोट, पाठ, हात आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हा चांगला व्यायाम आहे. जंपिंग जॅक करण्याआधी वॉर्म अप करावे.

वन आर्म डंबेल रो

 हा व्यायाम प्रामुख्याने तुमच्या पाठीसाठी चांगला मानला जातो. जर तुम्ही ते योग्यरित्या केले तर ते पाठीचे स्नायू बळकट होतात. अप्पर बॉडीचे स्नायू बळकट करण्याबरोबरच तुमच्या कोअर आणि हिप स्टॅबिलिटीवर देखील काम करते. हे करण्यापूर्वी, 10 सेकंद वॉर्म अप करावे. नवशिक्यांनी हा व्यायाम तज्ञांच्या देखरेखीखाली केला पाहिजे.

साईड लंजेस 

साईड लंजेस तुमच्या शरीराच्या खालच्या भागासाठी काम करतात. कंबरेच्या भागापासून आपल्या पायांच्या स्नायूंसाठी हा व्यायाम उत्तम आहे. यामध्ये स्ट्रेचिंगचा समावेश होतो आणि ते तुमच्या हॅमस्ट्रिंग्स तसेच ग्लूट्सवर काम करते. साइड लंजेस नियमितपणे केल्याने तुमचे संतुलन आणि स्टेबिलिटी सुधारते. हे स्नायूंचे टोनिंग तसेच पाठीला आकार देण्यास मदत करते.

नियमित व्यायाम व योग्य आहार घेऊन तुम्ही कंबरेवरचे व पाठीवरचे फॅट नक्कीच कमी करू शकता. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Diet