खाणंपिण आणि नाइटलाईफ

पिकनिकसाठी भन्नाट स्नॅक्स आयडियाज, प्रवास होईल मस्त

Leenal Gawade  |  Dec 26, 2020
पिकनिकसाठी भन्नाट स्नॅक्स आयडियाज, प्रवास होईल मस्त

पिकनिकला जाण्याचे प्लॅन सुरु झाले की, वेगवेगळ्या तयारीला सुरुवात होते. ठिकाणानुसार कपडे, तिथे नेण्याच्या गोष्टी, फोटोसाठी लागणारे सामान, खेळण्याचे- मजा मस्ती करण्याचे सामान आणि खाण्यासाठी काय न्यायचे याची जोरदार तयारी केली जाते. बाकी सगळ्या सामानाच्या बाबतीत ठिक आहे. पण खाण्याचे सामान नेताना आपण इतका विचार करतो की, नाही नाही म्हणता म्हणता आपण खाण्याचे इतके प्रकार घेतो की, ते सगळे प्रकार खाल्लेही जात नाही आणि आपण परत घरी आणतो. त्यामुळे आज आम्ही पिकनिक स्नॅक्सच्या अशा भन्नाट आयडियाज देणार आहोत जे तुम्ही कॅरी केले तर आरामात कोणीही खाऊ शकेल. चला जाणून घेऊया असे काही पदार्थ

प्रवासाला जाताना सोबत न्या ‘हे’ घरगुती खाद्यपदार्थ

ब्रेड बटर

Instagram

चहा- कॉफी किंवा नुसतेच खायला कधीही चांगला असा पदार्थ म्हणजे ब्रेड-बटर. ब्रेड बटर हे कॅरी करायला आणि खायलाही सोपे असते. ज्या दिवशी तुम्ही प्रवासाला निघणार आहात.त्या दिवशी खाण्यासाठी हा उत्तम असा पर्याय आहे. ब्रेड- बटर खाताना फार हातही खराब होत नाही. असा पदार्थ दातांमध्ये अडकत नाही किंवा खाताना काही अडथळा ही येत नाही. त्यामुळे लहान मुलांपाासून ते मोठ्यापर्यंत कोणालाही खाता येईल असा हा पदार्थ आहे.

ठेपले आणि मिरचीचं लोणचं

Instagram

मेथीचे ठेपले हा प्रवासासाठी उत्तम पर्याय आहे. मेथीचे ठेपले हे जास्त काळासाठी टिकतात. त्यामुळे ते तीन ते चार दिवस चांगले टिकतात. पातळ पातळ ठेपले तुम्ही बनवले तर ते तुम्हाला नाश्त्याला किंवा भूक लागल्यानंतर कोणत्याही वेळी खाता येतात. याच्यासोबत मिरचीचे लोणचं असेल तर त्याला आणखी चव लागते. त्यामुळे जर तुम्ही खूप काही नेत असाल तर त्याला पर्याय म्हणून ठेपले आणि मिरचीचं लोणचं कॅरी करा. ते खराब होत नाही.

प्रवासात प्रत्येक मुलीकडे असायलाच हवे ‘Travel kit’

पुरणपोळी

Instagram

पुरणपोळी हा असा प्रकार आहे जो अनेकांना प्रवासात खायला आवडतो. त्यामुळे गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होते आणि पोटही भरतं. पातळ पातळ पुरणपोळ्या जर चविष्ट असतील तर अशा पुरणपोळ्या खायला अनेकांना आवडतात. पुरणपोळया या खराब होत नाही. त्या जास्तीत जास्त काळासाठी चांगल्या राहतात. पुरणपोळ्या एअर टाईट डब्यात ठेवल्यानंतर ते अधिक चांगल्या राहतात.

प्रवासासाठी बेस्ट आहेत disposable panties, जाणून घ्या त्याचे फायदे

ड्रायफ्रुट्स

Instagram

प्रवासात अनेकदा सगळ्या गोष्टी पटकन मिळतील याची खात्री नसते. अशावेळी एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी ड्रायफ्रुट्स हे एकदम योग्य असतात. मिक्स ड्रायफ्रुट्स खाल्ल्यामुळे पोट तर भरते शिवाय तोंडाला एक चवही येते. त्यामुळे तुम्ही सोबत मिक्स ड्रायफ्रुट्स कॅरी करा.  हल्ली काजू- बदाम-पिस्ता- खारीक- मनुके- जर्दाळु यांचे तुकडे मिळतात. जे खाल्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळते. 

फळ

Instagram

पोटाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर तुमच्या पोटात फायबर जाणे गरजेचे असते. शक्य असेल तर तुम्ही प्रवासात टिकतील अशी फळ घ्या. केळी, संत्री अशी फळं किंवा जी फळ चिरडून खराब होतील अशी फळ घेऊ नका.कडक आणि जास्त काळ टिकणारे फळ अर्थात सफरचंद असे फळ घेऊन जा. म्हणजे तुम्हाला ही फळ कधीही खाता येईल. 

या काही स्नॅक्स आयडियाज तुम्ही नक्की फॉलो करा त्यामुळे प्रवास करताना तुम्ही लाईट आणि फिट प्रवास कराल. 

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ